AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विद्यार्थी आंदोलनावर दिलजीत दोसांझची अखेर प्रतिक्रिया, सांगितलं इतके दिवस गप्प राहण्याचं कारण

गेल्या अनेक दिवसांपासून दिल्ली सुरु असलेल्या CJP च्या आंदोलनावर दिलजीत दोसांझने प्रतिक्रिया का दिली नाही? दिलजीतने केला मोठा खुलासा

विद्यार्थी आंदोलनावर दिलजीत दोसांझची अखेर प्रतिक्रिया, सांगितलं इतके दिवस गप्प राहण्याचं कारण
Image Credit source: Social media
| Updated on: Jul 21, 2026 | 3:50 PM
Share

अभिनेता आणि गायक दिलजीत दोसांझने दीर्घकाळ मौन बाळगल्यानंतर अखेर विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सोशल मीडियावरील एका सविस्तर पोस्टद्वारे त्याने सरकार आणि प्रशासनाला विद्यार्थ्यांच्या मागण्या शांततेने ऐकून त्यावर सकारात्मक तोडगा काढण्याचे आवाहन केले. तसेच, यापूर्वी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्यामुळे स्वतःला अनेक अडचणींचा सामना करावा लागल्याचेही त्याने सांगितले.

यापूर्वी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत विचारणा झाल्यावर दिलजीतने ‘मी कलाकार आहे, राजकारणी नाही’ असे उत्तर दिले होते. त्याच्या या वक्तव्यावर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. त्यानंतर आता त्याने इंस्टाग्राम स्टोरीद्वारे आपले मौन सोडत भूमिका स्पष्ट केली आहे.

दिलजीतच्या पोस्टमध्ये काय?

दिलजीतने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, ‘आज विद्यार्थ्यांसोबत जे घडले ते योग्य नाही. त्यांच्याशी अशा प्रकारची वागणूक दिली जाऊ नये. सरकार आणि प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या मागण्या शांततेने ऐकाव्यात आणि त्याच्या समस्या सोडवाव्यात. लोकांचा आवाज हाच देवाचा आवाज असतो. मला यापूर्वीही अनेकदा देशविरोधी म्हटले गेले आणि आता पुन्हा तसेच म्हटले जाईल.’

शेतकरी आंदोलनाचा उल्लेख करत त्याने सांगितले की, त्या आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्याला देशविरोधी ठरवण्यात आले आणि आपली भूमिका मांडल्यामुळे कायदेशीर अडचणीही निर्माण झाल्या. त्या अडचणींबाबत सध्या अधिक बोलू शकत नसल्याचेही त्याने स्पष्ट केले.

दिलजीत दोसांझ ‘सतलुज’ या चित्रपटामुळे चर्चेत

दरम्यान, दिलजीत दोसांझ त्याच्या ‘सतलुज’ या चित्रपटामुळेही चर्चेत आहे. दिग्दर्शक हनी त्रेहान यांनी हा चित्रपट सेन्सॉर बोर्डाकडून मंजुरी मिळवण्यासाठी जवळपास चार वर्षे प्रयत्न केले. चित्रपटात तब्बल 127 बदल सुचवण्यात आल्याने तो थिएटरमध्ये प्रदर्शित होऊ शकला नाही. अखेर चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म ZEE5 वर प्रदर्शित करण्यात आला. मात्र, अवघ्या 48 तासांत कोणतेही स्पष्ट कारण न देता तो प्लॅटफॉर्मवरून हटवण्यात आल्याने नव्या वादाला तोंड फुटले.

विद्यार्थी आंदोलनावरील दिलजीत दोसांझच्या या प्रतिक्रियेमुळे सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चा रंगली असून, त्याच्या भूमिकेला काहींनी पाठिंबा दिला आहे तर काहींनी त्यावर टीकाही केली आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...