Sameer Patil | ‘तरतीतो’ वेब सीरीजच्या निमित्ताने दिग्दर्शक समीर पाटीलांचे अभिनय क्षेत्रात पुनरागमन!

'तरतीतो' वेब सीरीजच्या निमित्ताने प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक समीर पाटील पुन्हा एकदा अभिनयाकडे वळले आहेत.

Sameer Patil | 'तरतीतो' वेब सीरीजच्या निमित्ताने दिग्दर्शक समीर पाटीलांचे अभिनय क्षेत्रात पुनरागमन!

मुंबई : ‘तरतीतो’ वेब सीरीजच्या निमित्ताने प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक समीर पाटील (Director Actor Sameer Patil) पुन्हा एकदा अभिनयाकडे वळले असून, व्हायरस मराठीच्या ‘तरतीतो’ या वेब सीरीजमध्ये ते सध्या मुख्य भूमिका साकारताना दिसून येत आहेत. बाबा जेव्हा आई होऊन आपल्या मुलांचे संगोपन करून, पूर्ण घराची जबाबदारी उचलतो तेव्हा नेमके काय घडते, हे या वेब सीरीजमध्ये प्रेक्षकांना दिसून येते. या वेब सीरीजचे दिग्दर्शन संतोष कोल्हे यांनी केले आहे. (Director Actor Sameer Patil Back to Acting field working for Tartito web series)

मध्यमवर्गीय कुटुंबाची लॉकडाऊन कथा

“तरतीतो” ही ठाण्यात वास्तव्यास असणाऱ्या तरे कुटुंबाची ही गोष्ट आहे. बाप मनोहर तरे मुलगी क्षिती आणि मुलगा तोष सोबत ठाण्यात घोडबंदर रोडला राहत असून, बायको मात्र कामानिमित्त सांगलीला राहत आहे. त्यामुळे घरासोबत आपल्या कॉलेजवयीन मुलांची जबाबदारी ही मनोहर तरेंवर येऊन पडते. तेच मुलांचे बाबा आणि आई सुद्धा होतात. (Director Actor Sameer Patil Back to Acting field working for Tartito web series)

अगदी किचनपासून धुणी-भांडी करण्यापर्यंतची कामं ते घरात करतात. अशी या वेब सिरीजची पार्श्वभूमी आहे. खूप मोठ्या काळानंतर समीर पाटील यांना अभिनय करताना पाहणे ही प्रेक्षकांसाठी एक पर्वणीच ठरणार आहे.

ऐन लोकडाऊनमध्ये, दोन पुरुष असलेल्या घरात एखाद्या मुलीला मासिक पाळी आली तर काय होते? ते ही परिस्थिती कशी हाताळतात? हे पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. व्हायरस मराठीच्या या वेब सीरीजचे लेखन, मनाली काळे आणि चैतन्य सरदेशपांडे यांनी केले असून दिग्दर्शन संतोष कोल्हे यांनी केले आहे.( Director Actor Sameer Patil Back to Acting field working for Tartito web series)

व्हायरस मराठीच्या गाजलेल्या ‘तरतीतो’ या शोचे 3 भाग युट्युबवर प्रदर्शित झाले असून, ते प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. या वेब सीरीजचा चौथा भाग शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हलके फुलके पण तितकेच गोड संवाद आणि विनोदाद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या या शोचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. ट्रेलरवरून या भागात काय घडणार आहे याची किंचित कल्पना प्रेक्षकांना आलीच असेल. ((Director Actor Sameer Patil Back to Acting field working for Tartito web series)

‘तरतीतो’ या वेबसीरीजमध्ये मनोहर तरेंची म्हणजेच ‘तर’ ची भूमिका प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक समीर पाटील साकारात असून, ‘ती’च्या म्हणजे मुलीच्या भूमिकेत अंकिता देसाई आणि मुलाच्या म्हणजे ‘तो’ च्या भूमिकेत सृजन देशपांडे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत.

(Director Actor Sameer Patil Back to Acting field working for Tartito web series)

 

Published On - 3:48 pm, Fri, 16 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI