Bigg Boss 14 | राहुल वैद्यमुळे रुबीना दिलैकचा पारा चढला!

'बिग बॉस 14' (Bigg Boss 14) सध्या वेगळ्या वळणावर पोहचले आहे. बिग बॉस 14 च्या सुरूवातीपासूनच राहुल वैद्य (Rahul Vaidya) आणि रुबीना दिलैक (Rubina Dilaik) यांच्या वाद झाले होते.

Bigg Boss 14 | राहुल वैद्यमुळे रुबीना दिलैकचा पारा चढला!

मुंबई : ‘बिग बॉस 14’ (Bigg Boss 14) सध्या वेगळ्या वळणावर पोहचले आहे. बिग बॉस 14 च्या सुरूवातीपासूनच राहुल वैद्य (Rahul Vaidya) आणि रुबीना दिलैक (Rubina Dilaik) यांच्या वाद झाले होते आणि हे वाद आता वाढतच जात आहेत. नुकताच बिग बॉसचा एक प्रोमोसमोर आला आहे त्यामध्ये राहुल, टास्क दरम्यान रुबीना आणि अभिनवच्या नात्याबद्दल चुकीचे बोलतो त्यानंतर राहुलवर रूबीना भडकते आणि दोघांमध्ये जोरदार भांडणे होताना दिसत आहेत. (Dispute between Rahul Vaidya and Rubina Dilaik)

बिग बॉसने घरातील सदस्यांना एक टास्क दिला आहे टास्कचे लॉकआऊट नाव आहे. बिग बॉसमध्ये राखी पुन्हा सर्वांचे मनोरंजन करण्यास सुरवात करते. ती सर्वांना तिचे पोट दाखवते आणि म्हणते, मी पातळ झाले आहे, मला खायला द्या.

सलमान खान वीकेंड वॉरमध्ये रूबीनाची क्लाॅस लावला होता. सलमान म्हणतो की, अशाप्रकारे बोट दाखवण्याचा अर्थ नेमका काय आहे यावर सलमान अभिनवला विचारतो की, यांचा अर्थ काय होतो मात्र, अभिनवला पण याबद्दल काहीही माहीती नाही. सलमान घरातील इतर सदस्यांना देखील विचारतो त्यावेळी अर्शी म्हणते की, याचा अर्थ म्हणजे रूबीना संपूर्ण घराला तिच्या बोटावर नाचवत आहे. मात्र, यावेळी रूबीना म्हणते की, हे चुकीचे आहे आणि रूबीना सलमान खानला म्हणते यावर मी काही बोलू का? पण सलमान रूबीना काही बोलण्याची संधी देत नाही.


संबंधित बातम्या : 

 जास्मीनपासून वेगळं होताना अली गोनीला हुंदका, चाहते म्हणाले, ओव्हरअ‌ॅक्टिंगचे 50 रुपये कापा

Bigg Boss 14 | जास्मीन भसीनच्या चाहत्यांना मोठा धक्का, ट्विटरवर ‘हा’ हॅशटॅग ट्रेंड!

(Dispute between Rahul Vaidya and Rubina Dilaik)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI