चित्रपटाच्या डिस्ट्रीब्युटर्सने रिलीजसाठी हैरान केलं होतं, RRR च्या प्रोड्युसरचा खुलासा

शितल मुंडे, Tv9 मराठी

|

Updated on: Jan 28, 2021 | 7:03 PM

प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांच्या आरआरआर (RRR) चित्रपटाची लोक आतुरतेने वाट पाहत आहेत.

चित्रपटाच्या डिस्ट्रीब्युटर्सने रिलीजसाठी हैरान केलं होतं,  RRR च्या प्रोड्युसरचा खुलासा
Follow us

मुंबई : प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांच्या आरआरआर (RRR) चित्रपटाची लोक आतुरतेने वाट पाहत आहेत. पण चित्रपटाच्या रिलीज कोणती? हा प्रश्न समस्त प्रेक्षक वर्गाला पडलाय. वास्तविक, चित्रपटाच्या निर्मात्यांनी 13 ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर दोनच दिवसात म्हणजेच 15 ऑक्टोबर रोजी बोनी कपूर यांच्या प्रॉडक्शन हाऊसचा ‘मैदान’ या चित्रपटाच्या रिलीजची घोषणा सहा महिन्यांपूर्वी झाली आहे. आश्चर्य म्हणजे आरआरआर आणि मैदान या दोन्ही चित्रपटांमध्ये अभिनेता अजय देवगन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. (Distributers Force Me RRR movie Says RRR producers Dv Danayya)

अशा परिस्थितीत आरआरआरच्या रिलीज तारखेला गोंधळ उडाला आहे आणि त्यांनी आपल्या चित्रपटाची रिलीज डेट मैदानाच्या रिलीज डेट भोवतीच ठेवली, असा निर्मात्यांचा आरोप आहे. या प्रकारावर बोनी कपूरही खूप नाराज आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आता आरआरआर निर्माता डीव्हीव्ही दनय्या यांचं महत्त्वाचं स्पष्टीकरण समोर आलंय. ई-टाइम्सशी बोलताना ते म्हणाले की त्यांना सक्तीने वितरकांच्या म्हणण्यानुसार करावं लागलं.

त्याचवेळी ज्येष्ठ वितरक रमेश सिप्पी म्हणाले की, चित्रपटसृष्टीत कोणीही कुणाचेही नाही. काय याअगोदर असं घडलं नाही काय की सर्व, चर्चेनंतरही निर्मात्यांनी माघार घेतलीय. माझा विश्वास नाही की वितरक एखाद्या चित्रपटाच्या दिग्दर्शकाला किंवा निर्मात्याला त्याच्या इच्छित तारखेला चित्रपट प्रदर्शित करण्यास भाग पाडू शकतो.

रिपोर्ट्सनुसार, आरआरआरच्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा करण्यापूर्वी अजय देवगणने राजामौली यांना बोनी कपूरशी एकदा बोलण्यास सांगितले होते. बॉलिवूड हंगामाने आपल्या सूत्रांच्या हवाल्याने म्हटलंय की, अजयला माहित आहे की फुटबॉलचा दिग्गज सय्यद अब्दुल रहीमवर आधारित त्याची आयकॉनिक बायोपिक ‘मैदान’ यावर्षी दसर्‍याच्या निमित्ताने प्रदर्शित होईल.

दरम्यान, आरआरआरच्या रिलीजची तारीख जाहीर करण्यापूर्वी त्यांनी एकदा राजामौलीला बोनी कपूरशी बोलण्यास सांगितले होते, पण राजामौलीने बोनी कपूरशी न बोलताच चित्रपटाच्या रिलीजची तारीख जाहीर केली. आता यावर बोनी कपूर खूप नाराज आहे.

संबंधित बातम्या : 

‘बाप लेक’ पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार, ‘आचार्य’ पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला!

विकी कौशलने घेतली कतरिनाची गळाभेट, कॅमेरामुळे गुपित झाले उघड!

(Distributers Force Me RRR movie Says RRR producers Dv Danayya)

Non Stop LIVE Update

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI