AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: मौलानाच्या मुलाशी निकाह, तलाकनंतर ‘हलाला’साठी बळजबरी! काळं सत्य समोर आणणारी दिव्या अग्रवाल कोण?

तिने मौलानाच्या मुलाशी निकाह तर केला. पण असं काही ज्यामुळे नवऱ्याने तलाक... तलाक... तलाक... म्हणत नातं संपवलं... अखेर तिच्यावर 'हलाला'साठी बळजबरी करण्यात आली... तर जाणून घ्या नेमकं प्रकरण काय आहे.

Video: मौलानाच्या मुलाशी निकाह, तलाकनंतर 'हलाला'साठी बळजबरी! काळं सत्य समोर आणणारी दिव्या अग्रवाल कोण?
Halala
| Updated on: Oct 09, 2026 | 2:08 PM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने मुस्लिम महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी तिहेरी तलाकवर बंदी आणली. ज्यावर पूर्वी अनेक सिनेमे आणि सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस आल्या. आता रिएलिटी शो स्टार आणि अभिनेत्री दिव्या अग्रवाल हिची नवी वेब सीरिज चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. अभिनेत्रीच्या ‘हलाला’ नावाच्या सीरिजच्या माध्यमातून एक काळं सत्य समोर येणार आहे. सीरिजचा प्रोमो समोर आला असून सीरिज खळबळजनक रहस्यांचा उलगडा करताना दिसणार आहे. धर्माच्या नावाखाली महिलांचा होणारा छळ आणि त्यांची केली जाणारी फसवणूक… इत्यादी मुद्द्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे.

सीरिजचा प्रोमो प्रदर्शित होताच, सर्वत्र खळबळ उडाली आहे. सांगायचं झालं तर, एका धाडसी विषयावर आधारित सीरिज तयार करणं ही नुकतीच निर्माती बनलेल्या दिव्यासाठी एक मोठी जबाबदारी आहे. सीरिजच्या प्रोमोची सध्या सर्वत्र चर्चा रंगली असून, प्रत्येक जण कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत.

‘रॉकेट रील्स’ आणि ‘क्लिफहँगर’ यांच्या संयुक्त उपक्रमातून साकारल्या जाणाऱ्या या सीरिजमध्ये दिव्यासोबतच अंकित भाटिया आणि अक्षय डोगरा हे देखील महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत. विशेष म्हणजे, दिव्या अग्रवाल स्वतःच या मालिकेची निर्मिती करत आहे, तर अमित खन्ना हे याचे दिग्दर्शक आहेत.

प्रोमो सोशल मीडियावर शेअर करत कॅप्शनमध्ये, ‘प्रेम, परंपरा आणि त्यामध्ये एक महिलेची इच्छा… ‘हलाला’ अशी एक कथा जी, प्रश्न उपस्थित करेल आणि नजर देखील हटू देणार नाही…’, सांगायचं झालं तर, प्रोमोची सुरुवात, दिव्या हिच्या निकाहने होते. जेथे झोया (दिव्या) एका मौलाच्या मुलासोबत लग्न करते. लग्नानंतर दोघे देखील प्रचंड आनंदी असतात.

दोघांचा सुखाचा संसार सुरु असतो. पण लग्नाला जसे अधिक दिवस होतात, तसे त्यांच्यात वाद होण्यास सुरुवात होते. एकदा झोया आणि नवऱ्याचे वाद टोकाला पोहोचतात आणि तो झोया हिला तीन तलाक देतो… पण दुसऱ्या दिवशीच त्याला स्वतःच्या चुकीची जाणीव होते आणि तो झोया हिला ‘हलला’ करण्यासाठी सांगतो.

त्यानंतर सीरिजमध्ये मोठा ट्विस्ट येतो. प्रोमो पाहिल्यानंतर कळतं की, ‘हलाला’च्या नावावर एक मोठा खेळ सुरु आहे. अशी जागा जिथे मुलींच्या प्रतिष्ठेशी खेळ केला जातो. अशा परिस्थितीत झोया काय करते आणि आपल्या हक्कांसाठी ती कसा लढा देते, हे पाहणे रंजक ठरेल. सीरिज कधी प्रदर्शित होणार याबद्दल काहीही सांगण्यात आलेलं नाही.

झोया म्हणजेच अभिनेत्री दिव्या एक प्रसिद्ध अभिनेत्री आणि डान्सर आहे. तिने तिने रिअ‍ॅलिटी शोजच्या माध्यमातून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. ती ‘एमटीव्ही MTV Splitsvilla 10 मध्ये उपविजेती आणि MTV Ace of Space ची विजेती ठरली. त्यानंतर, 2021 मध्ये तिने ‘बिग बॉस ओटीटी’च्या पहिल्या भागाची ट्रॉफी स्वतःच्या नावावर केली.

Follow Us
ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच....
Shivsena : ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच, सर्वोच्च न्यायालयाकडून तारीख जाहिर
गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा बण यांच्यावर....
Vivekanand Patil : गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा नवनाथ बण यांच्यावर पलटवार, फडणवीसांनाही केलं आवाहन
CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
CJP Delhi Andolan : CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ?
Thackeray Group On Delhi Andolan : दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ? राष्ट्रपतींच्या भेटीवेळीही प्रतिनिधी....
सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून राऊतांनी...
Sanjay Raut : सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून संजय राऊतांनी सरकारला घेरलं
SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; सिब्बलांचा जुना व्हिडिओ
Devendra Fadnavis : SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; कपिल सिब्बलांचा जुना व्हिडिओ शेअर करत म्हणाले...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वपक्षीय नेते एकवटले; ठाण्यात आज....
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वपक्षीय नेते एकवटले; ठाण्यात आज मोर्चा निघणार
राहुल गांधींचा उद्धव ठाकरेंना फोन; इंडिया आघाडीत मोठ्या घडामोडी
Rahul Gandhi : राहुल गांधींचा उद्धव ठाकरेंना फोन; इंडिया आघाडीत मोठ्या घडामोडी - सूत्र
नाना पाटेकर यांच्या निधन प्रकरणी मोठी अपडेट समोर; गोवा पोलिसांकडून....
Nana Patekar : नाना पाटेकर यांच्या निधन प्रकरणी मोठी अपडेट समोर; गोवा पोलिसांकडून....
मुंबईकरांनो, उकाड्यासाठी तयार राहा; ऑक्टोबरमध्ये तापमान 37.6 अंशांवर
Mumbai Heat Wave : मुंबईकरांनो, उकाड्यासाठी तयार राहा; ऑक्टोबरमध्ये तापमान 37.6 अंशांवर, हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी