या अभिनेत्रीने केली पहलगामच्या तुरुंगात शूटिंग; खऱ्या गुन्हेगारांमध्येही वावरली बिनधास्त
एक प्रसिद्ध अभिनेत्री, तिच्या धाडसीपणा आणि अभिनयासाठी आजही ओळखली जाते. एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी ती पहलगाम तुरुंगात गेली असताना ती खऱ्या गुन्हेगारांमध्ये देखील अगदी बिनधास्तपणे वावारत होती.

बॉलिवूडमध्ये 90s मध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांच्याबद्दल आजही त्याच कौतुकाने बोललं जातं. त्यापैकी एक अभिनेत्री अशी होती जिच्या अभिनयाबद्दल आणि सौंदर्याबद्दल आजही बोललं जातं. तिने अनेक हीट चित्रपट दिले आहेत. एवढंच नाही तर तिने चक्क पहलगामच्या तुरुंगात शूटिंग करत तेथील खऱ्या गुन्हेगारांमध्येही वावरताना मनात भीती बाळगली नाही.
अभिनेत्रीने केलं होतं पहलगामच्या तुरुंगात शूटिंग
ती अभिनेत्री म्हणजे सर्वांच्या मनात आजही तिचं स्थान कायम ठेवणारी दिव्या भारती. दिव्या भारतीच्या चित्रपटांबद्दल,तिच्या बिनधास्त वागण्याबद्दल आजही तेवढ्याच कौतुकाने बोललं जातं. ही पहिली अशी अभिनेत्री होती जिने पहलगामच्या तुरुंगात शूटिंग करत खऱ्या गुन्हेगारांमध्ये ती वावरली होती. हा चित्रपट होता मोहरा. ज्यामध्ये दिव्या भारतीसोबत सुनील शेट्टी होते.
सुनील शेट्टी यांची अॅक्शन चित्रपट ‘मोहरा’ हा चित्रपट त्यांच्या कारकिर्दीतील एक महत्वाचा चित्रपट ठरला. या चित्रपटात दिव्या भारती यांना सुनील शेट्टी यांच्यासोबत मुख्य भूमिकेसाठी निवडण्यात आलं होतं. मात्र, त्यांच्या अकस्मात निधनानंतर रवीना टंडन यांनी ही मुख्य भूमिका साकारली. नुकत्याच एका मुलाखतीत सुनील शेट्टी यांनी दिव्या भारती यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव सांगितला आणि तिने निडर स्वभावाचं कौतुक केलं.
पहलगामच्या तुरुंगात केलेल्या शुटींगचा अनुभव
पहलगामच्या तुरुंगात दिव्यासोबत केलेल्या शुटींगचा अनुभव सांगितला. सुनील शेट्टी म्हणाले, “आम्ही पहलगामच्या तुरुंगात शूटिंग केलं, पण ती मुलगी अगदी निडर होती. तुरुंगात खरे गुन्हेगार होते, तरीही तिला अजिबात भीती वाटली नाही. ती आयुष्याची नेहमी मजा घेत जगायची. आम्ही नेहमीच प्लान करायचो की राजीवला कसं चिडवायचं, शब्बीरला कसं त्रास द्यायचा, लोकांना कसं हसवायचं आणि वातावरण कसं हलकं-फुलकं ठेवायचं. तिच्यासोबत काम करणं म्हणजे स्वप्नवत अनुभव होता.”
सर्वाधिक मानधन घेणाऱ्या भारतीय अभिनेत्रींपैकी एक
सुनील शेट्टी यांनी बॉलिवूडमध्ये ‘बलवान’ या चित्रपटातून पदार्पण केलं होतं, ज्यामध्ये दिव्या भारती याही होत्या. राजीव राय यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या ‘मोहरा’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठं यश मिळवलं. या चित्रपटात अक्षय कुमार, नसीरुद्दीन शाह, रवीना टंडन यांनी मुख्य भूमिका साकारल्या, तर पूनम झावर, रझा मुराद, परेश रावल, गुलशन ग्रोवर आणि सदाशिव अमरापुरकर यांनी सहाय्यक भूमिका निभावल्या.
दिव्या भारती आपल्या काळातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या भारतीय अभिनेत्रींपैकी एक होत्या. त्यांनी ‘बॉबिली राजा’, ‘राउडी अल्लुडु’, ‘शोला और शबनम’, ‘दीवाना’ यांसारख्या अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये काम केलं. वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी, मुंबईतील अंधेरी पश्चिम, वर्सोवा येथील त्यांच्या पाचव्या मजल्यावरील अपार्टमेंटच्या बाल्कनीतून पडल्यानंतर त्यांचा कूपर रुग्णालयात मृत्यू झाला.