AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘हिच्या डोक्यावर परिणाम झालाय वाटतं’; भूकंपादरम्यान दिव्यांका त्रिपाठीचा ‘तो’ व्हिडिओ पाहून भडकले नेटकरी

'लोक भूकंपाला रोमांचक कसं म्हणू शकतात', असा सवाल एकाने केला. तर 'भूकंपाचा परिणाम तिच्या डोक्यावर झालाय वाटतं', अशी टीका दुसऱ्या युजरने केली. 'हिचं मानसिक संतुलन बिघडलंय', असंही नेटकऱ्यांनी म्हटलंय.

'हिच्या डोक्यावर परिणाम झालाय वाटतं'; भूकंपादरम्यान दिव्यांका त्रिपाठीचा 'तो' व्हिडिओ पाहून भडकले नेटकरी
Divyanka TripathiImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 24, 2023 | 8:29 AM
Share

नवी दिल्ली : मंगळवारी दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतात भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. रात्री जवळपास दहा वाजताच्या सुमारास जाणवलेल्या या भूकंपाच्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. लोक त्यांच्या घरातून निघून मोकळ्या मैदानात धावू लागले होते. एकीकडे भूकंपामुळे लोकांमध्ये भीती होती, तर दुसरीकडे प्रसिद्ध अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीने तिच्या लाइव्ह व्हिडीओमध्ये उत्सुकता व्यक्त केली. तिच्या अशा प्रतिक्रियेला पाहून नेटकऱ्यांनी दिव्यांकाला जोरदार ट्रोल केलं आहे. हेच संवेदनशील वागणं का, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी तिच्यावर राग व्यक्त केला.

‘ये है मोहब्बते’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री दिव्यांकाचं हे बेजबाबदार वागणं पाहून सोशल मीडियावर तिच्यावर टीका होतेय. मंगळवारी 6.6 रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले होते. या भूकंपाचं केंद्र अफगाणिस्तान होतं. त्याचे धक्के देशातील इतर राज्यांमध्येही जाणवले होते. यादरम्यान दिव्यांकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आयुष्यातील पहिला भूकंपाचा अनुभव करतानाचा व्हिडीओ लाइव्ह केला. या व्हिडीओमध्ये तिने उत्सुकता व्यक्त केली.

पहा दिव्यांकाचा व्हिडीओ

“मी फारच उत्सुक आहे, कारण चंदिगडमध्ये मी माझ्या आयुष्यातील पहिला भूकंप अनुभवतेय”, असं ती या व्हिडीओमध्ये म्हणताना दिसतेय. यामध्ये ती पुढे असंही म्हणते की, “हे माझ्यासाठी खूप उत्सुकतेचं आहे कारण मी माझ्या आयुष्यातील पहिला भूकंप अनुभवतेय. परिसरातील सर्व लोक खाली आले आहेत. हे फारच रोमांचक आहे.” याच व्हिडीओमुळे नेटकरी तिला ट्रोल करत आहेत. अनेकांनी तिच्यावर असंवेदनशील असल्याची टीका केली आहे.

‘लोक भूकंपाला रोमांचक कसं म्हणू शकतात’, असा सवाल एकाने केला. तर ‘भूकंपाचा परिणाम तिच्या डोक्यावर झालाय वाटतं’, अशी टीका दुसऱ्या युजरने केली. ‘हिचं मानसिक संतुलन बिघडलंय’, असंही नेटकऱ्यांनी म्हटलंय. ‘सेलिब्रिटी आहेस म्हणून प्रत्येक गोष्ट सार्वजनिकरित्या व्यक्त केली पाहिजे, असं बंधनकारक नाही. किमान थोडी माणुसकी तरी दाखव’, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी राग व्यक्त केला.

झी टीव्हीवरील ‘बनू मै तेरी दुल्हन’ या मालिकेत विद्या प्रताप सिंह आणि दिव्या शुक्ला अशा दुहेरी भूमिका साकारून दिव्यांकाला प्रचंड लोकप्रियता मिळाली. ही मालिका 2006 ते 2009 पर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. त्यानंतर तिने 2013 ते 2019 दरम्यान ‘ये है मोहब्बतें’ या मालिकेत डॉ. इशिता भल्लाची भूमिका साकारली. दिव्यांकाने ‘नच बलिये 9’ आणि ‘खतरों के खिलाडी 11’ या रिॲलिटी शोजमध्येही भाग घेतला होता. 2017 मध्ये पती विवेक दहियासोबत तिने डान्स रिॲलिटी शोचं विजेतेपद पटकावलं होतं.

सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....