AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बॉलिवूडमधून अचानक गायब राजेश खन्ना यांची लहान मुलगी, आता काय करते रिंकी खन्ना?

झगमगत्या विश्वातून अचानक गायब झाली राजेश खन्ना यांची लहान मुलगी, आता कुठे आणि कसं जगतेय आयुष्य..., राजेश खन्ना यांची लेक आता लाईमलाईटमध्ये नसली तरी, त्यांची नात कोणत्या न कोणत्या कारणामुळे असते चर्चेत...

बॉलिवूडमधून अचानक गायब राजेश खन्ना यांची लहान मुलगी, आता काय करते रिंकी खन्ना?
| Updated on: Feb 05, 2025 | 2:50 PM
Share

सेलिब्रिटी किड्सना बॉलिवूडमध्ये सहज एन्ट्री मिळते. पण अभिनयाच्या जोरावर त्यांच्या करीयर ठरतं. अनेक सेलिब्रिटी कड्सने मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं. पण आई-वडीलांप्रमाणे त्यांना स्वतःची ओळख निर्माण करता आली नाही. यामध्ये दिवंगत अभिनेते राजेश खन्ना यांची लहान मुलगी रिंकी खन्ना देखील आहे. रिंकी खन्ना ही बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांची लेक आहे.

रिंकी हिचा बॉलिवूडमधील प्रवास आई – वडिलांप्रमाणे फार लहान होता. काही सिनेमांमध्ये भूमिका बजावल्यानंतर रिंकी लाईमलाईटपासून दूर झाली. अभिनयाला रामराम ठोकल्यानंतर देखील रिंकी कधीच चर्चेत आली नाही. फार कमी रिंकी आता भारतात येते… अशी माहिती देखील समोर येत आहे.

रिंकी हिच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, 1999 मध्ये रिंकीने मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं. त्यानंतर अभिनेत्री 2004 नंतर गायब झाली. रिंकीच्या पहिल्या सिनेमाचं नाव ‘प्याक में कभी-कभी’ असं होतं. तर तिच्या शेवटच्या सिनेमाचं नाव ‘चमेली हेतं.’ पण रिंकीचा कोणताच सिनेमा मोठ्या पडद्यावर हीट ठरला नाही.

2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जिस देश में गंगा रहता हैं’ सिनेमात रिंकी झळकली होती. तर सिनेमा अभिनेता गोविंदा आणि अभिनेत्री सोनाली बेंद्रे मुख्य भूमिकेत होती. रिंकी हिने फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर, दाक्षिणात्य सिनेविश्वात देखील काम केलं आहे. पण रिंकीला यश मिळालं नाही.

आता कुठे असते रिंकी खन्ना?

रिंकी खन्ना हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, रिंकीने 2003 मध्ये उद्योजक समीर सरन यांच्यासोबत मोठ्या थाटात लग्न केलं. मीडिया रिपोर्टनुसार, रिंकी खन्ना आता पती आणि मुलगी नाओमिका यांच्यासोबत लंडन येथे राहते. रिंकी हिला एक मुलगा देखील आहे.

रिंकी खन्ना लाईमलाईट आणि सोशल मीडियापासून दूर असते. फक्त विशेष प्रसंगी रिंकी आई डिंपल कपाडिया आणि बहीण ट्विंकल खन्ना यांच्यासोबत दिसते. रिंकी काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात.

रिंकी आता झगमगत्या विश्वापासून दूर असली तरी, तिची लेक नाओमिका  कायम चर्चेत असते. नाओमिका कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. नाओमिका अद्याप अभिनेत्री नसली तरी सौंदर्यामुळे कायम चर्चेत असते.

फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.