
Ashok Saraf Ring: `70 रुपये वारले’, ‘हा माझा बायको पार्वती’, ‘`पण काही म्हणा या ऑफिसमध्ये झुरळं फार कमीच आहेत’, ‘ ‘आपण कोणाला नाय घाबरत’, ‘सौदामिनी आधी कुंकू लाव…’, मराठी सिनेविश्वातील दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांचे असे काही डायलॉग कधीच विसरता येणार नाहीत. सांगायचं झालं तर, महाराष्ट्रभूषण अशोक सराफ यांना नुकताच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. ज्यामुळे त्यांच्या चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला. जवळपसास 200 मराठी सिनेमे 50 हिंदी सिनेमे आणि अनेक नाटकं आणि मालिकांमध्ये दमदार भूमिका साकारत त्यांनी चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण त्यांच्या हातात एक गोष्ट कायम राहिली आणि ती म्हणजे अशोक सराफ यांच्या बोटातील एक अंगठी.
गेल्या 50 वर्षांपासून ती अंगठी अशोक सराफ यांच्या बोटात आहे. अंगठी यांनी कधीच काढली नाही. त्या अंगठीचा देखील एक किस्सा आहे… सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती अंगठी अशोक सराफ यांच्यासाठी फक्त एक दागिना नसून चाहत्यांच्या प्रेमाचा एक अविभाज्य भाग बनली आहे. अशोक सराफ यांच्या अंगठीचं सत्य फार कमी लोकांना माहिती आहे.
यशस्वी कारकिर्द आणि खास मैत्रीचा लकी चार्म म्हणजे अशोक सराफ यांची ही अंगठी आहे. 1974 सालचा हा किस्सा आहे… अशोक सराफ यांचे मेकअप आर्टिस्ट विजय लवेकर यांचं छोटं सोन्याचं दुकान होतं. विजय लवेकर त्यांनी तयार केलेल्या काही खास अंगठीच्या डिझाइन्स घेवून सेटवर आले होते. विजय यांनी अशोक यांन एक अंगठी निवडण्यास सांगतली.
तेव्हा अशोक सराफ यांनी पटकन एक अंगठी उचलली आणि करंगळीच्या बाजूच्या बोटात घातली. त्या अंगठीतील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, त्या अंगठीवर कोरलेली नटराजाची प्रतिमा आणि ती अंगठी देखील अशोक सराफ यांच्या बोटात फिट्ट बसली… तेव्हा अभिनेते म्हणाले, ‘आता ही अंगठी माझी…’
ती अंगठी अशोक सराफ यांनी कधीच काढली नाही. अंगठी बोटात घातल्यानंतर अशोक सराफ यांच्या करीयरने वेग धरला. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. अंगठीबद्दल स्वतःच अशोक सराफ म्हणालेले, ‘अंगठीवर माझी श्रद्धा आणि विश्वास आहे किंवा तुम्ही अंधश्रद्धा म्हणा… अंगठी बोटातून काढायची नाही.. असा निर्णय मी घेतला…’ असं अशोक सराफ म्हणालेले.