NCB कार्यालयात हजेरी लावून रिया चक्रवर्ती परतली, कोर्टाच्या ‘त्या’ आदेशाचं रिया-शौविककडून पालन

अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरण (Drugs case)  समोर आले होते.

NCB कार्यालयात हजेरी लावून रिया चक्रवर्ती परतली, कोर्टाच्या 'त्या' आदेशाचं रिया-शौविककडून पालन
Follow us
| Updated on: Jan 04, 2021 | 11:03 AM

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरण (Drugs case)  समोर आले होते. या ड्रग्ज कनेक्शनमध्ये सुशांतची गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty)  आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती (Showik Chakraborty)ला या प्रकरणी अटकही झाली होती. ते दोघेही आता जामीनावर बाहेर आहेत. मात्र, अभिनेत्री रिया चक्रवर्ती आज एनसीबी कार्यालयात आली होती. रियासोबत तिच्या भाऊ शौविक चक्रवर्ती आणि वडीलहीसोबत होते. रिया आणि शौविक हजेरी लावण्यासाठी एनसीबी कार्यालयात आले होते. (Drugs case Actress Rhea Chakraborty at the NCB office today)

कोर्टाकडून जामीन देताना महिन्याच्या पहिल्या सोमवारी एनसीबी कार्यालयात हजेरी लावण्याची अट घालण्यात आली होती. त्यानुसार आज रिया आणि शौविक सकाळीच एनसीबी कार्यालयात दाखल झाले होते. कोर्टाने शौविक चक्रवर्ती याचा जामीन अर्ज 2 डिसेंबरला मंजूर केला होता. तर रिया चक्रवर्तीला तब्बल 28 दिवसानंतर जामीन मंजूर मिळाला आला होता. मात्र, जामीन अर्ज मंजूर करताना कोर्टाने महिन्याच्या पहिल्या सोमवारी एनसीबी कार्यालयात हजेरी लावण्याची अट घातली होती.

तब्बल 3 वेळा जामीन अर्ज नाकारल्यानंतर 7 ऑक्टोबर रोजी रिया चक्रवर्तीचा जामीन अर्ज मंजूर करण्यात आला होता. रिया ड्रग्ज सिंडिकेटची सक्रीय सदस्य असल्याचे पुरावे NCB देऊ न शकल्याने, रियाला जामीन देण्यात आला होता. दुसऱ्या व्यक्तीला अमली पदार्थाचे सेवन करण्यासाठी पैसे दिले म्हणजे देणारी व्यक्ती त्याला उत्तेजन देत आहे आणि अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यातील कलम 27-अ अन्वये अमली पदार्थांसाठी वित्तपुरवठा करणे आणि आरोपीला आश्रय देण्यासारखे होते, हा एनसीबीचा युक्तिवाद मान्य करता येणार नाही, असे न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांनी रियाच्या जामीन अर्जावर सुनावणी करताना नमूद केले होते.

संबंधित बातम्या : 

Sushant Singh case | CBI चौकशीचा प्रस्ताव केंद्राने स्वीकारला, कोर्टाकडून दोन्ही सरकारांना म्हणणं मांडण्याचे आदेश

रियामागची शुक्लकाष्ट संपेना, पावसामुळे जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर

(Drugs case Actress Rhea Chakraborty at the NCB office today)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.