AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shilpa Shetty – Raj Kundra : शिल्पा शेट्टीच्या मागचं शुक्लकाष्ठ संपेना, नवरा पुन्हा अडचणीत… घरात आणि ऑफीसमध्ये ईडीची पुन्हा धाड

Shilpa Shetty - Raj Kundra | अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या मागची अडचण संपेना... नवऱ्यामुळे पुन्हा वादात सापडली शिल्पा... शिल्पा - राज कुंद्राच्या घरी आणि ऑफीसमध्ये ईडीची पुन्हा धाड.. सर्वत्र खळबळ.. काय आहे प्रकरण ?

Shilpa Shetty - Raj Kundra : शिल्पा शेट्टीच्या मागचं शुक्लकाष्ठ संपेना, नवरा पुन्हा अडचणीत... घरात आणि ऑफीसमध्ये ईडीची पुन्हा धाड
शिल्पा शेट्टा - राज कुंद्रा
| Updated on: Nov 29, 2024 | 11:51 AM
Share

प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. शिल्पा शेट्टीला मोठा धक्का बसला आहे. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या घरावर तसेच ऑफीसमध्येही ईडीने धाड टाकली आहे. शिल्पा -राज जुहू येथील घरात आणि ऑफीसमध्ये ईडीने केलेल्या या कारवाईमुळे एकच खळबळ माजली आहे. पॉर्नोग्राफी प्रकरणी ईडीचं हे धाडसत्र सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोर्नोग्राफी नेटवर्क प्रकरणात ईडीने ही कारवाई करत धाड टाकली आहे. ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर आता शिल्पा आणि राज यांच घर तसेच ऑफीसती झडती घेतली जात आहे. ‘अश्लील’ चित्रपट बनवल्याप्रकरणी राज कुंद्रा याला जून 2021 मध्ये अटक करण्यात आली होती. कुंद्रा हा या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचा दावा मुंबई पोलिस अधिकाऱ्यांनी केला होता. दोन महिने तुरुंगात घालवल्यानंतर सप्टेंबर 2021 मध्ये त्याला जामीन मिळाला आणि तो बाहेर पडला.

असा उघड झाला राज कुंद्राचा बिझनेस

राज कुंद्रा आणि त्याच्या कंपनीने पॉर्न फिल्म्सद्वारे फक्त बक्कळ कमाई केली नाही तर त्यांनी देशाच्या कायद्यांना बगल देण्यासाठी संपूर्ण व्यवस्था केली होती, असा दावा पोलिसांनी केला होता. पण हे प्रकरण उघडकीस आलं तरी कसं ? मुंबई पोलिसांनी यासंदर्भात 4 फेब्रुवारी 2021मध्ये एक केस दाखल केली होती. मालवणी पोलिस स्टेशनमध्ये या रॅकेटसंदर्भात एका मुलीने तक्रार दाखल केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती.

चित्रपट आणि ओटीटीवर काम मिळवून देण्याच्या नावाखाली काही लोक तरूणींना अश्लील चित्रपटात काम करण्याची जबरदस्ती करत आहेत, असे या तक्रारीत नमूद करण्यात आलं होतं. मुंबईतील अनेक व्यावसायिक अश्लील चित्रपटांचे शूटिंग करून मोठी कमाई करत आहेत असा दावाही या तक्रारीत करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी मालाड वेस्टमधील एका बंगल्यावर छापा मारला. तो बंगला भाड्याने घेऊन तेथे पॉर्न फिल्मचे शूटिंग करण्यात येत होतं. पोलिसांनी छापा टाकून बॉलिवूडमधील एका अभिनेत्रीसह 11 जणांना अटक केली होती.

त्यावेळी पोलिसांना राज कु्ंद्रा आणि त्याच्या कंपनीबद्दल काही सुगावा लागला होता, मात्र त्याच्याविरोधात कारवाई करण्यापूर्वी पोलिसांना ठोस पुरावे गोळा करायचे होते. पोलिसांच्या सांगण्यानुसार, त्यांच्याकडे राज कुंद्राशी निगडीत बरीच माहिती होती. त्यामध्ये पीडित मुलींचा जबाब , व्हॉट्सॲप चॅट, ॲपवर उपलब्ध फिल्मस आणि राज कुंद्राच्या अश्लील फिल्म्स व्यवसायाचा संपूर्ण हिशोब होता. त्यानंतर कारवाई करत राज कुंद्रा याला अटक करण्यात आली होती. याचप्रकरणी आता ईडीने पुन्हा धाडसत्र सुरू केले आहे.

उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात.
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप.
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी.
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....