Video: शोच्या नावाखाली मुलींना कपडे काढायला लावता; एजाज खानच्या शोवर नेटकरी संतापले

सध्या सगळीकडे एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' या शोची चर्चा सुरु आहे. या शोवर नेटकरी टीका करताना दिसत आहेत.

Video: शोच्या नावाखाली मुलींना कपडे काढायला लावता; एजाज खानच्या शोवर नेटकरी संतापले
House Arrest
Image Credit source: Tv9 Marathi
| Updated on: May 02, 2025 | 12:38 PM

छोट्या पडद्यावर अनेक वेगवेगळे रिअॅलिटी शो येत असतात. नुकताच अभिनेता एजाज खानचा ‘हाऊस अरेस्ट’ हा शो प्रदर्शित झाला आहे. या शोमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. शोमधीस कंटेंट सोशल मीडियावर व्हायरल झाला असून कारवाईची मागणी होत आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म उल्लू अॅपवर स्ट्रीम झालेल्या या शोबाबत झारखंडच्या गोड्डा येथील भाजप खासदार निशिकांत दुबे यांनीही आक्षेप नोंदवला आहे. त्यांनी सोशल मीडिया एक्स अकाऊंटवर माहिती व प्रसारण मंत्रालयाला टॅग करत इशारा दिला आहे.

निशिकांत दुबे यांनी ‘हाऊस अरेस्ट’ या शोवर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले, “हे चालणार नाही, आमची समिती यावर कारवाई करेल.” शोच्या कंटेंटवरून वाद सुरू असताना एजाज खानने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक पोस्ट केल्या आहेत. त्याने एक मे रोजी एक्सवर लिहिले, “खेळ खेळायचा असेल तर आपसात खेळा, माझ्याशी खेळू नका.”

वाचा: भारतासोबत युद्ध होणार असल्याचे कळताच पाकिस्तानी नागरिकांचा आनंद गगनात मावेना, कारण वाचून व्हाल थक्क

त्याने दुसऱ्या पोस्टमध्ये व्हिडिओ शेअर करत म्हटले, “मी शांतपणे आलो, स्वत:ची ओळख निर्माण केली आणि उद्देशाने पुढे गेलो. प्रत्येक अपयशाने मला अधिक मजबूत बनवले. प्रत्येक अपयशाचा जोमाने सामना केला. मी लाइक्ससाठी फ्लेक्स करत नाही – मी नेतृत्व करण्यासाठी जगतो.”

पुढे तो म्हणाला, “निष्ठा हा माझा कोड आहे, सन्मान कमवावा लागतो, आणि भीती? ती त्यांच्यासाठी आहे ज्यांनी कधी एकट्याने उभे राहण्याची हिंमत केली नाही. मी फक्त जगत नाही… मी खेळ पुन्हा लिहित आहे.”

सध्या सोशल मीडियावर देखील या शोची जोरदार चर्चा सुरु आहे. या शोवर नेटकऱ्यांनी देखील संताप व्यक्त केला आहे. एका यूजरने शोचा कंटेन्ट पाहून, ‘शोच्या नावाखाली मुलींना कपडे काढायला लावता’ असे म्हणत सुनावले आहे. तर दुसऱ्या यूजर्सने हा शो तातडीने बंद करा असे म्हटले आहे. एका यूजरने हे आपल्या संस्कृतीमध्ये नाही असे म्हटले आहे.