‘थमा’ला विसरून प्रेक्षकांची ‘एक दिवाने की दिवानियत’ला पसंती; पहिल्याच दिवशी मोडले 26 चित्रपटांचे विक्रम
अभिनेता हर्षवर्धन राणे आणि सोनम बाजवा यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'एक दिवाने की दिवानियत' या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर दमदार प्रतिसाद मिळतोय. 'थमा'शी टक्कर असतानाही या चित्रपटाची कमाई खूप चांगली होत आहे.

दिवाळीच्या मुहूर्तावर बॉक्स ऑफिसवर दोन चित्रपट एकत्र प्रदर्शित झाले. त्यापैकी एक आयुषमान खुराना आणि रश्मिका मंदाना यांचा ‘थमा’ हा चित्रपट आहे. तर दुसरा हर्षवर्धन राणे आणि सोनम बाजवा यांचा ‘एक दिवाने की दिवानियत’ हा आहे. 21 ऑक्टोबर रोजी हे दोन्ही चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. एकीकडे ‘थमा’ची बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक ओपनिंग झाली. तर हर्षवर्धनच्या रोमँटिक चित्रपटाने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. कोणताही गाजावाजा न करता प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची आता सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. या चित्रपटाचा ट्रेलर जेव्हा लाँच झाला, तेव्हासुद्धा फारशी चर्चा झाली नव्हती. पण आता फक्त माऊथ पब्लिसिटीच्या जोरावर हर्षवर्धन आणि सोनमचा हा चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये जात आहेत. यातील गाणीसुद्धा हिट होत आहेत. ‘थमा’मुळे या चित्रपटाच्या कमाईवर थोडा परिणाम झाला आहे, परंतु पहिल्या दिवशीही त्याला प्रेक्षकवर्ग चांगला लाभला आहे.
‘सॅकनिल्क’ने दिलेल्या आकड्यांनुसार, ‘एक दिवाने की दिवानियत’ या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी 8.50 कोटी रुपये कमावले. परंतु हे आकडे सुरुवातीचे असल्याने त्यात आणखी वाढ होऊ शकते. हर्षवर्धन राणेच्या करिअरमधील हा सर्वाधिक ओपनिंग करणारा चित्रपट ठरला आहे. इतकंच नव्हे तर या चित्रपटाने अजय देवगणच्या ‘सन ऑफ सरदार 2’सह या वर्षातील इतर 26 चित्रपटांना ओपनिंगच्या बाबतीत मागे टाकलं आहे.
‘एक दिवाने की दिवानियत’ने मोडले या चित्रपटांचे रेकॉर्ड
- होमबाऊंड- 30 लाख रुपय
- द बंगाल फाइल्स- 1.85 कोटी रुपये
- परमसुंदरी- 7.37 कोटी रुपये
- सन ऑफ सरदार 2- 7.25 कोटी रुपये
- निकिता रॉय- 22 लाख रुपये
- मालिक- 4.02 कोटी रुपये
- आंखों की गुस्ताखियां- 35 लाख रुपये
- मेट्रो इन दिनों- 4.05 कोटी रुपये
- माँ- 4.93 कोटी रुपये
- भूल चूक माफ- 7.20 कोटी रुपये
- केसरी वीर- 25 लाख रुपये
- कंपकंपी- 26 लाख रुपये
- द भूतनी- 1.19 कोटी रुपये
- फुले- 15 लाख रुपये
- ग्राऊंड झिरो- 1.20 कोटी रुपये
- केसरी चाप्टर 2- 7.84 कोटी रुपये
- द डिप्लोमॅट- 4.03 कोटी रुपये
- क्रेझी- 1.10 कोटी रुपये
- सुपरबॉइज ऑफ मालेगांव- 50 लाख रुपये
- मेरे हसबंड की बीवी-1.75 कोटी रुपये
- बॅडअॅस रवी कुमार- 3.52 कोटी रुपये
- लवयापा – 1.25 कोटी रुपये
- देवा-5.78 कोटी रुपये
- एमर्जन्सी- 3.11 कोटी रुपये
- आझाद- 1.50 कोटी रुपये
- फतेह- 2.61 कोटी रुपये
