Jivalaga : प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा तडका, ‘जिवलगा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

VN

|

Updated on: Apr 29, 2021 | 3:15 PM

स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘जिवलगा’ प्रेक्षकांच्या आग्रहाखातर पुन्हा एकदा भेटीला येणार आहे. (Entertainment for the audience, 'Jivalaga' to hit the Tv screens soon)

Jivalaga : प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा तडका, ‘जिवलगा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : सध्या देशभरात कोरोनानं डोकं वर काढलंय. कोरोनाचं थैमान पाहता राज्यात लॉकडाऊन (Lockdown) जाहीर करण्यात आलाय. त्यामुळे चित्रपट मालिकांचं चित्रिकरण बंद आहे. मात्र तरी तुमच्या काही आवडत्या मालिकांचं चित्रिकरण राज्याबाहेर सुरू करण्यात आलं आहे. अशा परिस्थितीत स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘जिवलगा’ (Jivalaga) प्रेक्षकांच्या आग्रहाखातर पुन्हा एकदा भेटीला येणार आहे. (‘Jivalaga’ to hit the Tv screens Soon)

2 मे पासून मिळणार मनोरंजनाची मेहवानी

View this post on Instagram

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

2 मे पासून दर रविवारी सायंकाळी 6 वाजता ही मालिका प्रेक्षकांना पाहाता येणार आहे. स्वप्निल जोशी, अमृता खानविलकर, सिद्धार्थ चांदेकर, मधुरा देशपांडे यांच्या दमदार अभिनयानं नटलेली ही मालिका पुन्हा पाहाता यावी अशी मागणी प्रेक्षक स्टार प्रवाह वाहिनीच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून करत होते.

मालिकेला 2 वर्षे पूर्ण झाल्यानं कलाकारांकडून व्हिडीओ शेअर

नुकतंच या मालिकेनं दोन वर्ष देखील पूर्ण केली आहेत. यानिमित्ताने मालिकेतल्या कलाकारांनी एक खास व्हिडीओ पोस्ट करत आनंद व्यक्त केला होता.या व्हिडीओला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळालाच शिवाय पुन्हा एकदा ही मालिका पाहायला मिळावी अशा कमेन्ट्सही करण्यात आल्या. त्यामुळेच स्टार प्रवाह वाहिनीवर ‘जिवलगा’ ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहाता येणार आहे.

प्रेक्षकांना मालिकेची गोडी

जिवलगा मालिकेतल्या प्रत्येक पात्रावर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलंय. मालिकेचं शीर्षकगीत आजही प्रेक्षकांच्या मनात रुंजी घालत आहे. त्यामुळेच जिवलगा मालिकेच्या या आठवणी पुन्हा एकदा ताज्या होणार आहेत. तेव्हा तुमच्या जिवलगांसोबत पाहायला विसरु नका स्टार प्रवाहची लोकप्रिय मालिका जिवलगा दर रविवारी सायंकाळी 6 वाजता.

संबंधिता बातम्या

Photo : ‘फूलों में कलियां में, प्यार की गलियों में’, मौनी रॉयचा हा बहारदार अंदाज पाहिलाय?

Photo : अभिनेत्री अविका गौरचं कुटुंब कोरोनाच्या विळख्यात, इन्स्टाग्रामवरून चाहत्यांना केलं ‘हे’ आवाहन

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI