Top 5 News | करीना कपूरच्या दुसऱ्या बाळाचं बारसं ते ‘देवमाणूस’ मालिकेचा प्रवास शेवटाकडे, वाचा मनोरंजन विश्वातील घडामोडी!

जर तुम्ही सोमवार म्हणजेच 9 ऑगस्ट 2021च्या मनोरंजन विश्वाशी संबंधित बातम्या चुकवल्या असतील, तर तुम्ही त्या मनोरंजन टॉप 5 मध्ये वाचू शकता.

Top 5 News | करीना कपूरच्या दुसऱ्या बाळाचं बारसं ते ‘देवमाणूस’ मालिकेचा प्रवास शेवटाकडे, वाचा मनोरंजन विश्वातील घडामोडी!
Top 5 News
Follow us
| Updated on: Aug 10, 2021 | 10:47 AM

मुंबई : दररोज मनोरंजन विश्वात काही छोट्या-मोठ्या बातम्या चर्चेत असतातच. चाहते त्यांच्या आवडत्या स्टार्सशी संबंधित बातम्या जाणून घेण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. मनोरंजन विश्वातील बातम्यांच्या दृष्टीनेही कालचा दिवस (9 ऑगस्ट) खूप महत्त्वाचा होता. मात्र, जर तुम्ही सोमवार म्हणजेच 9 ऑगस्ट 2021च्या मनोरंजन विश्वाशी संबंधित बातम्या चुकवल्या असतील, तर तुम्ही त्या मनोरंजन टॉप 5 मध्ये वाचू शकता.

सहा महिने लपवलं आता समोर आलं, करीनाच्या दुसऱ्या मुलाचं नाव माहिती आहे का ?

प्रसिद्ध अभिनेत्री करिना कपूर (Kareena Kapoor) आणि अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) यांच्या दुसऱ्या मुलाचे नाव अखेर सार्वजनिक झाले आहे. या दामपत्याच्या दुसऱ्या मुलाचे नाव जहांगीर (Jahangir) आहे. सैफ आणि करिना यांनी त्यांच्या दुसऱ्या मुलाला फेब्रुवारीमध्ये जन्म दिला. तेव्हापासून त्यांच्या या मुलाचे नाव गुलदस्त्यात होते. करीना कपूरने तुकत्याच प्रकाशित केलेल्या ‘करीना कपूर खान्स प्रेग्नन्सी बायबल’ या पुस्तकात तिच्या मुलाचे नाव देण्यात आले आहे.

रणबीर-आलिया यावर्षीच लग्न करणार! बॉलिवूडच्या चर्चित अभिनेत्रीचा मोठा दावा

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्या प्रेमप्रकरणाच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत. सध्या दोघेही एकमेकांबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवताना दिसतात. रणबीर आणि आलिया मीडियासमोरही एकत्र फोटो पोज देताना दिसतात. मात्र आता, दोघांचे लग्न कधी होणार याकडे चाहत्यांचे डोळे लागले आहेत. अशा परिस्थितीत आता अभिनेत्री लारा दत्ता (Lara Dutta) आपल्या एका मुलाखतीत रणबीर आणि आलियाच्या लग्नाविषयी बोलली आहे.

मराठी कलाकारांच्या आंदोलनाला भाजपचे समर्थन, आशिष शेलारांचा थेट सांस्कृतिक कार्यमंत्र्यांना फोन

लाँकडाऊन मुळे अडचणीत आलेल्या मराठी कलावंतांनी आज ठाकरे सरकारविरोधात राज्यभर आंदोलन केले. यातील एक आंदोलन आज दादर हिंदमाता येथे दादासाहेब फाळके यांच्या पुतळ्याजवळ करण्यात आले. आम्हाला आमचे म्हणणे सरकार पुढे मांडू द्या, अशी विनंती हे कलावंत सरकारकडे करीत होते. पण सरकारकडून चर्चेला वेळ मिळत नव्हती. अखेर या कलाकारांनी भोईवाडा पोलीस ठाण्यात जाऊन ठिय्या मांडला. याबाबतचे वृत्त समजताच भाजपा नेते आमदार अॅड. आशिष शेलार यांनी भोईवाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली. सोबत स्थानिक आमदार कालिदास कोळबंकरदेखील होते. त्यांनी अभिनेते विजय पाटकर आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच पोलीस अधिकाऱ्यांशीही संवाद साधला. तसेच त्यांच्या आंदोलनाला समर्थनही दिले.

अखेर खेळ संपणार, ‘देवमाणसा’चा मुखवटा कायमचा उतरणार!

छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका ‘देवमाणूस’ (Devmanus) आता शेवटच्या प्रवासाकडे सुरु झाली आहे. मालिकेत आता आणखी काही नवे खुलासे होणार आहेत. या सगळ्यादरम्यान प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन होणार आहे. मालिकेत मोठ्या ट्वीस्टसह डॉ. अजित कुमार देव उर्फ देवी सिंग आता पोलिसांच्या तावडीत सापडणार असून, त्याला कडक शिक्षा देखील होणार आहे. मालिकेचा नवा प्रोमो आता सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला असून, तो खूप चर्चेत आला आहे. या प्रोमोमध्ये देवीसिंग आपले सगळे गुन्हे कबुल करताना दिसला आहे. त्यामुळे आता त्याने स्वतःहून गुन्हे मान्य केल्याने त्याला फाशीच्या सुळाकडे नेले जात आहे. अर्थात या बोगस डॉक्टरला आता फासावर चढवले जाणार आहे.

घरचं प्रकरण सोडून शमिता शेट्टी ‘बिग बॉस’च्या घरात!

बिग बॉस 15 अर्थात Bigg Boss OTT हा कार्यक्रम सुरु झाला आहे. रविवारी वूटवर हा शो सुरू झाला. करण जोहर (Karan Johar) सध्या हा शो होस्ट करत, असून सर्व स्पर्धकांची नावे आता समोर आली आहेत. त्यापैकी सर्वात चर्चित नाव म्हणजे शिल्पा शेट्टीची (Shilpa Shetty) बहीण शमिता शेट्टीचे (Shamita Shetty) होते. शमिता शेट्टीने स्पर्धक म्हणून शोमध्ये प्रवेश केला आहे. राज कुंद्रा (Raj Kundra Case) प्रकरणाच्या दरम्यान शोमध्ये शमिताचे आगमन प्रत्येकासाठी थोडे धक्कादायक होते. पण आता शमिताने स्वतः या मागचे कारण सांगितले आहे.

हेही वाचा :

भुताटकीच्या अफवेतून चित्रपटाची कथा गवसली, ‘आयेगा आनेवाला’ने लता मंगेशकरांना ओळख मिळवून दिली!

कार्तिकने नाकारला स्वतःच्या मुलीला त्याचं नाव देण्याचा अधिकार, दीपाच्या आयुष्यात येणार नवं वळणं?

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.