442 रूपयांना दोन केळी विकणाऱ्या पंचतारांकित हॉटेलला उत्पादन शुल्क विभागाचा दणका

काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता राहुल बोस (Rahul Bose) चा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यामध्ये पंजाबमधील चंदीडगच्या एका पंचतारांकित हॉटेलने त्याला दोन केळींचं बिल तब्बल 442 रुपये पाठवल्याचा खुलासा त्याने केला होता. त्यानंतर प्रशासनाने या व्हिडीओची दखल घेत या हॉटेलवर कारवाई केली आहे.

Excise and tax department fine JW Marriott hotel, 442 रूपयांना दोन केळी विकणाऱ्या पंचतारांकित हॉटेलला उत्पादन शुल्क विभागाचा दणका

मुंबई : काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता राहुल बोस (Rahul Bose) चा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यामध्ये पंजाबमधील चंदीडगच्या एका पंचतारांकित हॉटेलने त्याला दोन केळींचं बिल तब्बल 442 रुपये पाठवल्याचा खुलासा त्याने केला होता. त्यानंतर प्रशासनाने या व्हिडीओची दखल घेत या हॉटेलवर कारवाई केली आहे. विशेष म्हणजे राहुलच्या वाढदिवशीच या हॉटेलवर कारवाई करण्यात आली आहे. आज राहुलचा 52वां वाढदिवस आहे. उत्पादन शुल्क विभागाने या हॉटेलवर कारवाई करत जवळपास 50 पटीने जास्त दंड ठोठावला आहे.

तीन दिवसांपूर्वी बुधवारी (24 जुलै) राहुल बोसने एक व्हिडीओ शेअर केला. हा व्हिडीओ पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. या व्हिडीओनुसार, राहुलने चंदीगडच्या पंचतारांकित ‘जेडब्ल्यू मॅरिएट्स’ हॉटेलमध्ये दोन केळींची ऑर्डर दिली. मात्र, या केळींचं बिल पाहून त्याला धक्काच बसला. हॉटेलने दोन केळींसाठी तब्बल 442 रुपयांचं बिल राहुलच्या रुममध्ये पाठवलं. राहुलने या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या. “शूटिंगमुळे मी या पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबलो आहे. व्यायामानंतर मी खाण्यासाठी दोन केळी मागवल्या. ऑर्डरनुसार, केळींसोबत बिलही आलं. जीएसटीसह हे बिल 442 रुपये आहे” असं राहुल म्हणाला.

डीएनए या वृत्तवाहिनीनुसार, दोन केळींसाठी मनमानी पैसे आकारणाऱ्या या हॉटेलवर उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली आहे. या हॉटेलवर तब्बल 25000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. इतकंच नाही ,तर उत्पादन शुल्क आणि कर विभागाने जेडब्ल्यू मॅरिएट्सकडील विक्रीची सर्व कागदपत्र जप्त केली आहेत. तसेच, हे हॉटेल नियमितपणे कर भरतं, की नाही त्याचाही तपास केला जात आहे. याशिवाय, ताजी फळं ही करमुक्त वस्तूंमध्ये येतात, त्यामुळे केळी इतकी महाग का विकली? याबाबत हॉटेल प्रशासनाला जाब विचारण्यात आला आहे, असं कर आयुक्त राजीव चौधरी यांनी सांगितलं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *