Video: सामना सुरु असताना युजवेंद्र चहलने कथित गर्लफ्रेंडला केले लिपलॉक किस? व्हिडीओ व्हायरल
सध्या सोशल एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये टीम इंडियाची मॅच सुरु असताना युजवेंद्र आणि आरजे महावशने लिपलॉक किस केल्याचे दिसत आहे.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील अंतिम सामन्यात टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड आमनेसामने होते. जगभरातील क्रिकेट चाहत्यांच्या नजरा या सामन्यावर खिळल्या होत्या. दुबईतील दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये खेळला जाणारा हा सामना लाइव्ह पाहण्यासाठीही हजारो चाहते उपस्थित होते. टीम इंडियातून बाहेर असलेला फिरकीपटू युजवेंद्र चहल देखील हजर होता. तेथे त्याच्यासोबत त्याची कथित गर्लफ्रेंड आरजे महावश देखील हजर होती. आता त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ते लिप लॉक किस करताना दिसत आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, धनश्री आणि युजवेंद्र चहल यांचा घटस्फोट झाला आहे. दरम्यान, दुबईमध्ये झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत चहल आरजे महावशसोबत स्पॉट झाला. दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल. त्यामुळे धनश्री आणि युजवेंद्र यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आले. आता त्या दोघांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये युजवेंद्र आणि महावश किस करताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला आहे.




View this post on Instagram
काय आहे व्हिडीओमागचे सत्य?
सोशल मीडियावर व्हायरल होत असणाऱ्या व्हिडीओमध्ये आरजे महविश आणि युजवेंद्र यांनी किस केले आहे. हा व्हिडीओ खरा आहे की नाही यात शंका आहे. कारण सोशल मीडियावर आजकाल एआयचा वापर करुन अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. हा व्हिडीओ खोटा असल्याचे अनेकांनी म्हटले आहे.
कोण आहे मिस्ट्री गर्ल?
युजवेंद्र चहलसोबत दिसणारी मुलगी ही आरजे मैहवश आहे. यापूर्वी देखील चहलचे तिच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पण ती चहलची केवळ मैत्रीण असल्याचे मैहवशने सांगितले होते. आता त्या दोघांना पुन्हा एकत्र पाहून त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.