AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

युद्धाच्या सावटात अडकलेल्या इस्त्रायली कुटुंबाला ‘ही’ लोकप्रिय मालिका देतेय दिलासा; अभिनेत्रीची भावूक पोस्ट

युद्धाच्या सावटात अडकलेल्या इस्रायली कुटुंबाला ही मराठी लोकप्रिय मालिका दिलासा देत आहे. या कुटुंबाने व्हिडीओद्वारे मालिकेबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. स्टार प्रवाह वाहिनीवरील ही लोकप्रिय मालिका आहे.

युद्धाच्या सावटात अडकलेल्या इस्त्रायली कुटुंबाला 'ही' लोकप्रिय मालिका देतेय दिलासा; अभिनेत्रीची भावूक पोस्ट
इस्त्रायली कुटुंबाला 'ही' लोकप्रिय मालिका देतेय दिलासाImage Credit source: Instagram
| Updated on: Apr 07, 2026 | 12:31 PM
Share

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेची लोकप्रियता आता महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून जगभरात पोहोचली आहे. गेल्या तीन वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी ही मालिका भारताबाहेरही तितक्याच उत्साहाने पाहिली जाते, याचं एक हृदयस्पर्शी उदाहरण नुकतंच समोर आलं. इस्त्रायलमध्ये सध्या सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीत अडकलेल्या एका कुटुंबाने या मालिकेबद्दलचं आपलं प्रेम व्यक्त केलं आहे. डॅनियल कुटुंबाने यासंदर्भात सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये कुटुंबीयांनी सांगितलं की, “सततच्या तणावपूर्ण वातावरणात ‘ठरलं तर मग’ ही मालिका आमच्यासाठी एक दिलासा ठरत आहे. आम्ही संपूर्ण कुटुंब एकत्र बसून ही मालिका पाहतो. आम्हाला ही मालिका खूप आवडते.” डॅनियल कुटुंबाने अर्जुन आणि सायली या मुख्य जोडीसोबतच प्रियाच्या अभिनयाचंही कौतुक केलं आहे.

सायलीची भूमिका साकारणाऱ्या जुई गडकरीने हा व्हिडिओ शेअर करत भावूक प्रतिक्रिया दिली. ‘गेले काही दिवस ‘ठरलं तर मग’ची संपूर्ण टीम खूप मेहनत करतेय. 45 मिनिटांचे एपिसोड रोज सुरु आहेत. काहीही झालं तरी ध्येय एकच.. एपिसोड थांबता कामा नये. अशातच जगाच्या वेगवेगळ्या भागात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीत अडकलेल्या आणि मराठी भाषिकही नसलेल्या इस्त्रायली प्रेक्षकांकडून कौतुकाची थाप मिळते, तेव्हा मेहनत सार्थकी लागल्यासारखं वाटतं. आपण आपल्या मालिकेच्या माध्यामातून अशा परिस्थितीत अडकलेल्या एका कुटुंबाला आनंद देऊ शकलो, याचा मला खूप जास्त आनंद आहे. देव करो आणि ते सगळे कायम सुखरुप राहो,’ अशी भावना जुईने व्यक्त केली.

पहा डॅनियल कुटुंबीयांचा व्हिडीओ-

या व्हिडीओवर सुचित्रा बांदेकर यांनीसुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. ‘धन्यवाद डॅनियल कुटुंब.. तुमचं प्रेम या व्हिडीओद्वारे आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल. तुम्हाला आनंदाचे काही क्षण आम्ही देऊ शकलो याचं समाधान निर्माते म्हणून आमच्या संपूर्ण सोहम प्रॉडक्शन परिवाराला आहे,’ असं लिहित बांदेकर यांनी डॅनियल कुटुंबाचे आभार मानले आहेत. ‘ठरलं तर मग’ ही टेलिव्हिजनवरील अत्यंत लोकप्रिय मालिका आहे. गेल्या तीन वर्षांत या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकत अनेक पुरस्कारदेखील पटकावले आहेत.

Follow Us
राज्याच्या राजकारणात होणार मोठी उलथापलथ, 45 दिवसांनी मोठं घडणार?
राज्याच्या राजकारणात होणार मोठी उलथापलथ, 45 दिवसांनी मोठं घडणार? शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याचा नेमका अर्थ काय?
कोल्हापूर हळहळलं! धाड... धाड... धाड... भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार
कोल्हापूर हळहळलं! धाड... धाड... धाड... भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार, चक्क…
मोठी बातमी! एका पाठोपाठ एक गाड्या आदळतच गेल्या; पश्चिम...
मोठी बातमी! एका पाठोपाठ एक गाड्या आदळतच गेल्या; पश्चिम द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात
मोठी बातमी! आधी नोटीस, आता पक्षाचे आमदारच... राष्ट्रवादीत काय घडतंय?
मोठी बातमी! आधी नोटीस, आता पक्षाचे आमदारच... अचानक दिलेल्या आदेशांमुळे राष्ट्रवादीत खळबळ
मनसे'मध्ये मोठ्या हालचाली! राज ठाकरेंनी तडकाफडकी... अचानक काय घडलं?
मनसे'मध्ये मोठ्या हालचाली! राज ठाकरेंनी तडकाफडकी... अचानक काय घडलं?
विठ्ठलाला 56 लाखांच्या सोन्याच्या पादुका! भाविकाकडुन कोट्यवधींच दान
Pandharpur | विठ्ठलाला 56 लाखांच्या सोन्याच्या पादुका! अज्ञात भाविकाकडुन कोट्यवधींचं दान
काटेवाडीत तुकोबांचं पहिलं रिंगण! ज्ञानोबा-तुकारामांच्या जयघोषात...
Baramati | काटेवाडीत तुकोबांचं पहिलं रिंगण! ज्ञानोबा-तुकारामांच्या जयघोषात दुमदुमली बारामती, भक्तिमय क्षण कॅमेऱ्यात कैद
पुणे हादरलं! बड्या राजकीय नेत्यांची नावं अन्... व्हिडीओ काढत बिल्डरने
पुणे हादरलं! बड्या राजकीय नेत्यांची नावं अन्... व्हिडीओ काढत बिल्डरने संपवलं जीवन
इथेनॉल पेट्रोलमुळे गाड्यांचा मृत्यू? कोल्हापुरात दुचाकीची अंत्ययात्रा
Kolhapur App Protest | इथेनॉल पेट्रोलमुळे गाड्यांचा मृत्यू? कोल्हापुरात थेट दुचाकीची अंत्ययात्रा; सरकारविरोधात जोरदार आंदोलन
यावेळी चाकू नाही चक्क लोखंडी... मुंबई लोकलमध्ये रक्तरंजीत राडा!
Mumbai Local | यावेळी चाकू नाही चक्क लोखंडी... मुंबई लोकलमध्ये पुन्हा रक्तरंजीत राडा! काय घडलं?
सिया-चेतनचा हादरवून टाकणारा कांड, जपानी व्हिडीओ पाहून केतनला…  चकवा देण्यासाठी असा होता प्लॅन!.

सिया-चेतनचा हादरवून टाकणारा कांड, जपानी व्हिडीओ पाहून केतनला… चकवा देण्यासाठी असा होता प्लॅन!

सुनेत्रा पवारांनी राज्याचं नेतृत्त्व करावं, मुख्यमंत्री म्हणून…बड्या मंत्र्याचं थेट विधान; महायुतीत नेमकं काय घडतंय?.

सुनेत्रा पवारांनी राज्याचं नेतृत्त्व करावं, मुख्यमंत्री म्हणून…बड्या मंत्र्याचं थेट विधान; महायुतीत नेमकं काय घडतंय?

GK : भारतातील एकमेव राज्य, जेथे इन्कम टॅक्सची झंझटच नाही, बिनधास्त संपत्ती कमवा...

GK : भारतातील एकमेव राज्य, जेथे इन्कम टॅक्सची झंझटच नाही, बिनधास्त संपत्ती कमवा..

मोठी बातमी! पुढील दीड महिन्यात राज्यात मोठे फेरबदल? फडणवीस, शिंदेंच्या दिल्ली वाऱ्या वाढल्या.

मोठी बातमी! पुढील दीड महिन्यात राज्यात मोठे फेरबदल? फडणवीस, शिंदेंच्या दिल्ली वाऱ्या वाढल्या

IND vs ENG, 2nd ODI: विराट कोहलीने पाचव्या चेंडूवर चौकार मारत रचला विक्रम, काय केलं ते वाचा.

IND vs ENG, 2nd ODI: विराट कोहलीने पाचव्या चेंडूवर चौकार मारत रचला विक्रम, काय केलं ते वाचा

Puri Rath Yatra 2026 : भगवान जगन्नाथ रथ यात्रेदरम्यान चेंगराचेंगरी, 200 जण जखमी, एकाचा मृत्यू.

Puri Rath Yatra 2026 : भगवान जगन्नाथ रथ यात्रेदरम्यान चेंगराचेंगरी, 200 जण जखमी, एकाचा मृत्यू