‘त्याने मला जीवे मारण्याची धमकी दिली’, प्रसिद्ध अभिनेत्रीने बिग बींवर केला होता आरोप
एका प्रसिद्ध अभिनेत्रीने अमिताभ बच्चन यांच्यावर गंभीर आरोप केले होते. 'बिग बींनी मला जीवे मारण्याची धमकी दिली आहे' असे म्हणत त्या अभिनेत्रीने सर्वांचे लक्ष वेधले.

बॉलिवूड कलाकारांचे आयुष्य हे कायमच चर्चेत असते. त्यांचे अफेअर, ब्रेकअप, लग्न या सर्व गोष्टी नेहमीच चाहत्यांना जाणून घ्यायच्या असतात. कधीकधी अभिनेत्रींनी त्यांच्या खासगी आयुष्याबाबत स्वत: खुलासा केला आहे. या अभिनेत्री काही चांगल्या तर काही वाईट अनुभवदेखील शेअर करतात. ७०च्या दशकात एका अभिनेत्रीने थेट बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांच्यावर आरोप केला होता. त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप अभिनेत्रीने केला होता. आता ही अभिनेत्री कोण होती चला जाणून घेऊया…
अभिनेत्री परवीन बॉबीने बॉलिवूडचा एक काळ गाजवला होता. त्यांचे व्यावसायिक आयुष्य जितके यशस्वी होते तितकेच खासगी आयुष्य कठीण होते. त्याकाळी त्यांचा चाहता वर्ग इतका होता की त्यांनी मोठ्यामोठ्या सुपरस्टारला मागे टाकले होते. पण आयुष्याच्या शेवटच्या काळात त्यांच्या आयुष्यात अनेक गोष्टी घडत होत्या. त्या अगदी एकट्या पडल्या होत्या. त्या नैराश्यामध्ये गेल्याचे म्हटले जाते.
परवीन बॉबी या खऱ्या आयुष्यात खऱ्या प्रेमाच्या शोधात होत्या. पण त्यांच्या नशीबात प्रेम लिहिले नव्हते. चित्रपटांमध्ये तर त्यांना प्रचंड प्रेम मिळत होते पण खऱ्या आयुष्यात मात्र त्यांना कधीही प्रेम मिळाले नाही. परवीन यांनी अमिताभ यांच्यासोबत ‘दीवार’, ‘अमर अकबर अँथनी’, ‘शान’ आणि ‘कालिया’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले. दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरली होती. पण, एक दौर सिनेमाच्या वेळी त्यांनी बिग बींवर गंभीर आरोप केले होते. अमिताभ यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप परवीन बॉबी यांनी केला होता. तसेच मारण्यासाठी बिग बींनी गुंड पाठवल्याचे देखील परवीन यांनी म्हटले होते.
ही घटना परवीन बॉबी या एका गंभीर मानसिक आजाराचा सामना करत असतानाची आहे. त्यांना पॅरानॉइड सीजोफ्रेनिया हा आजार झाला होता. ७०च्या दशकात जेव्हा महिलांची प्रतिमा ही साध्या सरळ महिलांची असायची तेव्हा परविनने बोल्ड भूमिका साकारल्या होत्या. त्यांच्या या भूमिकांनी महिलांची प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न केला होता. जेव्हा परवीन बॉबीचे करिअर यशाच्या शिखरावर होते तेव्हा ती महेश भट्ट यांच्या प्रेमात होती. त्यांनी कठीण काळात परवीन बॉबीची साथ दिली. पण काही कारणास्तव त्यांना वेगळे व्हावे लागले. २० जानेवरी २०२५मध्ये परवीन बॉबीचे निधन झाले.
