बिग बॉस 19 मध्ये ‘या’ प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडिअनची भव्य एन्ट्री; त्याला पाहताच घरातील सदस्यांची बोलतीच बंद
बिग बॉस 19 मध्ये एका प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडिअनची भव्य एन्ट्री झाली आहे. त्याने शोमध्ये येताच घरातील सर्व सदस्यांना रोस्ट केलं आहे. तसेच शोमध्ये त्याने सर्व सदस्यांवर एवढे कमेंट्स केले की घरच्यांची बोलतीच बंद केली. कोण आहे हा कलाकार?

रिअॅलिटी शो “बिग बॉस” आता हळू हळू रंगत चालला आहे. बिग बॉस सीझन 19 हा सुरुवातीपासूनच चर्चेचा विषय राहिला आहे. आता या शोमधील वाद, सदस्यांचे गे प्लान पाहणे मनोरंजक ठरत आहेत. स्पर्धकांमधील भांडणे, मैत्री आणि तीव्र टास्कमुळे शो आणखी आकर्षक झाला आहे. नुकतीच बिग बॉस सीझन 19 मध्ये मालती चहरची वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली होती. आणि त्यानंतर घरातील वातावरण पुन्हा बदललेले पाहायला मिळालं. मालतीने आल्याआल्याच चर्चा मिळवली आहे. पण आता अजून एकाची शोमध्ये भव्य एन्ट्री झाली आहे. त्या नवीन सदस्याला पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. बिग बॉस 19 मध्ये झालेली ही एन्ट्री म्हणजे प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन रवी गुप्ताची.
बिग बॉसमध्ये या स्टँडअप कॉमेडिअनची भव्य एन्ट्री
रवी गुप्ताने बिग बॉस शोमध्ये प्रवेश करताच स्पर्धकांची बोलतीच बंद केली. त्याने शोमध्ये घरातील सर्व सदस्यांची खिल्ली उडवली. त्याने सर्वांनाच खूप रोस्ट केलं. जिओ हॉटस्टारने इन्स्टाग्रामवर शोचा प्रोमो रिलीज केला, ज्यामध्ये रवी गुप्ताच्या एन्ट्रीने प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढवली आहे. या प्रोमोमध्ये सलमान खान रवीचे मनापासून स्वागत करताना दिसत आहे तसेच त्याला विचारताना दिसत आहे की त्याला घरातील सदस्य कसे वाटले. यावर रवीने अगदी विनोदी पद्धतीने उत्तर दिले. त्याचे उत्तर ऐकताच सलमान खानही त्याचं हसणं थांबवू शकला नाही.
View this post on Instagram
रवीने हळूहळू घरातील सर्व दस्यांना रोस्ट केलं आहे
त्यानंतर रवी हळूहळू घरातील इतर सदस्यांना रोस्ट करताना दिसत आहे. तसेच प्रोमोमध्ये तो अमाल मलिकचीही खिल्ली उडवताना दिसतो तो म्हणतो “दिवसा इतका मधुर असलेला अमाल भाई रात्री इतका भयंकर कसं काय घोरू शकतो?” तसेच प्रणितला तो म्हणाला, “प्रणित शेरा भाईचा नंबर विचारत होता. शेरा भाई काय म्हणाला हे माहितीये का? जेव्हा हा बिग बॉस सीझन संपेल आणि सर्वजण घरी जातील, तेव्हा तुम्ही एकटे राहाल आणि सलमान भाई तुम्हाला एकट्यात भेटायला येतील.” अशापद्धतीने रवीच्या येण्याने घरातील वातावरण हलकं-फुलकं आणि विनोदी वातावरणाने भरलेलं दिसत आहे.
नॉमिनेटड सदस्य
शोच्या ताज्या अपडेट्सनुसार, बिग बॉसशी संबंधित सोशल मीडिया पेजेसनुसार, या आठवड्यात चार स्पर्धकांना घराबाहेर काढण्यासाठी नामांकित करण्यात आले आहे. मृदुल तिवारी, मालती चहर, गौरव खन्ना आणि नीलम गिरी यांना या आठवड्यात नॉमिनेट करण्यात आलं आहे.
