AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अरबाज खानच्या कारमध्ये विक्षिप्त पुरुषाची बळजबरी एन्ट्री…, पुढे असं काही घडलं ज्यामुळे…

अभिनेता अरबाज खान याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अरबाज याच्या कारमध्ये एका विक्षिप्त पुरुषाने बळजवरी एन्ट्री केली... ज्यामुळे अभिनेत्याच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतं... घडलेल्या घटनेचा व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे.

अरबाज खानच्या कारमध्ये विक्षिप्त पुरुषाची बळजबरी एन्ट्री..., पुढे असं काही घडलं ज्यामुळे...
अभिनेता अरबाज खान
| Updated on: Jun 16, 2026 | 9:35 AM
Share

Arbaaz Khan Security Breach: बॉलिवूड अभिनेता आणि निर्माता अरबाज खान याच्याबद्दल मोठी अपडेट समोर येत आहे. अभिनेत्याच्या सुरक्षेत मोठी गडबड झाली आहे. अरबाज याच्या सुरक्षेत झालेल्या बेजबाबदारीमुळे इंटरनेटवर संतापाचं वातावरण दिसत आहे. सांगायचं झालं तर, अरबाज एका इव्हेंटसाठी पोहोचलेला. इव्हेंट संपातच त्याच्या कारमध्ये एक विक्षिप्त चाहता बळजबरी बसला. त्यानंतर त्याला अभिनेत्याच्या बॉडीगार्डने बाहेर काढला आणि त्याला मारहाण देखील केली. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे… तर जाणून घ्या संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे.

अरबाज खान याच्या कारमध्ये घुसला फॅन…

मिळालेल्या माहितीनुसार, नुकताच अरबाज कोलकाता येते एका कार्यक्रमासाठी पोहोचलेला. कार्यक्रम संपल्यानंतर अरबाज त्याच्या कारच्या दिशेने निघाला. पण अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांच्या गर्दीत एक, चाहते थेट त्याच्या कारमध्ये जाऊन बसला…

चाहता कसा अरबाज याच्या कारमध्ये जाऊन बसला, याबद्दल अरबाज आणि त्याच्या बॉडीगार्ड्स यांना देखील कळलं नाही. चाहता थेट अभिनेत्याच्या कार जवळ पोहोचला आणि दरवाजा खोलून कारमध्ये बसला… या नंतर परिसरातील वातावरण बदललं आणि सर्वत्र खळबळ उडाली.

त्या व्यक्तीच्या अशा कृत्यानंतर अरबाज खानचे बाउन्सर आणि बॉडीगार्ड्स त्वरित सक्रिय झाले. त्यांनी त्या माणसाला गाडीतून बाहेर ओढून काढलं. तरीही तो शांत झाला नाही आणि बॉडीगार्ड्सशी झटापट करू लागला; परिणामी, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अभिनेत्याच्या बाउन्सरनी त्याला मारहाण केली. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, घटनास्थळी उपस्थित काही लोक “त्याला मारा!” असे ओरडतानाही ऐकू येतात.

कशी होती अरबाज खान याची प्रतिक्रिया…

संपूर्ण घटने दरम्यान, अरबाज खान घाबरल्याचं दिसून आलं. तर काही मिनिटांत सिक्योरिटीने जमलेल्या गर्दीला बाजूला केलं. त्यानंतर अरबाज खान त्याच्या गाडीपर्यंत पोहोचला. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओवर नेटकरी कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा