Akshaye Khanna : याला ऑस्कर द्या… ‘धुरंदर’मधला अक्षय खन्ना याचा ‘रेहमान डकैत’ सुपरहिट, प्रसिद्ध दिग्दर्शकही फिदा

'धुरंधर' चित्रपटाची सध्या सगळीकडेच चर्चा होत आहे. बॉक्स ऑफीसवरही या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. मात्र सर्वात जास्त चर्चेत आहे तो'रेहमान डकैत'ची भूमिका गाजवणारा अक्षय खन्ना . त्याच्या कामाचं सगळीकडून कौतुक होत आहे. सामान्य प्रेक्षक तर त्याच्यावर फिदा आहेतच, पण आता बॉलिवूडमधील नामवंत दिग्दर्शकानेही अक्षयचं भरभरून कौतुक केलं आहे. त्याला थेट ऑस्कर देण्याची मागणी केली आहे.

Akshaye Khanna : याला ऑस्कर द्या... धुरंदरमधला अक्षय खन्ना याचा रेहमान डकैत सुपरहिट, प्रसिद्ध दिग्दर्शकही फिदा
अक्षय खन्नाला ऑस्कर द्या...
Image Credit source: social media
| Updated on: Dec 17, 2025 | 9:44 AM

रणवीर सिंह, अक्षय खन्ना, संजय दत्त, अर्जुन रामपाल, सारा अर्जुन आणि आर माधवन यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘धुरंधर’चा (Durandhaa) सध्या बॉक्स ऑफीसवर धुमाकूळ सुरू आहे. गेल्या आठवड्यात ( 5 डिसेंबर) रिलीज झालेल्या या चित्रपटाने धमाकेदार सुरूवात केली आहे. या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) हा जरी मुख्य भूमिकेत असला तरी अक्षय खन्ना (Akshaye Khanna)या हिऱ्याचीच सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. आधी ‘छावा’ आणि आता ‘धुरंधर’ दोन्हीमध्ये नकारात्मक भूमिकाही तितक्याच ताकदीने साकारणाऱ्या अक्षयचे सगळेच फॅन झाले आहेत. अक्षय खन्नासारखा व्हिलन समोर येतो तेव्हा तो चित्रपटातील हिरोवरही भारी पडतो. धुरंधर मधल्या अक्षयच्या भूमिकेमुळे जळी स्थळी काष्ठी पाषाणी त्याचीच चर्चा असून सोशल मीडियावरही त्याच्या कौतुकाचे पूल बांधले जात आहेत.

सामान्य प्रेक्षकांना तर अक्षयचं काम तूफान आवडलं आहेच. थिएटर मधून ‘धुरंधर’ पाहून निघालेला प्रत्येक जण त्याचं भरभरून कौतुक करत आहेच. पण बॉलिवूडमध्येही अनेक जण त्याच्या कामाचे चाहते ठरले आहेत. प्रसिद्ध दिग्दर्शक फराह खान हिनेही या चित्रपटाचं, आदित्य धर याच्या दिग्दर्शनाचं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अक्षय खन्नाच्या भूमिकेच प्रचंड कौतुक केलं आहे. तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत अक्षयची खूप तारीफ केली आहे. एवढंच नव्हे तर अक्षयला थेट ऑस्कर मिळालं पाहिजे, अशीही मागणी तिने केली आहे.

फराह खान झाली अक्षय खन्नाची फॅन

धुरंधरमध्ये अक्षय खन्ना हा रेहमान डकैत याच्या (नकारात्मक) भूमिकेत दिसत आहे. व्हिलन असूनही त्याच्या भूमिकेचं, कामाचंच सर्वात जास्त कौतुक होत असून तो सिनेमाचा मोठा हायलाईट ठरला आहे. या चिकत्पटात अक्षय खन्नाची एंट्री एका गाण्आवर होते. ती एंट्री, ते गाणं सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झालं असून प्रत्येकाच्या तोंडी तेच गाण आहे. अक्षय खन्नाच्या एंट्रीची क्लिप कापून, लोक सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. त्यामध्ये आता दिग्दर्शिका फराह खानचाही समावेश झाला आहे. तिने एक पोस्ट टाकत अक्षयचं खूप कौतुक केलं आहे. “अक्षय खन्नाला ऑस्कर मिळाला पाहिजे” असंही तिने त्या पोस्टमध्ये खाली लिहीलं आहे.

दुसरा पार्ट कधी ?

आदित्य धरने दिग्दर्शित केलेल्या धुरंधरच्या पहिल्या भागाच्या शेवटीच, त्याच्या दुसऱ्या पार्टबद्दलही सांगण्यात आलं आहे. रिपोर्ट्सनुसार, 19 मार्च 2026 ला धुरंधरचा दुसरा पार्ट हा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. तो पाहण्यासाठीही प्रेक्षक
खूप उत्सुक आहेत.