AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शाहरुख खानला चूक भोवणार? FDA च्या नोटिशीवर तुकाराम मुंढेंची मोठी माहिती; नेमकं काय सांगितलं?

शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ या तिघांना पान मसाला जाहिरातीबाबत FDAने नोटीस पाठवली. यामागे नेमकं कारण काय आणि शाहरुखचा त्यावर काय रिप्लाय आला, हे तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केलं. काय आहे संपूर्ण प्रकरण ?

शाहरुख खानला चूक भोवणार? FDA च्या नोटिशीवर तुकाराम मुंढेंची मोठी माहिती; नेमकं काय सांगितलं?
Actor Shah Rukh Khan
| Updated on: Aug 26, 2026 | 6:59 PM
Share

महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाच्या (FDA) धडाकेबाज कारवायाची राज्यभरात चर्चा असून अनेकांचं धाबं दणाणलं आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी एफडीएकडून अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) , अजय देवगण (Ajay Devgn) आणि टायगर श्रॉफ यांनाही नोटीस बजावण्यात आली होती. या तिघांनी मिळून केलेल्या ‘विमल इलायची’ची जाहिरात केली होती, त्याचसंदर्भात ही नोटीस असून या तिघांनाही कारणं दाखवा नोटीस बजावण्यात आली. त्यामुळे किंग खान अर्थात अभिनेता शाहरुख कान पुन्हा चर्चेच आला होता. याच प्रकरणी आता अन्न व औषध प्रशासनाचे कमिश्नर तुकाराम मुंढे (Tukram Mundhe) यांनी मौन सोडलं असून या नोटीशीवर शाहरुखचा काय रिप्लाय आला तेही त्यांनी सांगितलं.

काय म्हणाले तुकाराम मुंढे ?

टायगर श्रॉफ, अजय देवगण आणि शाहरुख या तिघआंना एफडीने नोटीस पाठवली. यावर बोलताना तुकाराम मुंढे यांनी सांगितलं की, सेलिब्रिटींना पाठवलेल्या नोटिसा सरोगेट जाहिरातींशी संबंधित आहेत. त्यांच्या मते, एखाद्या उत्पादनाची जाहिरात करताना त्याबद्दल केले जाणारे दावे खरे आणि अचूक असणं गरजेचं आहे. हे नियम नव्याने तयार केलेले नाहीत. ते 2018 मध्ये खाद्य क्षेत्रासाठी लागू करण्यात आले आणि 2019 पासून त्यांची अंमलबजावणी सुरू झाली. जाहिरातींमधून ग्राहकांची दिशाभूल होऊ नये, हा या नियमांचा मुख्य उद्देश आहे.

शाहरुखचा रिप्लाय काय ?

मात्र या नोटीशीवर अभिनेता शाहरुख खानने अद्याप काहीही रिप्लाय आलेला नाही. शाहरुख खानकडून अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही, असं मुंढे यांनी स्पष्ट केलं. मात्र त्यामुळे आता यावर एफडीएकडून काय भूमिका घेण्यात येते, काही कारवाई होते का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

काय आहे प्रकरण ?

महाराष्ट्र FDAने विमल इलायचीच्या जाहिरातीची गंभीर दखल घेत तिच्या स्वरूपाबाबत चौकशी सुरू केली आहे. ‘विमल’ हा ब्रँड प्रामुख्याने पान मसाल्याशी जोडला जात असल्याने, त्याच नावाने करण्यात येणाऱ्या इलायचीच्या जाहिरातीमुळे ग्राहकांच्या मनात पान मसाल्याच्या ब्रँडची अप्रत्यक्षपणे आठवण निर्माण होऊ शकते, असा FDAचा युक्तिवाद होता. त्यामुळे ही जाहिरात सरोगेट किंवा अप्रत्यक्ष जाहिरात ठरते का, याची चौकशी FDAकडून सुरू करण्यात आली.

 

Follow Us
6 सेकंदातच... धाडकन कोसळला लोखंडी ब्रीज, नेपाळमधील पुराची भयावह दृश्य
6 सेकंदातच... धाडकन कोसळला लोखंडी ब्रीज, नेपाळमधील पुराची भयावह दृश्य समोर, भारतातील या राज्यावरही मोठं संकट
MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; थेट अपर सचिवाला अटक
MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई;  थेट अपर सचिवाला अटक
मनोज जरांगे पाटलांना आंदोलनाआधीच मोठा धक्का; गृह विभागाने थेट...
मनोज जरांगे पाटलांना आंदोलनाआधीच मोठा धक्का; गृह विभागाने थेट... नेमकं काय घडलं?
अमरावतीत लहान लेकरं होरपळले अन् पालकमंत्री पाणीपुरी खातात मग...
अमरावतीत लहान लेकरं होरपळले अन् पालकमंत्री पाणीपुरी खातात मग... सुषमा अंधारे संतापल्या
थरकाप उडवणारे दृश्य! पूराच्या हाहाकारात 132 भारतीय पर्यंटकांचा मृत्यू
थरकाप उडवणारे दृश्य! नेपाळमध्ये पुराचा हाहाकार; 132 भारतीय पर्यटकांचा दुर्दैवी अंत
कर्नाटकात वंदे मातरम् केवळ दोन कडवी गायली जाणार-डी.के. शिवकुमार
कर्नाटकात वंदे मातरम् केवळ दोन कडवी गायली जाणार
राजकीय हालचालींना वेग! सुप्रिया सुळे पुन्हा मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
राजकीय हालचालींना वेग! सुप्रिया सुळे पुन्हा मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार; कारण...
मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षातील खासदारांच्या बैठकीची इनसाइड स्टोरी समोर
मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षातील खासदारांच्या बैठकीची इनसाइड स्टोरी समोर, नेत्यांना दिलं सर्वात मोठं आश्वासन
लाईव्ह लोकेशन सांगा मी आत्ताच... अंधारेंनी आयुक्तांना धारेवर धरलं
लाईव्ह लोकेशन सांगा मी आत्ताच... अंधारेंनी अमरावतीतील प्रकरणानंतर आयुक्तांनाच धारेवर धरलं
एमपीएससी औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणी 6 आरोपींना अटक
MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; तीन अधिकाऱ्यांसह सहा जणांना अटक