Gangubai Kathiawadi Teaser : संजय भन्सालींच्या वाढदिवसाचे मोठे सरप्राईज, पाहा ‘गंगूबाई काठियावाडी’चा जबरदस्त टीझर!

'गंगूबाई काठियावाडी' हा चित्रपट प्रसिद्ध लेखक हुसेन जैदी यांच्या 'माफिया क्वीन्स ऑफ मुंबई' या पुस्तकाच्या एका अध्यायावर आधारित आहे.

Gangubai Kathiawadi Teaser : संजय भन्सालींच्या वाढदिवसाचे मोठे सरप्राईज, पाहा ‘गंगूबाई काठियावाडी’चा जबरदस्त टीझर!
गंगुबाई काठियावाडी टीझर
Follow us
| Updated on: Feb 24, 2021 | 5:09 PM

मुंबई : ‘गंगूबाई काठियावाडी’च्या भूमिकेत आलिया भट्टला (Alia Bhatt) पाहण्यासाठी तिचे चाहते उत्साही झाले आहेत. आज (24 फेब्रुवारी) ‘गंगूबाई काठियावाडी‘ चित्रपटाचा टीझर (Gangubai Kathiawadi Teaser) प्रदर्शित झाला आहे. या टीझर प्रदर्शनासाठी खास आजचा दिवस निवडला गेला, कारण 24 फेब्रुवारी हा चित्रपटाचे निर्माता संजय लीला भन्साळी यांचा वाढदिवस आहे. या खास प्रसंगी टीझर रिलीज करून प्रेक्षकांन या चित्रपटाची पहिली झलक दाखवली गेली (Gangubai Kathiawadi Teaser release on the special occasion of sanjay leela bhansali birthday).

आलिया भट्टने तिच्या अधिकृत सोशल मीडियावर ‘गंगूबाई काठियावाडी’चा टीझर शेअर केला आहे. टीझर शेअर करताना आलिया लिहिते, ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा सर. मला वाटते की, तुमचा वाढदिवस साजरा करण्याचा आणखी चांगला कोणताही मार्ग नसेल. सादर करत आहे माझ्या मनातली खास गोष्ट..’

(Gangubai Kathiawadi Teaser release on the special occasion of sanjay leela bhansali birthday).

येथे पहा टीझर :

आलिया भट्ट प्रथमच पडद्यावर पूर्णपणे वेगळ्या अवतारात दिसणार आहे. यापूर्वी तिने असे पात्र कधीच साकारलेले नाही. टीझरपूर्वी चित्रपटाचे एक पोस्टरदेखील प्रसिद्ध करण्यात आले होते. पोस्टरमध्ये आपल्याला आलिया भट्ट खुर्चीवर बसलेली दिसली होती. त्यात आलिया भट्टचा अतिशय साधा लूक दिसला होतं. पोस्टरसह चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. हा चित्रपट 30 जुलै 2021 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

कोण होत्या गंगूबाई काठियावाडी?

गंगूबाई काठियावाडी ही मुंबईची एक चर्चित माफिया होती, तिला तिच्या पतीने अवघ्या 500 रुपयात विकले होते. या सिनेमात गंगूबाईच्या जीवनातील संघर्ष दाखवण्यात येणार आहे. अगदी लहान वयात तिचे कसे एका मोठ्या माणसासोबत लग्न लावून दिले गेले आणि या माणसाने कशा प्रकारे तिचा सौदा केला, या भोवती या चित्रपटाचे कथानक फिरणार आहे (Gangubai Kathiawadi Teaser release on the special occasion of sanjay leela bhansali birthday).

‘गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपट प्रसिद्ध लेखक हुसेन जैदी यांच्या ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ या पुस्तकाच्या एका अध्यायावर आधारित आहे. या चित्रपटाद्वारे संजय लीला भन्साळी आणि आलिया भट्ट प्रथमच एकत्र काम करत आहेत. या चित्रपटात आलिया भट्ट व्यतिरिक्त अजय देवगण आणि विक्रांत मेस्सी देखील महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहेत.

‘गंगुबाई’मागील वादाचा ससेमिरा…

‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ या पुस्तकाच्या धर्तीवर संजय लीला भन्साळी यांना गंगूबाई काठियावाडी यांचे जीवन आणि त्यांचा संघर्ष मोठ्या पडद्यावर दाखवायचा आहे. परंतु, त्याआधीच हा चित्रपट अडचणीत आला होतं. एका प्रसिद्ध वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, गंगूबाईच्या मुलाने असे म्हटले आहे की, हुसेन जैदीच्या पुस्तकाचे काही भाग त्यांचे वैयक्तिक आयुष्य चव्हाट्यावर आणणारे असून, यामुळे कुटुंबाची बदनामी होऊ शकते. त्यामुळे चित्रपटाचे चित्रीकरण त्वरित थांबवावे आणि पुस्तकातील काही आक्षेपार्ह भाग चित्रपटाच्या कथेतून वगळावेत, अशी त्यांची इच्छा आहे.

आलिया भट्ट, संजय लीला भन्साळी आणि हुसेन जैदी यांच्याविरूद्ध महिलांचे आक्षेपार्ह तसेच, एखाद्याचे गोपनीय वैयक्तिक आयुष्य प्रसारित केल्याबद्दल गंगुबाई याचा मुलगा बाबूजी रावजी शाह यांचे वकील फौजदारी तक्रार दाखल करू शकतात, अशी शक्यता देखील वर्तवण्यात येत होती.

(Gangubai Kathiawadi Teaser release on the special occasion of sanjay leela bhansali birthday)

हेही वाचा :

आलिया भट्टचा ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपट ओटीटीवर झळकणार!

भन्साळींच्या ‘गंगुबाई’ मागे वादाचा ससेमिरा, आणखी एका कायदेशीर नोटिसीशी सामना!

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.