AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिनेत्रीला अचानक सुरु झाल्या प्रसुती वेदना; स्वतः ड्राईव्ह करत रुग्णालयात पोहोचली आणि…

प्रसुती वेदना सुरु झाल्यामुळे प्रसिद्ध अभिनेत्री स्वतः ड्राईव्ह करत रुग्णालयात पोहोचली त्यानंतर मात्र..., वयाच्या ४० व्या वर्षी अभिनेत्रीने दिला गोंडस मुलाला जन्म...

अभिनेत्रीला अचानक सुरु झाल्या प्रसुती वेदना; स्वतः ड्राईव्ह करत रुग्णालयात पोहोचली आणि...
| Updated on: Sep 12, 2023 | 10:49 AM
Share

मुंबई : 12 सप्टेंबर 2023 | बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्रींनी त्यांच्या डिलिव्हरीच्या अनुभवाबद्दल सांगितलं आहे. एवढंच नाही तर, अनेक अभिनेत्रींनी फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. आता बॉलिवूडच्या आणखी एका अभिनेत्रीने बाळाला जन्म देण्याआधी आलेल्या प्रसंगाचा खुलासा केला आहे. सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगत आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री गौहर खान आहे. गौहर खान हिने वयाच्या ४० व्या वर्षी गोंडस मुलाला जन्म दिला. आता अभिनेत्री मुलासोबत फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त गौहर खान हिची चर्चा रंगत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नुकताच गौहर खान हिने तिच्या प्रसूती दिवसाचा अनुभव शेअर केला. अभिनेत्री म्हणाली, ‘ डॉक्टरांची अपॉईंटमेंट होती. मी रुग्णालयात जात होती. तेव्हा मी स्वतः ड्राईव्ह करत होते. तेव्हाच मला प्रसुती वेदना सुरु झाल्या. तेव्हा माझ्या सोबत पती जैद देखील होता. तो माझ्या बाजूच्या सीटवर पोहोचला होता… पण पूर्ण  रुग्णालयापर्यंत मी गाडी चालवली…’

गौहर खान हिला ड्राईव्ह करायला प्रचंड आवडतं. पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘मला ड्राईव्ह करायला प्रचंड आवडतं. पूर्ण प्रग्नेंसीमध्ये मी गाडी चावली. पण जैद कायम माझ्या बाजूला असायचा.. डिलिव्हरीच्या दिवशी देखील मी स्वतःगाडी चालवत रुग्णालयात पोहोचली..’ सध्या सर्वत्र गौहर खान हिची चर्चा रंगली आहे.

प्रेग्नेंसी दरम्यान, प्रसुती वेदना सुरु झाल्यानंतर अभिनेत्री ४.३० वाजता रुग्नालयात पोहोचली. त्यानंतर ९.३० वाजता अभिनेत्रीने गोंडस मुलाला जन्म दिला. चार महिन्यांपूर्वी अभिनेत्रीने मुलाला जन्म दिला. सध्या गौहर मुलगा झिहान याच्यासोबत वेळ व्यतीत करत आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर देखील मुलासोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

डिलिव्हरीनंतर अभिनेत्रीने कमी केलं १० किलो वजन

गौहर खानने प्रसूतीनंतर १० दिवसांत १० किलो वजन कमी केलं. अभिनेत्री कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून वजन कमी करण्याच्या टिप्स देते. गौहर सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना