AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gaurav Khanna-Akanksha Chamola : आधी घटस्फोटाची घोषणा, नंतर म्हणाली बायसेक्शुअल; पण गौरव खन्ना समोर येताच आकांक्षा..

प्रसिद्ध अभिनेता गौरव खन्ना सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. त्याची पत्नी आकांक्षा चमोला सध्या 'लॉकअप 2' या रिॲलिटी शोमध्ये सहभागी झाली असून गौरव आणि तिचा घटस्फोट होणार असल्याचा गौप्यस्फोट तिने नुकताच केला होता. नुकताच गौरव या शोमध्ये पोहोचला, तेव्हा आकांक्षाला पाहून तो जे बोलला त्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

Gaurav Khanna-Akanksha Chamola : आधी घटस्फोटाची घोषणा, नंतर म्हणाली बायसेक्शुअल; पण गौरव खन्ना समोर येताच आकांक्षा..
गौरव खन्ना - आकांक्षा चमोला
| Updated on: Jul 09, 2026 | 11:48 AM
Share

‘लॉकअप 2’ हा रिॲलिटी शो सध्या बराच चर्चेत असून सोशल मीडियावरही ट्रेंड होतोय. या शोमध्ये अनेक सेलिब्रिटी स्पर्धक असून टीव्हीवरचा प्रसिद्ध अभिनेता गौरव खन्ना याची पत्नी आकांक्षा चमोलाही या शोमध्ये सहभागी झाली आहे. आल्यावर पहिल्या दिवसापासूनच तिने केलेल्या विविध खुलाशांमुळे प्रचंड खळबळ माजली असून चाहत्यांनाही धक्का बसलाय. शोमध्ये आल्या आल्याच आकांक्षाने खुलासा केला होता की, ती आणि गौरव घटस्फोट घेत आहेत.गेल्या एका वर्षापासून ती गौरवपासून वेगळी राहत असल्याचंहीव आकाक्षाने नमूद केलं. एवंढच नव्हे तर आपण बायसेक्शुअल असल्याचा मोठा गौप्यस्फोटही आकांक्षाने या शोमध्ये केला . तिच्या या वक्तव्यांनी प्रचंड खळबळ माजली असून गौरव आणि तिच्या नात्याबद्दलही चर्चांना उधाण आलंय.

त्यातच आता एक मोठा ट्विस्ट आला. कारण अभिवेता गौरव खन्ना या शोमध्ये पाहुणा म्हणून सहभागी झाला होता. शोमध्ये तो येताच, त्याला समोर पाहून आकांक्षाला आनंद lतर झाला पण  ती भावूकही झाल्याचे दिसून आलं.

‘लॉकअप 2’मध्ये गौरव खन्नाची एंट्री

“ आता व्हिजिटिंग अवर्स सुरू झाले आहेत. आज आपल्याला भेटण्यासाठी पहिले पाहुणे येत आहेत.” असं टीव्ही अभिनेत्री आणि होस्ट फराह खानने शोमध्ये जाहीर केलं. ही घोषणा होताच कोण येणार यावरून घरातील सदस्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. त्यानंतर अभिनेता गौरव खन्नाने दिमाखदार अंदाजात शोमध्ये प्रवेश केला. गौरवच्या एंट्रीने घरातील वातावरण आनंदी झालं. ‘एक समंदर है जो काबू में है. एक कतरा है जो संभाला नहीं जा रहा. एक उम्र बितानी है उसके वगैहर और एक लम्हा है जो मुझसे गुजारा नहीं जा रहा है’ असं तो येताना म्हणाला. त्याचे हे शब्द ऐकून सर्वांचं लक्ष वेधले गेलं.

View this post on Instagram

A post shared by 𝓐𝔂 🥀 (@its_.ayy)

मात्र आकांक्षाला पाहून तो जे बोलला त्याने सर्वांनाच आश्चर्य वाटलं. “तू तर माझा बँडच वाजवलास” असं तो हसत तिला म्हणाला. त्याच्या या संवादानंतर दोघांमधील जुन्या आठवणी पुन्हा चर्चेत आल्या. त्याला पाहून आकांक्षा भावूक झाली, तिच्या डोळ्यात अश्रू तरळले.

गौरव-आकांक्षा टीव्ही इंडस्ट्रीतील चर्चेतलं कपल

सांगायचं झालं तर, गौरव खन्ना आणि आकांक्षा हे टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक होतं. जेव्हा गौरव बिग बॉसमध्ये सहभागी झाला, त्यावेळी आकांक्षाने पाहुणी म्हणून शोमध्ये प्रवेश केला होता. त्या काळात दोघांच्या नात्याची आणि त्यांच्या केमिस्ट्रीची जोरदार चर्चा झाली होती. या शोनंतरही गौरव आणि आकांक्षा अनेकदा एकत्र दिसले होते. गौरवने आकांक्षाचा वाढदिवसही खास पद्धतीने साजरा केला होता. दोघांना एकत्र पाहून चाहतेही खूप खुश होते.

2016 मध्ये लग्न, मात्र नंतर नात्यात दुरावा

काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर गौरव आणि आकांक्षाने 2016 साली थाटामाटत लग्न केलं. मात्र, ‘लॉकअप 2’मध्ये आकांक्षाने गौरवपासून वेगळे राहण्याबाबत केलेल्या वक्तव्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. घटस्फोटाच्या घोषणेने तर सगळेच चक्रावले. या शोमध्ये आकांक्षाने आणखी एक धक्कादायक खुलासा केला की ती बायसेक्शुअल आहे. लग्नाआधी तिचं अनेक मुलींशी रिलेशन होतं, असंही ती म्हणाली.

Follow Us
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा मोठा निर्णय; FDA भरती परीक्षा रद्द
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा सर्वात मोठा निर्णय; FDA भरती परीक्षा रद्द, नेमकं काय घडलं?
एकीकडे CM फडणवीसांच्या दिल्ली जाण्याच्या चर्चा, तर दुसरीकडे समर्थक...
एकीकडे CM फडणवीसांच्या दिल्ली जाण्याच्या चर्चा, तर दुसरीकडे समर्थकांची जोरदार बॅनरबाजी; चक्क...
याला म्हणतात luxurious! चाकणकरांची कोट्यवधींची गुंतवणूक; 20,000 Cr...
याला म्हणतात luxurious! चाकणकरांची कोट्यवधींची गुंतवणूक; 20,000 चौ. किमीचे आलीशान हॉटेल
पंतप्रधानांची प्रकृती खालावलेय, ते अस्वस्थ, थकले...बड्या नेत्याचा दावा
मोठी बातमी ! पंतप्रधानांची प्रकृती खालावलेय, ते अस्वस्थ, थकले...या नेत्याच्या दाव्याने पुन्हा खळबळ
सर्वांच्याच नजरा खिळल्या; चाकणकरांच्या कोट्यावधींच्या हॉटेल उद्घाटन...
सर्वांच्याच नजरा खिळल्या; चाकणकरांच्या कोट्यावधींच्या हॉटेल उद्घाटनात बड्या नेत्याची हजेरी
मोठी खळबळ! धाड धाड धाड गोळीबार सर्व काचा फुटल्या; मध्यरात्री...
मोठी खळबळ! धाड धाड धाड गोळीबार सर्व काचा फुटल्या; मध्यरात्री काँग्रेस नेत्याच्या...
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसणाचे दर तब्बल 200 रुपये किलोपर्यंत
सरसकट 80 ते 100 रुपयांची वाढ, कांद्यानंतर आता स्वयंपाकघरात दररोज उपयोगात येणारी वस्तुही महागली
महाराष्ट्रातील मोठ्या केसमध्ये न्यायाधीशांनीच लाच घेल्याचा आरोप,
महाराष्ट्रातील मोठ्या केसमध्ये न्यायाधीशांनीच लाच घेल्याचा आरोप, तब्बल 15 लाख...
विक्रेत्यांना 30 दिवसांपेक्षा जास्त काळ साखरेचा साठा करता येणार नाही
साखरेच्या साठेबाजीवर चाप लावण्यासाठी राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय
'मुंबई रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मराठी भाषा अनिवार्य करा'
मुंबई रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मराठी भाषा अनिवार्य करा: पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी