
Gautami Patil dance video : नृत्यांगणा गौतमी पाटील कायम तिच्या डान्समुळे चर्चेत असते. पण आता गौतमी तिच्या डान्समुळे नाही तर, एका व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. गौतमी हिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये गौतमी ‘टीप टीप बरसा पाणी’ या गाण्यावर तिच्या खास अदा सादर करताना पाहायला मिळत आहे. स्विमिंग पूलमधील गौतमीच्या कातिल अदा चाहत्यांचं मनोरंजन करत आहेत… गौतमी कायम तिच्या दमदार डान्समुळे चर्चेत असत. पण आता गौतमीचा नवीन व्हिडीओ चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
गौतमीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. गौतमी स्विमिंग पूलमध्ये तिचा निवांत वेळ व्यतीत करताना दिसत आहे. सांगायचं झालं तर, गौतमी पाटील सध्या सेलिब्रिटींपेक्षा कमी नाहीये. तिचे लाखोने चाहते आहेत. दमदार डान्समुळे प्रसिद्धी झोतात आलेल्या गौतमीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चाहत्यांना जाणून घेण्याची इच्छा असते.
*VIDEO : ‘टीप टीप बरसा पाणी’वर गौतमी पाटीलच्या मनमोहक अदा, स्विमिंग पूलमधील व्हिडीओ केला शेअर* pic.twitter.com/zaXLrCxPJZ
— Sumit Bhujbal (@SumitBhujb19648) September 2, 2025
मीडिया रिपोर्ट्सनुसार, गौतमी पाटील एका शोसाठी सुमारे 3 ते 5 लाख रुपये घेते. एवढंच नाही तर, . एका महिन्यात तिच्या टीमची कमाई 45 ते 50 लाख रुपयांच्या घरात जाते, असं म्हटलं जातं. तसेच तिचे सर्व कार्यक्रम हे हाऊसफु्ल्लच असतात. सोशल मीडियावर देखील गौतमीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात.
शिवाय कार्यक्रमात डान्स करणाऱ्या गौतमी हिने मालिका आणि सिनेमांमध्ये देखील काम केलं आहे. तिने देवमाणूस या मराठी मालिकेत देखील नृत्यांगणा म्हणून काम केले आहे. आता गौतमी हिला कोणत्याच ओळखीची गरज नाही. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. आज गौतमी हिची एक झलक पाहण्यासाठी चाहते प्रचंड गर्दी करतात. गौतमी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.
सोशल मीडियावर देखील गौतमी कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. गौतमी कायम तिच्या कार्यक्रमांबद्दल अपडेट चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असते. तिच्या प्रत्येक पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करतात.