कठीण आहे पण…, पूर्व पतीच्या आयुष्यात नव्या महिलेची एन्ट्री, ईशा देओल म्हणाली, ‘फक्त मुलींसाठी…’
Hema Malini Daughter Esha Deol: ईशा देओल हिला घटस्फोट दिल्यानंतर भरत तख्तानीच्या आयुष्यात नव्या महिलेची एन्ट्री, अभिनेत्रीच्या पूर्व पतीने कुटुंबात केलं नव्या महिलेचं स्वागत... घटस्फोटानंतर अभिनेत्री म्हणाली, 'कठीण आहे पण...'

Hema Malini Daughter Esha Deol: बॉलिवूडची ड्रीम गर्ल म्हणजे अभिनेत्री हेमा मालिनी आजही कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. पण आता हेमा मालिनी नाही तर, त्यांची लेक ईशा देओल हिचं खासगी आयुष्य सर्वत्र चर्चेत आहे. घटस्फोटानंतर ईशा देओल खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. लग्नाला 12 वर्ष झाल्यानंतर ईशा देओल आणि भरत तख्तानी यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर भरत याच्या आयुष्यात नव्या महिलेची एन्ट्री झाली असून, भरत याने तिचं कुटुंबात स्वागत देखील केलं आहे.
दरम्यान, ईशा देओलि हिने केलेलं जुनं वक्तव्य सर्वत्र चर्चेत आलं आहे. भरत याला घटस्फोट देणं फार कठीण होतं असं अभिनेत्रीने एका मुलाखतीत सांगितलं… ईशाने सांगितल्यानुसार, घटस्फोटाचा निर्णय फार सोपा नव्हता… पण यासर्व परिस्थितीत मी माझ्या मुलींना प्रथम स्थान दिलं. तिने कबूल केलं की, सिंगर मदर असणं हे अनेकदा कठीण असतं, परंतु तिच्या मुलींचा आनंद आणि स्थिरता ही नेहमीच तिची सर्वोच्च प्राथमिकता राहिली आहे यावर तिने भर दिला.
View this post on Instagram
घटस्फोटानंतर अभिनेत्री म्हणाली, ‘आम्ही परस्पर सहमतीने घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे. आमच्या आयुष्यातील या बदलादरम्यान आमच्या दोन्ही मुलींचे हित आणि कल्याण आमच्यासाठी नेहमीच सर्वात महत्त्वाचं आहे आणि राहील. आमच्या गोपनीयतेचा नेहमीच आदर केला जातो याची आम्हाला प्रशंसा होईल.’
पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘जेव्हा तुमच्या नात्यात मुलं देखील असतात, तेव्हा तुम्हाला तुमचा अहंकार बाजूला ठेवावा लागतो… आपल्या मर्यादा ओळखणं देखील फार महत्त्वाचं असतं. अखेर आम्ही दोन गोंडस मुलींचे आई – वडील आहोत… मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी काही निर्णय घ्यावे लागतात…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली…
View this post on Instagram
घटस्फोटानंतर ईशा हिने देखील नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
