Video: माझ्यावर चान्स मारण्यासाठी ब्लाऊजचं माप घेतोय ना? गौतमी पाटीलच्या प्रश्नामुळे अजित कुमारला फुटला घाम
सध्या सोशल मीडियावर 'देवमाणूस मधला अध्याय' या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

छोट्या पडद्यावरील अतिशय सुपरहिट मालिकांच्या यादीमधील एक मालिका म्हणजे ‘देवमाणूस.’ या मालिकेतील संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. आता या मालिकेचा नवाभाग ‘देवमाणूस मधला अध्याय’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेतील अजित कुमार हे पात्र सर्वांना प्रचंड आवडले. आता या मालिकेचा एक नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये नृत्यांगना गौतमी पाटीलची एण्ट्री झाल्याचे दिसत आहे. हा प्रोमो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
काय आहे व्हिडीओ?
‘देवमाणूस मधला अध्याय’ या मालिकेच्या प्रोमोमध्ये गौतमी पाटील आणि अजित कुमार यांच्यामधील संवाद दाखवला. व्हिडीओच्या सुरुवातीला गौतमी तिच्या गाडीतून उतरते आणि टेलर अजित कुमारच्या घरी जाते. ती काही ब्लाऊज शिवायला टाकते. सोबतच मापाचे ब्लाऊज देखील देते. अजित तिच्या सौंदर्यावर भाळतो. तो तिला मी जुन्या मापांवर विश्वास काम करत नाही असे म्हणतो आणि आतल्या खोलीत नवे माप घेण्यासाठी घेऊन जातो. ते पाहून गौतमी चकीत होते. त्यानंतर अजित माप घेत असताना त्याला प्रश्न विचारते, ‘काळजावर हात ठेऊन खरं सांग… माझ्यावर चान्स मारण्यासाठी ब्लाऊजचं माप घेतोय ना?’ ते ऐकून अजितला घाम फुटतो.
वाचा: काका, आय लव्ह यू, तुझ्याशिवाय…; पुतण्यासोबत शारिरीक संबंध, भावाला कळाल्यानंतर.. पोलिसही हादरले
View this post on Instagram
अजित कुमार हा फार हुशार दाखवला आहे. त्यामुळे तो लगेच गौतमीला प्रत्युत्तर देतो. तुम्ही कोणाची तरी बहीण आहात. कोणाची बायकोही असाल. अजित कुमारचं हे उत्तर ऐकताच गौतमी पाटील म्हणते, माझं अजून लग्न झालेलं नाही. दरम्यान, या नंतर अजित कुमार गौतमीचं माप घेताना पाहायला मिळतोय. आता गौतमी पाटील अजित कुमारची करणार का शिकार? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
देवमाणूस मालिकेविषयी
‘देवमाणूस- मधला अध्याय’ ही मालिका 2 जूनपासून सुरु झाली आहे. ही मालिका झी मराठी वाहिनीवर रात्री १० वाजता पाहायला मिळत आहे. या मालिकेत मराठी इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध कलाकारांची एण्ट्री पाहायला मिळत आहे. अभिनेत्री अल्का कुबल आणि अभिनेत्री सई ताम्हणकर या अजितच्या टेलरिंगच्या शॉपमध्ये जाताना दिसल्या होत्या. आता गौतमी पाटीलची एण्ट्री लक्षवेधी ठरत आहे.
