‘प्रियांका चोप्राने केलं ते पण अश्लील होतं..’, एजाज खानला पाठिंबा देत अभिनेत्रीचा सवाल

एजाज खानचा ओटीटी शो 'हाउस अरेस्ट' वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या शोवर अश्लीलता पसरवण्याचे आरोप होत आहेत. गहना वशिष्ठ देखील या शोचा भाग आहेत. आता तिने प्रियांका चोप्रा, मंदाकिनी यांसारख्या अभिनेत्रींची नावं घेत एजाजला पाठिंबा दिला आहे.

‘प्रियांका चोप्राने केलं ते पण अश्लील होतं..’, एजाज खानला पाठिंबा देत अभिनेत्रीचा सवाल
Priyanka chopra and Ejaz
Image Credit source: Tv9 Marathi
| Updated on: May 02, 2025 | 7:13 PM

अभिनेता आणि ‘बिग बॉस 7’ मध्ये दिसलेल्या एजाज खानचा वादांशी जुना संबंध आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या कारणाने तो वादाच्या भोवऱ्यात असतो. अलीकडेच त्याने उल्लू अॅपवर ‘हाउस अरेस्ट’ नावाचा शो सुरु केला आहे. शोचा पहिला एपिसोड प्रदर्शित होताच वाद सुरु झाला आहे. अनेकजण शोवर आणि एजाज खानवर टीका करत आहेत. अशात एका अभिनेत्रीने दोघांनाही पाठिंबा दिला आहे.

अभिनेत्री गहना वशिष्ठ शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहे. तिच्यासोबत इतरही काही स्पर्धक आहेत. शोमध्ये काही अश्लील गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत. टास्कच्या नावाखाली स्पर्धक कपडे काढताना दिसले. याच गोष्टीवरून वाद निर्माण झाला आणि शोवर बंदी घालण्याची मागणी सुरू झाली. गहना देखील वादात सापडली आहे. मात्र, गहनाचा दावा आहे की त्यांना लक्ष्य केलं जात आहे.

Zapuk Zupuk Review: सामान्यतेकडून असामान्यत्वाकडे!; काय आहे ‘झापुक झुपूक’ची कथा?

मंदाकिनी आणि राधिका आपटेचा उल्लेख

मूव्ही टॉकीजच्या एका बातमीनुसार, गहनाने सांगितलं, “मला चुकीच्या पद्धतीने लक्ष्य केलं जात आहे. मी जे केलं आहे, ते मोठ्या अभिनेत्री जे करतात त्यापेक्षा वेगळं नाही. ‘राम तेरी गंगा मैली’ चित्रपटात मंदाकिनीने टॉपलेस सीन केला होता. राधिका आपटेने देखील टॉपलेस सीन दिले आहेत. मग जर मोठ्या अभिनेत्री असं करू शकतात, तर त्यांना विरोधा का होत नाही.”

प्रियांका चोप्राबद्दल गहना काय म्हणाली?

गहनाने असंही सांगितलं की प्रियांका चोप्राने हॉलिवूडमध्ये अडल्ट दृश्ये दिली आहेत आणि त्यालाही अश्लील म्हणायला हवं. ती म्हणाली, “जर हॉलिवूड प्रियांका चोप्रासारख्या अभिनेत्रीसोबत अशी दृश्ये करत आहे, तर ते अश्लील नाही का? लोक त्याबद्दल का बोलत नाहीत? तुम्हाला माझ्यापासूनच काय अडचण आहे.”

एवढंच नाही, गहनाने असंही सांगितलं, “तुम्ही सगळे ऑनलाइन अडल्ट व्हिडीओ पाहता, जे तुमच्यासाठी अश्लील नाहीत. पण जेव्हा एखादी महिला शोमध्ये बोल्ड सीन करते, तेव्हा हा नैतिक मुद्दा बनतो.” एजाज खान या शोमध्ये होस्ट म्हणून दिसत आहेत. 11 एप्रिलपासून या शोला सुरुवात झाली आहे.