कन्यारत्न झाल्यानंतरचा अनुष्का शर्माचा ग्लॅमरस लूक बघितला का?

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) 11 जानेवारीला आई झाली आहे. तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे.

कन्यारत्न झाल्यानंतरचा अनुष्का शर्माचा ग्लॅमरस लूक बघितला का?

मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) 11 जानेवारीला आई झाली आहे. तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. गरोदरपणातील अनेक फोटो आणि व्हिडीओ अनुष्काने चाहत्यांसाठी शेअर केले होते. अनुष्का सोशल मीडियावर मुलीसोबतचा फोटो देखील शेअर केला होता. त्यानंतर अनुष्काने आता एक ग्लॅमरस फोटो शेअर केला आहे. गरोदरपणानंतर तिचा हा पहिलाच फोटो आहे. (Glamorous look of Anushka Sharma, photo shared on social media)

काही दिवसांपूर्वी मुंबईच्या वांद्रेमध्ये विराट आणि अनुष्काने मुलीला डॉक्टरकडे तपासणीसाठी घेऊन आले होते. मात्र, त्यावेळी त्यांच्या मुलीची झलक बघायला मिळाली नव्हती. अनुष्काने सांगितलं होते की, विराटने बाळाला सोशल मीडियापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही याबाबत खूप विचार केला. आम्ही आमचं बाळ वाढताना लोकांना दाखवण्याची इच्छा नाही. आम्ही आमच्या मुलांना सोशल मीडियात अडकवू इच्छित नाही.

anushka sharma 1

पुढे जाऊन त्याचा निर्णय मुलं घेतील. आजकाल मोठ्यांनाच सोशल मीडिया हँडल करण्यात इतकी समस्या येते. हे थोडं कठीण असेल पण आम्ही हे फॉलो करु. असे अनुष्काने सांगितले होते. अनुष्का शर्माने ‘पीके’, ‘बँड बाजा बारात’, ‘सुलतान’ आणि ‘ऐ दिल है मुश्किल’ अशा चित्रपटांमध्ये आपल्या बहारदार अभिनयाने लोकांच्या हृदयात एक खास ओळख निर्माण केली आहे.

याचबरोबर अनुष्का शर्मा ‘क्लीन स्लेट फिल्म्स’ या प्रॉडक्शन हाऊसची भागीदार देखील आहे. नुकतीच तिची निर्मिती असलेला ‘बुलबुल’ हा चित्रपट नेटफ्लिक्सवर, तर ‘पाताल-लोक’ ही वेब सीरीज ओटीटीवर प्रदर्शित झाली आहे. अनुष्का शर्मा 2018मध्ये शाहरूख खानसोबत ‘झिरो’ या चित्रपटात झळकली होती. यानंतर तिने सगळ्या कामांतून ब्रेक घेतला आहे.

संबंधित बातम्या : 

Video | कोच रिकामा, मग मराठी अभिनेत्रीचं छय्यां छय्यां, पहा व्हिडीओ !

Big News : ‘गंदी बात’ फेम अभिनेत्री गहना वशिष्ठला अटक, अश्लिल व्हीडिओ शेअर केल्याचा आरोप

Mirzapur | ‘मिर्झापूर’ वेब सीरिजच्या निर्मात्यांच्या अडचणीत वाढ!

(Glamorous look of Anushka Sharma, photo shared on social media)

Published On - 3:18 pm, Sun, 7 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI