AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘गोंधळ’ फेम दिग्दर्शकाकडून भव्य ऐतिहातिकपटाची घोषणा; ‘शहाजीराजे’मध्ये कोण साकारणार भूमिका?

'गोंधळ' या गाजलेल्या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक संतोष डावखर यांनी त्यांच्या नव्या भव्य ऐतिहासिकपटाची घोषणा केली आहे. शहाजीराजे असं या चित्रपटाचं नाव असून त्याचा पोस्टर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.

'गोंधळ' फेम दिग्दर्शकाकडून भव्य ऐतिहातिकपटाची घोषणा; 'शहाजीराजे'मध्ये कोण साकारणार भूमिका?
शहाजीराजेImage Credit source: Instagram
| Updated on: Apr 30, 2026 | 7:34 PM
Share

महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधत मराठी चित्रपटसृष्टीत एक दमदार घोषणा करण्यात आली आहे. संतोष डावखर यांचा ‘गोंधळ’ चित्रपट जागतिक स्तरावर झेप घेत असतानाच आता ते प्रेक्षकांसाठी आणखी एक भव्य ऐतिहासिक पर्व घेऊन येत आहेत. डावखर फिल्म्स प्रस्तुत आणि संतोष डावखर लिखित-दिग्दर्शित ‘शहाजीराजे’ या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित करत चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. पोस्टरमध्ये शहाजीराजांचा भव्य, गंभीर आणि राजेशाही अंदाज पाहायला मिळत असून, त्यातून चित्रपटाच्या दिमाखदार मांडणीची झलक दिसते. पोस्टरमध्ये चेहऱ्यामागे वाहणारा वारा त्या काळातील रणभूमीची तीव्रता आणि संघर्षाची जाणीव अधिक ठळकपणे करून देतो. शहाजीराजे भोसले यांची यशोगाथा सांगणारा हा मराठी सिनेसृष्टीतील पहिला चित्रपट असून पोस्टरमुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकतेची लाट निर्माण झाली आहे.

संस्कृती आणि इतिहासाशी घट्ट नातं जपणाऱ्या विषयांवर काम करण्यासाठी ओळखले जाणारे संतोष डावखर यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील, पराक्रमी आणि दूरदृष्टी असलेले शहाजीराजे भोसले यांच्या जीवनावर आधारित कथा मोठ्या पडद्यावर साकारत आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील कर्तृत्व, शौर्य आणि विचारांचा ठसा प्रेक्षकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याचा प्रयत्न या चित्रपटातून केला जाणार आहे.

‘गोंधळ’नंतर संतोष डावखर पुन्हा एकदा आपल्या वेगळ्या आणि आशयघन विषयासह प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, ‘शहाजीराजे’ हा चित्रपट 2027 साली प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे, हा चित्रपट तब्बल 6 भाषांमध्ये सादर केला जाणार असून, मराठीसह हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे. या भव्य चित्रपटात शहाजीराजेंची भूमिका नेमकी कोण साकारणार, याबाबत प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झालेली असतानाच या चित्रपटात दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील एका मोठ्या कलाकाराची वर्णी लागणार असल्याचंही बोललं जात आहे. ‘गोंधळ’प्रमाणेच थरार आणि भव्यतेचा अनुभव ‘शहाजीराजे’मध्ये पाहायला मिळेल का, याची उत्सुकता देखील प्रेक्षकांना लागून राहिली आहे. इतिहासाची भव्यता आणि संस्कृतीचा गौरव मोठ्या पडद्यावर अनुभवण्यासाठी प्रेक्षकांना आता या चित्रपटाची आतुरता लागली आहे.

याविषयी दिग्दर्शक संतोष डावखर म्हणाले, “महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने ‘शहाजीराजे’ची घोषणा करणं आमच्यासाठी खूप खास आहे. आपल्या इतिहासातल्या अनेक प्रेरणादायी व्यक्तिमत्वांपैकी शहाजीराजे हे अत्यंत महत्त्वाचं व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे, जो आम्ही अभिमानाने प्रेक्षकांसमोर सादर करणार आहोत. नेहमीप्रमाणेच आम्ही आपल्या संस्कृतीशी आणि इतिहासाशी जोडलेली कथा प्रेक्षकांसमोर मांडत आहोत.”

Follow Us
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं
संपूर्ण पक्षच चोरला जाऊ शकतो, तर लाखो मतं चोरली जाण्यात आश्चर्य काय?
Rahul Gandhi | संपूर्ण पक्षच चोरला जाऊ शकतो, तर लाखो मतं चोरली जाण्यात आश्चर्य काय? राहुल गांधींचा भाजप आणि निवडणूक आयोगावर घणाघात
मुंबईच्या Apple Store बाहेर ग्राहकांची तुफान गर्दी; पनवेलहून आलेला...
iPhone 18 Pro Max | मुंबईच्या Apple Store बाहेर ग्राहकांची तुफान गर्दी; पनवेलहून आलेला ग्राहक पहाटे 4 वाजल्यापासून रांगेत
शिवसेना आणि धनुष्यबाण फुटीर गटाला देणं हा शतकातील सर्वात मोठा घोटाळा
Sanjay Raut | शिवसेना आणि धनुष्यबाण फुटीर गटाला देणं हा शतकातील सर्वात मोठा घोटाळा; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
महाराष्ट्रात या तारखेला होणार पावसाची एन्ट्री, शेतकऱ्यांना दिलासा...
Rain Update | महाराष्ट्रात या तारखेला होणार पावसाची एन्ट्री, शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी