AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Govinda-Sunita Ahuja : मी केक कापायला आले होते.. फॅमिली कोर्टात लेकासह दिसताच सुनीता यांचा खोचक टोमणा

Sunita Ahuja Govinda : गोविंदा आणि सुनीता अहुजा यांच्या ३७ वर्षांच्या वैवाहिक जीवनात पुन्हा वादळ आले आहे. सुनीता अहुजा नुकत्याच मुंबईतील कुटुंब न्यायालयात मुलासोबत दिसल्या, ज्यामुळे त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे. अनेक वर्षांपासून सुरू असलेला हा तणाव आता कायदेशीर वळण घेताना दिसत आहे.

Govinda-Sunita Ahuja : मी केक कापायला आले होते.. फॅमिली कोर्टात लेकासह दिसताच सुनीता यांचा खोचक टोमणा
गोविंदा आणि सुनीता आहूजा
| Updated on: Aug 19, 2026 | 10:05 PM
Share

Sunita Ahuja At Family Court : बॉलीवुडचा ‘हीरो नंबर वन’ गोविंदा (Govinda) आणि त्याची पत्नी सुनीता अहुजा यांच्या वैवाहिक आयुष्यात पुन्हा मोठा वादळ आलं आहे, 37 वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर हे दोघेही वेगळे होणार असल्याच्या चर्चा आता फक्त गॉसिपपुरत्या मर्यादित राहिलेल्या नसून उलट त्यावर शिक्कामोर्तब होऊ शकतं असे संकेत दिसू लागले आहेत. बुधवारी सकाळी सुनीता अहुजा या, त्यांचा मुलगा यशवर्धन याच्यासह मुंबईतील फॅमिली कोर्टातून बाहेर पडताना दिसल्या, त्यांचा व्हिडीओ समोर येताच आता विविध चर्चांना उधाण आलं आहे. हे प्रसिद्ध जोडपं आता खरंच कायदेशीररित्या विभक्त होणार का, असाच सवाल सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडीओनंतर उपस्थित होत आहे.

कोर्टाबाहेर शांतता, मुलाने हातच जोडले

इंटरनेटवर हा व्हिडीओ सध्या वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला असून त्यामध्ये सुनीता अहुजा या फॅमिली कोर्टातून त्यांच्या गाडीच्या दिशेने जाताना दिसल्या. एरवी कॅमेरामन, पापाराझी किंवा मीडियासमोर अतिशय मोकळपणाने, बिनधास्त अंदाजात बोलणाऱ्या सुनीता यावेळी मात्र अतिशय शांत आणि थोड्या तणावात दिसत होत्या. त्यांच्यासोबत असलेला त्यांचा मुलगा यशवर्धनही थोडा त्रस्त वाटत होता. व्हिडीओ किंवा फोटो काढू नका अशी विनंती त्याने पापाराझींनाजोडून विनंती केली. मात्र एवढं होऊनही पापाराझी थांबले नाहीत, ते पाहून त्याला राग आला आणि तो थोडं मोठ्याने ओरडतानाही दिसला. एवढंच नव्हे तर, ‘कोर्टात मी केक कापायला आले होते’ असं म्हणत जाता जाता सुनीता यांनी टोमणाही मारला. दोघांचंही मौन आणि तिथून पटापट निघून जाण्याची घाई पाहून अनेक चर्चांना उधाण आलं आहे.

दीर्घकाळापासून सुरू होता वाद

अभिनेता गोविंदा आणि सुनीता यांच्या नात्यातील तणावाच्या चर्चा काही नवीन नाहीत. गेल्या काही महिन्यांपासून दोघांमध्ये सोशल मीडिया पोस्ट आणि मुलाखतींच्या माध्यमातून एकमेकांवर टोमणे मारण्याचा प्रकार सुरू होता. सुनीताने अनेकदा गोविंदावर विश्वासघात आणि विवाहबाह्य संबंधांचे गंभीर आरोपही केले होते. काही दिवसांपूर्वीच गोविंदा हा कोमल राणी स्वर्णकारसोबत विमानतळावर दिसला होता. विशेष म्हणजे, त्याने पापाराझींसमोर तिची ओळखही करून दिली. या घटनेनंतर दोघांमधील वाद आणखी चर्चेत आला.

यापूर्वीही गोविंदा आणि सुनीता यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, गेल्या वर्षी दोघांनी गणपती पूजेला एकत्र हजेरी लावत, या चर्चा म्हणजे केवळ अफवा असल्याचं सांगितलं होतं. आता मात्र सुनीता या कौटुंबिक न्यायालयाबाहेर दिसल्याने या प्रकरणाला पुन्हा वेगळं वळण मिळाल्याचं दिसत आहे.

‘बिग बॉस 20’मध्ये गोविंदाची एंट्री अडचणीत?

दरम्यान, गोविंदा हा ‘बिग बॉस 20’ या शोमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चांनाही जोर आला होता. त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील वाद आणि चर्चांमुळे निर्माते, त्याला शोमध्ये घेण्यास उत्सुक होते, असं म्हटलं जात होतं. मात्र, जर गोविंदा आणि सुनीता यांच्यातील वाद आता न्यायालयात गेला असेल, तर अशा परिस्थितीत रिॲलिटी शोमध्ये सहभागी होणं हे गोविंदासाठी कठीण ठरू शकतं. या संपूर्ण प्रकरणावर गोविंदा किंवा सुनीता अधिकृतपणे काही बोलतात का, स्पष्टीकरण देतात का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?