Govinda : गोविंदाची बायको संपवते दारूची अख्खी बॉटल, रात्री 8 वाजले की…
गोविंदाची बायको सुनीता आहुजा यांनी दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपल्या मद्यपान आणि एकांतात वाढदिवस साजरा करण्याच्या सवयीबद्दल खुलासा केला आहे. त्या म्हणाल्या की, त्या खूप आनंदी असतानाच दारू पितात आणि वाढदिवस एकट्याने साजरे करतात. त्यांनी गोविंदाशी झालेल्या पहिल्या भेटी आणि त्यांच्या सुरुवातीच्या भांडणांचाही उल्लेख केला आहे.

बॉलिवूडचा अभिनेता चिची ऊर्फ गोविंदाची बायको सध्या भलतीच चर्चेत आहे. गोविंदाची पत्नी सुनीता आहुजाने एक मुलाखत दिली होती. त्यात तिने तिच्या दारूच्या वेडाची माहिती दिलीय. मला दारू प्यायला खूप आवडतं. पण मी रोज दारू पित नाही. पण ज्या दिवशी मी प्रचंड खूश असते त्याच दिवशी मी दारूला हात लावते, असं सुनीता आहुजाने म्हटलं आहे. त्यामुळे आता गोविंदाच्या बायकोच्या दारूच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत.
कर्ली टेल्सला सुनीता आहुजा यांनी मुलाखत दिली. त्यात त्यांनी दारूप्रेमावर भाष्य केलंय. ही माझी फेव्हरिट जागा आहे. आणि ब्लू लेबल माझी फेव्हरिट दारू आहे. जेव्हा मी खूप खूश होते तेव्हा मी दारू पिते. उदाहरणच द्यायचं झालं तर, काही दिवसांपूर्वी यशला लॉन्च करण्यात आलं. त्यावेळी मी प्रचंड खूश झाले होते. तेव्हा मी एकटीने दारूची अख्खी बॉटल रिचवली होती. जेव्हा भारत-पाकिस्तान मॅच असते तेव्हाही मी संपूर्ण बॉटल गटागटा खाली करते. मी रोज दारू पित नाही. मी फक्त रविवारीच दारू पिते, त्या दिवशी माझा चिट डे असतो, असं सुनीता म्हणाल्या.
एकटं राहायला आवडतं
वाढदिवसाच्या सेलिब्रेशनबाबतही त्यांनी सांगितलंय. वाढदिवसाच्या दिवशी एकांतात वेळ घालवत असल्याचं त्यांनी सांगितलं. माझं संपूर्ण आयुष्य मुलांची देखभाल करण्यात गेलंय. आता मुलं मोठी झालीत. त्यामुळे मी आता स्वत:ला भरपूर वेळ देत असते. मी माझ्या प्रत्येक वाढदिवसाला एकटीच बाहेर जाते. कधी मंदिरात तर कधी गुरुद्वारात. नंतर जसेही रात्रीचे 8 वाजतात मी दारूची बॉटल उघडते. एकटीच केक कापते आणि दारू पिते. मला एकटं राहणं आवडतं, असं सुनीता यांनी सांगितलं.
तेव्हा भांडणं व्हायची
यावेळी त्यांनी गोविंदासोबत झालेली पहिली भेट आणि होणाऱ्या भांडणावरही भाष्य केलं. आम्ही शाळेपासूनच एकमेकांना ओळखतो. त्यावेळी मी इयत्ता नववीत होते. त्यावेळी आमच्यात वारंवार भांडणं व्हायची. बॉब कटमुळे मी टॉमबॉय वाटते असं एकदा गोविंदा म्हणाला होता. त्यानंतर मी माझ्या केसांना तेल लावायला सुरुवात केली. माझे केस गुडघ्यापर्यंत वाढावेत हा माझा प्रयत्न होता, असं त्यांनी सांगितंल. गोविंदा आणि सुनीता यांचा विवाह मार्च 1987मध्ये झाला होता. दोघांना टीना आणि यशवर्धन ही दोन मुले आहेत.