‘मराठी असल्याची थोडी लाज बाळग’, अंकिता लोखंडेची गुढी पाहून नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप

‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत अंकिताने दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबत भूमिका साकारली होती. याच मालिकेच्या सेटवर दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले होते. जवळपास सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 2016 मध्ये त्यांचं ब्रेकअप झालं.

'मराठी असल्याची थोडी लाज बाळग', अंकिता लोखंडेची गुढी पाहून नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप
Ankita Lokhande Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 23, 2023 | 8:04 AM

मुंबई : राज्यात बुधवारी अत्यंत उत्साहात गुढीपाडवा साजरा करण्यात आला. गुढीपाडव्यानिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रांनी अवघी मुंबई दुमदुमली. हाच अमाप उत्साह सोशल मीडियावरही पाहायला मिळाला. सर्वसामान्यांसोबतच सेलिब्रिटींनीही गुढीपाडवा साजरा करतानाचा आणि गुढी उभारतानाचा फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अंकिता लोखंडेनंही पती विकी जैनसोबत मिळून तिच्या घरात गुढी उभारली. गुढी उभारतानाचा व्हिडिओ तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला. मात्र हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

गुढीपाडवानिमित्त अंकिताने हिरव्या रंगाची साडी नेसली होती. तर विकीने कुर्ता पायजमा परिधान केला होता. पारंपरिक पोशाखात या दाम्पत्याने गुढीची पूजा केली. मात्र यावेळी अंकिताची एक चूक नेटकऱ्यांनी हेरली आणि त्यावरून तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

हे सुद्धा वाचा

अंकिताने उभारलेल्या गुढीवर कलश नसल्याने नेटकऱ्यांनी राग व्यक्त केला. ‘मराठी असल्याची थोडी लाज बाळग. गुढी उभारता येत नसेल तर दिखाव्यासाठी उभारू नकोस. तुझ्या लहानपणी आई – वडिलांनी अशीच गुढी उभारली होती का,’ असा संतप्त सवाल एकाने केला. तर ‘गुढीला वर तांब्या का नाही लावला? माहीत नसलेल्या पद्धती निव्वळ फोटोसाठी का करतात,’ असं दुसऱ्या युजरने लिहिलं. ‘कलश तर नाहीच आणि घरात कोण गुढी उभारतं? काहीही पद्धती पडायच्या,’ अशी टीका नेटकऱ्यांनी केली. गुढीला कलश असतो एवढं पण माहीत नसेल तर कसली मराठी तू, अशा शब्दांत काहींनी राग व्यक्त केला.

पहा व्हिडीओ

अंकिता सध्या कोणत्याही मालिकेत किंवा चित्रपटात झळकत नसली तरी सोशल मीडियावर ती नेहमीच सक्रिय असते. चाहत्यांसोबत ती फोटो आणि व्हिडीओ शेअर करते. इन्स्टाग्रामवर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत तिने काम मिळत नसल्याचं म्हटलं होतं. “मणिकर्णिका या चित्रपटानंतर माझ्या हातात कोणतीच तलवार आली नाही आणि खरं सांगायचं झालं तर माझा इंडस्ट्रीत कोणी गॉडफादर नाही. मी प्रतिभावान आहे, हे मला माहीत आहे. पण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी माझा कोणी गॉडफादर नाही”, असं ती म्हणाली होती.

‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत अंकिताने दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबत भूमिका साकारली होती. याच मालिकेच्या सेटवर दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले होते. जवळपास सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 2016 मध्ये त्यांचं ब्रेकअप झालं. त्यानंतर अंकिता व्यावसायिक विक्की जैनला डेट करू लागली.  2021 मध्ये अंकिता आणि विक्कीने लग्नगाठ बांधली.

Non Stop LIVE Update
शंभूराज देसाईंचा संताप,अंधारेंसह धंगेकरांना बजावली अब्रुनुकसानीचीनोटीस
शंभूराज देसाईंचा संताप,अंधारेंसह धंगेकरांना बजावली अब्रुनुकसानीचीनोटीस.
अजित पवार गटाच्या बड्या नेत्याकडून आव्हाडांची पाठराखण; म्हणाले...
अजित पवार गटाच्या बड्या नेत्याकडून आव्हाडांची पाठराखण; म्हणाले....
मरीन ते पेडर रोड, कोस्टल रोडचा दुसरा टप्पा 'या' महिन्यात होणार पूर्ण
मरीन ते पेडर रोड, कोस्टल रोडचा दुसरा टप्पा 'या' महिन्यात होणार पूर्ण.
तर मी संन्यास घेईन...अजितदादांच्या त्या आव्हानावर दमानियांचं थेट उत्तर
तर मी संन्यास घेईन...अजितदादांच्या त्या आव्हानावर दमानियांचं थेट उत्तर.
सोलापुरातील मिलमधील ऐतिहासिक चिमणी इतिहासजमा; क्षणार्धात जमीनदोस्त
सोलापुरातील मिलमधील ऐतिहासिक चिमणी इतिहासजमा; क्षणार्धात जमीनदोस्त.
हवं तर मला फाशी द्या...मनुवादाविरोधात असणारे आव्हाड नेमकं काय म्हणाले?
हवं तर मला फाशी द्या...मनुवादाविरोधात असणारे आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तर मी त्यांचा कसा हक्क भंग करतो ते पाहा, धंगेकरांचा रोख नेमका कुणावर?
तर मी त्यांचा कसा हक्क भंग करतो ते पाहा, धंगेकरांचा रोख नेमका कुणावर?.
माफी मागितली नाही तर... शिंदेंच्या नोटीसीवर शिरसाटांचा राऊतांना इशारा
माफी मागितली नाही तर... शिंदेंच्या नोटीसीवर शिरसाटांचा राऊतांना इशारा.
फॉरेन नाही, शिंदेंचा आपल्या गावी फेरफटका; गाव दाखवत दिला मोलाचा संदेश
फॉरेन नाही, शिंदेंचा आपल्या गावी फेरफटका; गाव दाखवत दिला मोलाचा संदेश.
रेमल चक्रीवादळाने आतापर्यंत घेतले 36 बळी, 'या' राज्याला सर्वाधिक तडाखा
रेमल चक्रीवादळाने आतापर्यंत घेतले 36 बळी, 'या' राज्याला सर्वाधिक तडाखा.