AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शहनाज गिलला डेट करतोय गुरू रंधावा; म्हणाला, ‘मला खूप छान वाटतं जेव्हा…’

Guru Randhawa - Shehnaaz Gill | शहनाज गिल हिला गुरु रंधावा खरंच करतोय डेट? गायकाने अनेक दिवसांनंतर सोडलं मौन; म्हणाला, 'मला खूप छान वाटतं जेव्हा...', गेल्या अनेक दिवसांपासून शहनाज हिच्या आयुष्यात नव्या व्यक्तीची एन्ट्री झाल्याची चर्चा रंगली होती. अखेर सत्य समोर आलं.

शहनाज गिलला डेट करतोय गुरू रंधावा; म्हणाला, 'मला खूप छान वाटतं जेव्हा...'
| Updated on: May 27, 2024 | 1:54 PM
Share

प्रसिद्ध आणि लोकप्रिय पंजाबी गायक गेल्या काही दिवसांपासून त्याच्या गाण्यांमुळे नाहीतर, खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. गुरु रंधावा याचं नाव गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री शहनाज गिल हिच्यासोबत जोडण्यात येत आहे. सोशल मीडियावर देखील दोघांच्या डेटींग लाईफच्या तुफान चर्चा रंगल्या. पण रंगणाऱ्या चर्चांवर गुरु रंधावा आणि शहनाज यांनी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही. नुकताच एक मुलाखतीत गुरु रंधावा यांनी अभिनेत्रीसोबत असलेल्या नात्यावर मौन सोडलं आहे. तर जाणून गायक नक्की काय म्हणाला.

गुरु रंधावा याने पहिल्यांदा शहनाज हिच्यासोबत असणाऱ्या नात्यावर मौन सोडलं आहे. गुरु रंधावा म्हणाला, ‘जेव्हा लेकं माझ्या डेटिंग आयुष्याबद्दल बोलतात तेव्हा मला चांगलं वाटतं. चाहते माझं नाव जगभरातील मुलींसोबत जोडतात, त्यामुळे मला छान वाटतं. एका मुलाला आणखी काय हवं असतं…’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त गुरु रंधावा याच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

सांगायचं झालं तर, गेल्या वर्षीपासून गुरु रंधावा आणि शहनाज गिल यांच्या अफेअरच्या चर्चांनी जोर धरला होता. दोघांनी एका रोमँटिक म्यूझिक व्हिडीओमध्ये एकत्र काम केलं. व्हिडीओमधील दोघांची केमिस्ट्री देखील चाहत्यांना प्रचंड आवडली. गाण्याचं नाव ‘मूनराईज’ असं होतं. त्यानंतर दोघांच्या डेटिंगच्या चर्चांनी जोर धरला. एवढंच नाहीतर, ‘थँक यू फॉर कमिंग’ सिनेमाच्या स्क्रिनिंगमध्ये देखील अभिनेत्री गायकासोबत दिसली.

शिवाय दोघांचं दुसरं गाणं जानेवारी 2024 मध्ये प्रदर्शित झालं. सोशल मीडियावर देखील गुरु रंधावा आणि शहनाज गिल यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते. पण आता गायकाच्या वक्तव्यानंतर स्पष्ट होत आहे की, गुरु रंधावा अभिनेत्री शहनाज गिला हिला डेट करत नाही.

रंगणऱ्या चर्चांवर हैराणी व्यक्त करत गायक गुरु रंधावा म्हणाला, ‘मी कोणाला डेट करत नसलो तरी, लोकांनी मझ्याबद्दल चर्चा करत राहावी असं मला वाटतं. पण रंगणाऱ्या चर्चांमुळे मी नक्कीच कोणाली तरी डेट करण्यास सुरुवात करणार आहे…’ असं देखील गायक गुरु रंधावा म्हणाला.

शहनाज गिल हिचं खासगी आयुष्य

शहनाज गिल आणि दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्ला यांच्या नात्याबद्दल प्रत्येकाला माहिती आहे. सिद्धार्थ शुक्ला याचं निधन 2 सप्टेंबर 2021 मध्ये झालं. वयाच्या 40 व्या वर्षी अभिनेत्याने अखेरचा श्वास घेतला. सिद्धार्थ याच्या निधनानंतर शहनाज देखील पूर्णपणे कोलमडली होती. अभिनेत्याच्या निधनानंतर कित्येक दिवस अभिनेत्री अनेक दिवस सोशल मीडिया आणि माध्यमांपासून दूर होती. एवढंच नाही तर, अनेक ठिकाणी अभिनेत्री सिद्धार्थ याच्याबद्दल बोलताना दिसते. आता शहनाज हिने स्वतःला सावरलं आहे.

दानवे-फडणवीसांमध्ये जुंपली, शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण तापलं
दानवे-फडणवीसांमध्ये जुंपली, शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण तापलं.
कोण होतास तू काय झालास तू? , ठाकरे-फडणवीसांमध्ये हिंदुत्वावरून पेटलं
कोण होतास तू काय झालास तू? , ठाकरे-फडणवीसांमध्ये हिंदुत्वावरून पेटलं.
विधानसभेत नितेश राणे भडकले, सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद
विधानसभेत नितेश राणे भडकले, सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद.
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, अजितदादांच्या युतीचं कुठं हो... कुठं नाही!
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, अजितदादांच्या युतीचं कुठं हो... कुठं नाही!.
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल.
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर.
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही...
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही....
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात.
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ.
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल.