Happy Birthday Allu Arjun | स्नेहाशी लग्न करण्यासाठी अल्लू अर्जुनला करावी लागली होती भरपूर मेहनत! वाचा सुपरस्टारची लव्हस्टोरी…

अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) हा टॉलीवूड इंडस्ट्रीचा सुपरस्टार आहे. अल्लूची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. तो कोट्यावधी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतो. परंतु, अल्लुच्या हृदयात एकच व्यक्ती राहते आणि ती म्हणजे पत्नी स्नेहा रेड्डी!

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 10:26 AM, 8 Apr 2021
Happy Birthday Allu Arjun | स्नेहाशी लग्न करण्यासाठी अल्लू अर्जुनला करावी लागली होती भरपूर मेहनत! वाचा सुपरस्टारची लव्हस्टोरी...
अल्लू अर्जुन

मुंबई : अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) हा टॉलीवूड इंडस्ट्रीचा सुपरस्टार आहे. अल्लूची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. तो कोट्यावधी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतो. परंतु, अल्लुच्या हृदयात एकच व्यक्ती राहते आणि ती म्हणजे पत्नी स्नेहा रेड्डी! अल्लू आणि स्नेहाची जोडी एक परिपूर्ण जोडी आहे. आज, अल्लू अर्जुन आपला 38वा वाढदिवस साजरा करत आहे. चला तर, याच खास निमित्ताने आपणा त्याची प्रेमकथा जाणून घेऊया…(Happy Birthday Allu Arjun know about superstars love story)

अमेरिकेत एका मित्राच्या लग्नात अल्लू आणि स्नेहाची पहिली भेट झाली. अल्लू एक अभिनेता आहे हे स्नेहाला ठाऊक होतं, पण तिने त्याचा चित्रपट कधीही पाहिला नव्हता. पहिल्याच भेटीत या दोघांनीही एकमेकांची मने जिंकली. दोघेही एकमेकांशी बोलू लागले. आधी दोघांची मैत्री झाली आणि मग हळूहळू ही मैत्री प्रेमात बदलली.

स्नेहा हैदराबादच्या एका लोकप्रिय व्यावसायिकाची मुलगी होती. काही वर्षांच्या नात्यानंतर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. यानंतर अल्लूने आपल्या वडिलांना स्नेहाच्या घरी लग्नाचा प्रस्ताव घेऊन जाण्यास सांगितले. अल्लूचे वडील स्नेहाच्या घरी गेले आणि त्यांच्या लग्नाबद्दल बोलले. पण स्नेहाच्या वडिलांनी या लग्नास नकार दिला.

लग्न करणारच! दोघांचा ठाम निश्चय

स्नेहाच्या वडिलांनी भलेही लग्नास नकार दिला असेल, परंतु स्नेहा आणि अल्लूला एकमेकांना कधीच सोडायचं नव्हतं. त्यांनी एकमेकांशी लग्न करण्याचा निर्धार केला होता. स्नेहाच्या कुटूंबाला समजावण्याचा प्रयत्न दोघांनीही केला आणि अखेर त्यांनीही ही लढाई जिंकली. यानंतर 6 मार्च 2011 रोजी या दोघांनी धुमधडाक्यात लग्न केले. या दोघांच्या नात्यातील खास गोष्ट म्हणजे स्नेहा जरी मनोरंजन विश्वातील नसली, तरीही ती अल्लूच्या व्यावसायिक जीवनाला समजून घेते आणि त्याला समर्थन देते (Happy Birthday Allu Arjun know about superstars love story).

पाहा अर्जुन आणि स्नेहाची जोडी!

 

View this post on Instagram

 

A post shared by Allu Arjun (@alluarjunonline)

त्याचबरोबर, अल्लू अर्जुन या प्रसिद्धी विश्वाचा एक भाग असला तरीही, त्याने वैयक्तिक आयुष्यात कधीही त्याचा परिणाम होऊ दिला नाही. त्याचे स्नेहावर खूप प्रेम आहे. या दोघांना अयान आणि अरहा नावाची दोन मुले देखील आहेत. अल्लू हा एक परिपूर्ण फॅमिली मॅन आहे.

‘पुष्पा’तून प्रेक्षकांच्या भेटीला

अल्लूच्या व्यावसायिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, आता तो ‘पुष्पा’ या चित्रपटात दिसणार आहे. वाढदिवसाच्या एक दिवस आधी म्हणजेच बुधवारी (7 मार्च) संध्याकाळी या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला. टीझरमध्ये अल्लू अर्जुन दमदार अ‍ॅक्शन करताना दिसत आहे. या सिनेमात अल्लूला एक वेगळी स्टाईल देण्यात आली आहे, जी त्याच्या आधीच्या सर्व पात्रांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे.

(Happy Birthday Allu Arjun know about superstars love story)

हेही वाचा :

Video | ‘मिसेस श्रीलंका’ स्पर्धेच्या मंचावर मोठा हंगामा, मुकुट हिसकावत विजेतीला केले जखमी, पाहा व्हिडीओ

Video | कोरोनावर मात केल्यानंतर प्रिया बापट म्हणतेय, ‘आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे…’, पाहा व्हिडीओ