Happy Birthday Rajeshwari Kharat | ‘वय विचारू नका, थोडी लाज वाटते…’, ‘शालू’ने खास अंदाजात दिल्या स्वतःला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

आज अर्थात 8 मार्चला राजेश्वरी खरात आपला वाढदिवस साजरा करत आहे. या निमित्ताने तिने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे.

Happy Birthday Rajeshwari Kharat | ‘वय विचारू नका, थोडी लाज वाटते...’, ‘शालू’ने खास अंदाजात दिल्या स्वतःला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
ती चाहत्यांसाठी वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ नेहमीच शेअर करत असते. आज अर्थात 8 मार्चला राजेश्वरी खरात आपला वाढदिवस साजरा करत आहे. या निमित्ताने तिने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे.

मुंबई : मराठी चित्रपटाचे आघाडीचे दिग्दर्शक नागराज मंजुळेंच्या (Nagraj Manjule) यांचा गाजलेल्या ‘फँड्री’ (Fandry) या चित्रपटातील सोज्वळ चेहऱ्याची शालू म्हणजेच राजेश्वरी खरात (Rajeshwari Kharat) नेहमीच सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असते. ती चाहत्यांसाठी वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ नेहमीच शेअर करत असते. आज अर्थात 8 मार्चला राजेश्वरी खरात आपला वाढदिवस साजरा करत आहे. या निमित्ताने तिने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे (Happy Birthday Rajeshwari Kharat shalu fame actress wrote post on social media).

या पोस्टमध्ये राजेश्वरीने तिच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच, तिने बऱ्याच गोष्टी या पोस्टमध्ये लिहिल्या आहेत. शाळेतील मुलगी ते आज या झगमगाटी विश्वाचा एक भाग बनलेल्या राजेश्वरीने तिच्या या प्रवासाविषयी देखील काही गोष्टी लिहिल्या आहेत.

पाहा ‘शालू’ची पोस्ट

(Happy Birthday Rajeshwari Kharat shalu fame actress wrote post on social media)

काय म्हणतेय ‘शालू’?

‘Many Many Happy Returns Of The Day Dear Rajeshwari .. 🎂🥂☺️❤️ वय विचारू नका थोडी लाज वाटते परंतु अनुभवाबद्दल सांगायच झाल तर बर्‍याच प्रमाणात वाईट ही होता आणि खूप सार्‍या प्रमाणात चांगला ही होता. अनेक लोक भेटली कोणी आपले झाले कोणी काम झाल्यावर बाजूला झाले व कोणी अजूनही सोबत उभे आहेत. वेळ चांगली असो वाईट असो आपण सर्व माझ्यासोबत होता आणि आपण दिलेल्या प्रेमामुळे आज राजेश्वरी येथे पोहोचली आहे.

वैयक्तिक आयुष्यात राजेश्वरी कोण आहे कशी आहे याची कल्पना फार कमी लोकांना आहे. कधी नजर वर करून न चालणारी, आपल्या कामाशी काम ठेवणारी, कोणी काही बोललं तर ढसा ढसा रडणारी चष्मा लावून दोन वेण्या बांधुन सायकलवर शाळेला जाणारी खूप साधारण मुलगी होती राजेश्वरी.

आयुष्यात एक मोठा बदल लिहलेला होता तो घडून आला आणि ती मराठी चित्रपटसृष्टी मध्ये झळकली. अभिनयाचा काहीच वारसा नसलेल्या त्या मुलीला सुरुवातीला माहिती नव्हते हे नवीन जग काय असतं. कोणी सांगितलं तसं करून पाहिले कधी स्वतःच्या मानाने करून चुका ही घडल्या आणि असेच चुकत चुकत बराच अनुभव आला (Happy Birthday Rajeshwari Kharat shalu fame actress wrote post on social media).

लोकांची परख कशी करावी माहित नव्हते म्हणुन आयुष्यात अनेक ठिकाणी चुका घडल्या परंतु त्यातून जे काही शिकायला मिळाले ते पुढे फार उपयोगाचे ठरले. आज सरळ तोंडावर खरे बोलण्याच्या सवयीमुळे बर्‍याच कमी प्रमाणात लोकांना ती आवडते. अभिनेत्री म्हणाल्यावर कोणी कधी कोणती अफवा पसरवेल याचा नेम नाही परंतु हे सुद्धा सकारात्मकपणे सांभाळून आजसुद्धा राजेश्वरी आपल्या आयुष्यात खूप खुश आहे. इतर वेळी कधी बोलायला वेळ मिळत नाही, आज वाढदिवसानिमित्त थोडं बोलायला मिळाले.

असो, आपण सर्वांच्या प्रेमामुळे आज फार छान वाटल, काल रात्रीपासूनच फोन, मेसेज इतक्या प्रमाणात चालू झाले आहेत की काय सांगावे. परिस्थिती पाहता मी आज वाढदिवस साजरा करणार नाही, तरी माझ्या आग्रहाने आपन सर्वांनी थोडे थोडे तोंड गोड करून घ्या आणि जसे जमेल तसे आपली व आपल्या जवळच्यांची काळजी घ्या, मास्लाक वा विनाकारण बाहेर फिरू नका. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार आणि खूप खूप प्रेम.’

राजेश्वरीची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चेत आली आहे. तर, तिचे चाहते देखील तिच्या या पोस्टवर भरभरून कमेंट करत आहेत.

(Happy Birthday Rajeshwari Kharat shalu fame actress wrote post on social media)

हेही वाचा :

Video | जान्हवी कपूर विसरा, जब्याच्या शालूचा ‘नदियो पार…’ अंदाज पाहा!

Sweetu | निरागस चेहरा, भाबडं हास्य, स्वीटूचा बालपणीचा क्यूट फोटो पाहिलात का?

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI