Happy Birthday Sonakshi Sinha | पहिल्या चित्रपटाच्या मानधनातून सोनाक्षीने केले होते ‘हे’ कौतुकास्पद काम, जाणून तुम्हालाही वाटेल अभिमान!

बॉलिवूडची ‘दबंग गर्ल’ अर्थात अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) हिने 2010मध्ये बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. सलमान खान अभिनीत ‘दबंग’ या चित्रपटातून सोनाक्षीला बरीच प्रसिद्धी मिळाली होती.

Happy Birthday Sonakshi Sinha | पहिल्या चित्रपटाच्या मानधनातून सोनाक्षीने केले होते ‘हे’ कौतुकास्पद काम, जाणून तुम्हालाही वाटेल अभिमान!
सोनाक्षी सिन्हा
Follow us
| Updated on: Jun 02, 2021 | 10:28 AM

मुंबई : बॉलिवूडची ‘दबंग गर्ल’ अर्थात अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) हिने 2010मध्ये बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. सलमान खान अभिनीत ‘दबंग’ या चित्रपटातून सोनाक्षीला बरीच प्रसिद्धी मिळाली होती. या चित्रपटातील तिचा संवाद ‘थप्पड से दर्द नहीं लगा साहब, प्यार से लगता है’ बराच लोकप्रिय झाला होता. शत्रुघ्न सिन्हा यांची कन्या असूनही सोनाक्षीने आपल्या मेहनतीने आणि कौशल्याने आपले नाव कमावले. तसेच, सोनाक्षी सिन्हा जशी एक उत्तम अभिनेत्री आहे, तशीच ती एक चांगल्या मनाची व्यक्ती देखील आहे. पहिल्याच चित्रपटातून मिळालेले मानधन सोनाक्षीने एका चांगल्या कामासाठी वापरले होते (Happy Birthday Sonakshi Sinha actress donate her first payment to NGO).

सोनाक्षी सिन्हाने आपले पहिले मानधन सलमान खानची स्वयंसेवी संस्था ‘बीईंग ह्यूमन’ला दान केले होते. सलमान खानची ‘बीईंग ह्यूमन’ ही संस्था गरजू लोकांना मदत करते. या संस्थेच्या माध्यमातून गरजू लोकांना आरोग्य सुविधा दिल्या जातात आणि त्याचबरोबर गरीब मुलांच्या शिक्षणाचा खर्चदेखील ते पार पाडतात. तर, याच संस्थेला मदत करत, सोनाक्षीने आपला पहिला पगार गरजू लोकांच्या काल्यासाठी दिला.

याबद्दल सांगताना सोनाक्षी सिन्हा, कपिल शर्माच्या कार्यक्रमात म्हणाली होती की, प्रत्येकाच्या आई-वडिलांप्रमाणेच माझ्या आई-वडिलांनीसुद्धा वाटत होते की, मी माझा पहिला पगार चांगल्या गोष्टीसाठी खर्च करावा. म्हणून त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी माझे पहिले मानधन ‘‘बीईंग ह्यूमन’ला देऊ केले. कपिल शर्माच्या शोमध्ये सोनाक्षीने याचा खुलासा केला होता.

View this post on Instagram

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)

दबंगसाठी 30 किलो वजन कमी केले!

‘दबंग’मध्ये काम करण्यापूर्वी सोनाक्षीचे वजन 90 किलो असायचे. हा चित्रपट साईन करण्यापूर्वी सलमानने सोनाक्षीला स्वतःचे वजन करण्यास सांगितले होते. यानंतर सलमानची आज्ञा मानून सोनाक्षीने तिचे वजन 30 किलोंनी कमी केले होते. सोनाक्षीचे रूपांतरण पाहून खुद्द सलमानलाही धक्का बसला होता (Happy Birthday Sonakshi Sinha actress donate her first payment to NGO).

सलमानच्या घरातील ‘या’ व्यक्तीशी जोडले गेले नाव

सलमान खानच्या वहिनीचा भाऊ बंटी सचदेव याच्याशी सोनाक्षीचे नाव जोडले गेले होते. दोघांनाही एकत्र पार्टी, डिनर, लंच दरम्यान स्पॉट केले गेले होते. मात्र, अभिनेत्रीने बंटीचे नेहमीच तिचा चांगला मित्र म्हणून वर्णन केले आहे.

सोनाक्षीचे आगामी प्रोजेक्ट

सोनाक्षी शेवट 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दबंग 3’ या चित्रपटामध्ये दिसली होती. त्यानंतर ती इतर कोणत्याही चित्रपटात दिसली नाही. सध्या तिच्याकडे एक मोठा प्रोजेक्ट आहे. ‘भुज द प्राईड ऑफ इंडिया’ या चित्रपटात ती दिसणार आहे. या चित्रपटात सोनाक्षीसह अजय देवगन, संजय दत्त आणि नोरा फतेही मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्याचे वृत्त सध्या चर्चेत आहे.

(Happy Birthday Sonakshi Sinha actress donate her first payment to NGO)

हेही वाचा :

Breakup Story | लग्नापर्यंत पोहोचलं होतं राणी-अभिषेकचं नातं, चित्रपटातला ‘तो’ सीन ठरला ब्रेकअपचं कारण!

Priya Bapat : स्मायलिंग स्टार…,प्रिया बापटचं मनमोकळं आणि दिलखुलास हास्य

Non Stop LIVE Update
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.