Video | बेडरूममध्ये फारशी साफ करतेय ‘हरयाणवी क्वीन’ सपना चौधरी, लेकाचीही दिसली झलक, पाहा व्हिडीओ

हरियाणवी क्वीन सपना चौधरी (Haryanvi Queen Sapna Choudhary)  नेहमीच तिच्या वेगळ्या स्टाईलसाठी ओळखली जाते. आपल्या डान्स आणि गाण्यांमुळे सपना चाहत्यांच्या मनावर राज्य करते.

Video | बेडरूममध्ये फारशी साफ करतेय ‘हरयाणवी क्वीन’ सपना चौधरी, लेकाचीही दिसली झलक, पाहा व्हिडीओ
सपना चौधरी

मुंबई : हरियाणवी क्वीन सपना चौधरी (Haryanvi Queen Sapna Choudhary)  नेहमीच तिच्या वेगळ्या स्टाईलसाठी ओळखली जाते. आपल्या डान्स आणि गाण्यांमुळे सपना चाहत्यांच्या मनावर राज्य करते. त्याचबरोबर तिची देसी स्टाईल देखील तिच्या चाहत्यांना नेहमीच खूप पसंत पडते. सपना आज कितीही मोठी स्टार झाली असली पण तरीही तिला मातीशी जोडलेले राहणे आवडते. दरम्यान, सपनाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत (Haryanvi Queen Sapna Choudhary cleaning floor on her latest song video goes viral).

काही काळापूर्वी सपना चौधरीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये ती टीव्हीवर नुकतीच रिलीज झालेले तिचे ‘घुंगरू’ हे गाणे लावून संपूर्ण खोलीची फरशी साफ करताना दिसत आहे. त्याचवेळी, कोणीतरी तिचा व्हिडीओ बनवताना दिसत आहे. तथापि, या व्हिडीओमध्ये शूटिंग करणाऱ्याचा चेहरा दिसत नाही. जवळच्या पलंगावरही तिच्या चिमुकल्या मुलाचे पाय दिसतात. त्याचवेळी व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की, सपना कॅमेरा पाहताच नाचतानाही दिसत होती. यावेळी तिने लोअर टी-शर्ट घातला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करताना सपनाने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘कधीकधी तुम्हाला तुमच्या कंपनीचा आनंद घेण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो.’

पाहा सपना चौधरीचा व्हिडीओ

 

View this post on Instagram

 

A post shared by Sapna Choudhary (@itssapnachoudhary)

 (Haryanvi Queen Sapna Choudhary cleaning floor on her latest song video goes viral)

‘घागरा’वर सपनाचे ठुमके

यापूर्वी सपनाने इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचा एक नवीन डान्स व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये सपना तिच्या घरात टीव्हीसमोर हरियाणवी गाणे ‘घागरा’वर पिवळ्या ड्रेसमध्ये डान्स करताना दिसली होती. या डान्स व्हिडीओला सपनाचे चाहते प्रचंड पसंती देत ​​आहेत आणि कमेंट करत आहेत. सपनाची लोकप्रियता अशी आहे की, तिच्या कोणत्याही गाण्यावर लगेचच कोट्यावधी व्यूव्ह मिळतात.

हरियाणवी क्वीन सपना चौधरी नेहमीच तिच्या देसी स्टाईलबाबत चर्चेत असते. हरियाणवी गाण्यांवर नाचणारी सपना चौधरी तिच्या चाहत्यांच्या मनावर राज्य करते. त्याचबरोबर तिची देसी स्टाईल आणि संसारावरील प्रेम तिच्या चाहत्यांना खूप आवडले आहे. लॉकडाऊन दरम्यान फारशी साफ करतानाचा तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आला आहे. सपना चौधरीचा हा व्हिडीओ खूप पाहिला जात आहे.

(Haryanvi Queen Sapna Choudhary cleaning floor on her latest song video goes viral)

हेही वाचा :

90 टक्के डॉक्टर राक्षस झालेत, आक्षेपार्ह भाषा अंगलट, कॉमेडियन सुनिल पालविरोधात गुन्हा

अभिनेते दलिप ताहील यांचा मुलगा ड्रग्ज प्रकरणी अटकेत, व्हॉट्सअ‍ॅप चॅटवरुन ध्रुव ताहिलवर कारवाई

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI