AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिनेते दलिप ताहील यांचा मुलगा ड्रग्ज प्रकरणी अटकेत, व्हॉट्सअ‍ॅप चॅटवरुन ध्रुव ताहिलवर कारवाई

ध्रुव ताहील एका ड्रग पेडलर्सच्या संपर्कात होता. तो पेडलरकडून वारंवार ड्रग्जची मागणी करत होता. (Dalip Tahil Son Dhruv drugs case)

अभिनेते दलिप ताहील यांचा मुलगा ड्रग्ज प्रकरणी अटकेत, व्हॉट्सअ‍ॅप चॅटवरुन ध्रुव ताहिलवर कारवाई
ध्रुव ताहिल, दलिप ताहिल
| Updated on: May 21, 2021 | 12:05 PM
Share

मुंबई : प्रख्यात अभिनेते दलिप ताहील (Dalip Tahil) यांच्या मुलाला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी विभागाकडून ध्रुव ताहील (Dhruv Tahil) याला बेड्या ठोकण्यात आल्या. ध्रुव ड्रग पेडलरकडे व्हॉट्सअ‍ॅपवरुन वारंवार अंमली पदार्थांची मागणी करत असल्याचं समोर आलं आहे. (Veteran Actor Dalip Tahil Son Dhruv Tahil arrested by NCB in drugs case)

ड्रग्जसाठी पैसे दिल्याचंही उघड

ध्रुव ताहील एका ड्रग पेडलर्सच्या संपर्कात होता. तो पेडलरकडून वारंवार ड्रग्जची मागणी करत होता. ड्रग्जसाठी ध्रुवने त्याला पैसे दिल्याचंही उघड झालं आहे. दोघांच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटिंगवरुन अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करत ध्रुव ताहील याला अटक केली. एनडीपीएस कायद्याअंतर्गत ध्रुवला अटक झाली असून त्याला वांद्रे क्राईम ब्रांचमध्ये ठेवण्यात आले होते. आज त्याला कोर्टात हजर केले जाईल.

व्हॉट्सअ‍ॅप संभाषण समोर

35 ग्रॅम एमडी ड्रग्ज प्रकरणात अँटी नार्कोटिक्स सेलकडून 20 एप्रिलला मुजमिल अब्दुल रहमान शेख याला अटक करण्यात आली होती. त्याचा मोबाईल अंमली पदार्थ विरोधी विभागाने ताब्यात घेतला. तेव्हा त्याच्या व्हॉट्सअॅपवर ध्रुव ताहील याच्यासोबतचे संभाषण समोर आले. ध्रुव मुजमिलकडे वारंवार ड्रग्जची मागणी करत होता.

मार्च 2019 पासून दोघं संपर्कात

ध्रुवने ड्रग्जसाठी आरोपी मुजमिलच्या बँक खात्यात सहा वेळा ऑनलाईन पैसेही ट्रान्सफर केले होते, असं तपासात स्पष्ट झालं. मार्च 2019 पासून दोघं संपर्कात असल्याची माहिती आहे. त्यानंतर अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून ध्रुव ताहील याला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.

(Veteran Actor Dalip Tahil Son Dhruv Tahil arrested by NCB in drugs case)

कोण आहेत दलिप ताहिल?

68 वर्षीय दलिप ताहिल जवळपास पाच दशकांपासून चित्रपट क्षेत्रात कार्यरत आहेत. ताहिल यांच्या खलनायकी भूमिका प्रचंड गाजल्या आहेत. अंकुर चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर शान, अर्थ, आखरी रास्ता, बुनियाद, जलवा, राम लखन, अजूबा, सौदागर, हम है राही प्यार के, डर, सुहाग, इश्क, कहो ना प्यार है असे एकापेक्षा एक सिनेमे गाजले आहेत.

संबंधित बातम्या :

दिया मिर्झाच्या एक्स मॅनेजरला NCB कडून अटक, तब्बल 200 किलो गांजा जप्त!

ड्रग्ज प्रकरणी चौकशीत समोर आले नाव, NCBची धाड पडताच टीव्ही अभिनेता झाला पसार!

(Veteran Actor Dalip Tahil Son Dhruv Tahil arrested by NCB in drugs case)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.