
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांची लेक ईशा देओल गेल्या काही दिवसांपासून खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. 12 वर्षांच्या संसारानंतर ईशा देओल आणि उद्योजकल भरत तख्तानी यांचा घटस्फोट झाला आहे. घटस्फोटानंतर अभिनेत्री मुलींचा सांभाळ करत आहे. तर भरत तख्तानी याने घटस्फोटानंतर रिलेशनशिपबद्दल मोठा खुलासा केला. भरत याने सोशल मीडियावर गर्लफ्रेंडचा फोटो पोस्ट करत ‘माझ्या कुटुंबात तुझं स्वागत…’ असं कॅप्शन लिहिलं होतं.
भरत नंतर ईशा हिने देखील खासगी आयुष्यावर मोठं वक्तव्य केलं आहे. ‘मी कायम प्रेमावर विश्वास ठेवला आहे. आयुष्यात प्रेम केलं पाहिजे… पण आयुष्यात प्रेम आणि सोबत कायम असली पाहिजे… पण सर्वकाही आयुष्यात मिळत नाही..’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.
पुढे ईशा हिने तिच्या मुलींबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं. ‘बॉलिवूडमध्ये माझ्या मुली पदार्पण करतील की नाही मला माहिती नाही. कारण त्या लहान आहेत आणि शिकत आहेत. त्यांना त्यांच्या आजीच्या गाण्यांवर डान्स करायला प्रचंड आवडतं. दोघी ‘धूम मचाले’ आणि ‘दिलबरा’ गाण्यावर डान्स करत असतात. मोठ्या मुलीला माझ्या आईचं ‘भूत राजा बाहर आजा’ हे गाणं प्रचंड आवडतं. ईशा सोशल मीडियावर देखील मुलींसोबत फोटो पोस्ट करत असते.
अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर भरत आणि ईशा यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. 2 मुलींच्या जन्मानंतर ईशा आणि भरत विभक्त झाले. पण घटस्फोटाच्या जवळपास 18 महिन्यांनंतर भरत याने दुसऱ्या प्रेमाची कबुली दिली आहे. सध्या सर्वत्र ईशा देओल हिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.
ईशा सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात. घटस्फोटानंतर ईशाने पुन्हा नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे.