धर्मेंद्र यांच्या निधनानंतर हेमा मालिनी यांचं सावत्र मुलांसोबत कसंय नातं? ड्रीम गर्लने समोर ठेवलं मोठं सत्य
Hema Malini after Dharmendra Death : धर्मेंद्र यांच्या पहिल्या कुटुंबाचे हेमा मालिनी यांच्यासोबत मतभेद... सावत्र मुलांसोबत कसं आहेत अभिनेत्रीचे संबंध? अखेर ड्रीम गर्लने सत्य समोर मोठं ठेवलंच...

Hema Malini after Dharmendra Death : बॉलिवूडचे दिग्गज आणि लोकप्रिय अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनानंतर त्यांच्या दोन्ही कुटुंबात मतभेद आहेत… अशा चर्चांनी जोर धरला. त्यामागे कारण देखील तसं आहे. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर देओल कुटुंबियांनी आणि हेमा मालिनी यांनी वेगवेगळ्या शोक सभेचं आयोजन केलं. देओल यांनी आयोजित केलेल्या शोक सभेत हेमा मालिनी आणि त्यांच्या दोन मुली दिसल्या नाहीत… यांच कारणामुळे चर्चांनी जोर धरला… तर त्याच दिवशी म्हणजे 27 नोव्हेंबर रोजी हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्यासाठी पूजा ठेवली होती.
हेमा मालिनी यांनी आयोजित केलेल्या शोक सभेत अभिनेता सनी देओल आणि बॉबी देओल देखील दिसले नाहीत… याच कारणामुळे सावत्र मुलांसोबत हेमा मालिनी यांचं संबंध कसे आहेत? असा प्रश्न देखील अनेकांनी विचारला. यावर नुकताच झालेल्या एका मुलाखतीत हेमा मालिनी यांनी स्पष्ट उत्तर दिलं आहे.
हेमा मालिनी म्हणाल्या, ‘आमचं अत्यंत चांगलं आणि प्रेमळ आहे… आज देखील तसंच आहे… मला कळत नाही लोक असं का विचार करतात की आमच्याच मतभेद आहे… कदाचित त्यांनी गॉसिप हवं आहे… मला त्यांना का उत्तर द्यायला हवं? माझं स्पष्टीकरण खरंच गरजेचं आहे? हे माझं आयुष्य आहे.. माझं खासगी आयुष्य आहे आणि आम्ही आनंदी आहे… एकमेकांच्या संपर्कात आहोत… एवढंच सांगेल…’
पुढे हेमा मालिनी म्हणाल्या, ‘मला याबद्दल काहीही बोलायचं नाही. कोणाच्या दुःखाचा वापर करुन आर्टिकल तयार करण फार वाईट आहे… याच कारणामुळे मला कोणत्या प्रश्नाचं उत्तर लिहियाचं नाही. ‘
धर्मेंद्र आणि हेमा मालिनी
धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. फक्त पडद्यावरच नाही तर, खासगी आयुष्यात देखील दोघांच्या जोडीला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. दरम्यान, धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी देखील जोर धरला. जवळपास 5 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी लग्न केलं.
1980 मध्ये धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी कुटुंबिय आणि समाजाच्या विरोधात जात लग्न केलं. हेमा मालिनी यांच्यासोबत लग्न केलं तेव्हा धर्मेंद्र विवाहित आणि चार मुलांचे वडील देखील होते. पण धर्मेंद्र आणि हेमा मालिनी फक्त त्यांच्या भावनांना अधिक महत्त्व दिलं. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांना दोन मुली आहे. पण धर्मेंद्र यांची दुसरी पत्नी म्हणून हेमा मालिनी यांचं आयुष्य फार कठीण होतं.
