शिवरायांबद्दल राहुल सोलापूरकरांचं वादग्रस्त वक्तव्य; हेमंत ढोमे म्हणाला ‘स्वस्तातल्या इतिहासाचार्यांकडे..’
Rahul Solapurkar: उगाच सगळे सोलापूरकर बदनाम..; शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राहुल सोलापूरकरांवर हेमंत ढोमेने साधला निशाणा, त्यांच्या वक्तव्यावर राजकीय आणि सिने क्षेत्रातून तीव्र प्रतिक्रिया

छत्रपती शिवाजी महाराज यांनी आग्र्याहून सुटकेसाठी पेटाऱ्यांचा वापर केला नव्हता, तर औरंगजेबाच्या वजिराला आणि त्याच्या बायकोलासुद्धा महाराजांनी लाच दिलेली… असं वादग्रस्त वक्तव्य अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केलं आहे. महाराजांबद्दल सोलापूरकर यांनी केलेल्या वक्तव्यावर राजकीय आणि सिने क्षेत्रातून देखील तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. आता दिग्दर्शक ढोमे याने देखील राहुल सोलापूरकर यांच्यावर निशाणा साधला आहे. सोलापूरकरांवर निशाणा साधत ‘स्वस्तातल्या इतिहासाचार्यांकडे सुज्ञांनी लक्ष न दिलेले बरे!’ असं म्हणाला आहे.
एक्सवर पोस्ट शेअर करत हेमंत याने राहुल सोलापूरकर यांच्यावर निशाणा साधला. ‘इतिहासाला त्याच्या जागी राहूद्या!आम्हाला आमच्या महाराजांच्या “रंजक” गोष्टींमधेच रमूद्या! रोज उठून नवा इतिहास सांगणारे स्वतःचे भविष्य अंधारात असणारे असतात! असल्या दुर्लक्षित आणि स्वतःकडे लक्ष वेधू पाहणाऱ्या स्वस्तातल्या इतिहासाचार्यांकडे सुज्ञांनी लक्ष न दिलेले बरे! उगच सगळे सोलापूरकर बदनाम होतात! #जयशिवराय’ असं हेमंत म्हणाला आहे. सध्या दिग्दर्शकाचं ट्विट तुफान व्हायरल होत आहे.




इतिहासाला त्याच्या जागी राहूद्या! आम्हाला आमच्या महाराजांच्या “रंजक” गोष्टींमधेच रमूद्या!
रोज उठून नवा इतिहास सांगणारे स्वतःचे भविष्य अंधारात असणारे असतात!
असल्या दुर्लक्षित आणि स्वतःकडे लक्ष वेधू पाहणाऱ्या स्वस्तातल्या इतिहासाचार्यांकडे सुज्ञांनी लक्ष न दिलेले बरे!
उगच…
— Hemant Dhome | फसक्लास ढोमे (@hemantdhome21) February 4, 2025
अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी वक्तव्याने राज्यात नवीन वादाला तोंड फुटले आहे. तर त्यांनी आपले शब्द मागे घेवून माफी मागावी अशी मागणी हिंदू महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आनंद दवे यांनी केली आहे. छत्रपतींच्या बुद्धीचतुर्यावर आणि धाडसावर शंका घेणं हे पापच… आग्रा येथून सूटताना महाराज लाच देऊन सुटले हे राहूल सोलापूरकर यांचे विधान धक्का दायक आहे… असं आनंद दवे म्हणाले.
राहुल सोलापूरकर यांचं वक्तव्य
याला नग्न करून चाबकाचे फटके द्यावेच लागतील याचा पत्ता मिळेल का?@mnsadhikrut ही कीड ठेचलीच पाहिजे pic.twitter.com/PQBb5GQIcg
— Manoj B Chavan waterman (@ManojBChavan5) February 4, 2025
“छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून सुटले, मिठाईचे पेटारे-बिटारे काही नव्हते. चक्क लाच देऊन महाराज आले आणि त्यासाठी किती हुंडा वटवल्या आहेत, याचेसुद्धा पुरावे आहेत. अगदी औरंगजेबाच्या वजिराला आणि त्याच्या बायकोलासुद्धा लाच दिलेली आहे महाराजांनी. मोहसिन खान का मोईन खान नाव आहे बहुतेक त्याचं.. त्याच्याकडून अधिकृत शिक्क्याचे परवाने घेऊन सगळे बाहेर पडले. स्वामी परमानंद पाच हत्ती घेऊन शेवटचे गेले, त्याच्या परवान्याची अजूनही खूण सुद्धा आहे. लोकांना गोष्टी रुपात सांगताना काहीतरी रंजक करून सांगावं लागतं. मग ती रंजकता आली की इतिहास बाजूला टाकला जातो…’ सध्या सोलापूरकरांचं व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.