AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बॉलिवूडचा ‘फ्लॉप’ हिरो, बायकोच्याच बेस्टफ्रेंडसोबत केलं लग्न, 129 कोटींचा मालक असलेल्या अभिनेत्याला ओळखलं का?

असा एक बॉलिवूड अभिनेता ज्याचे जवळपास सर्वच चित्रपट हे फ्लॉप झाले. मात्र तरीही तो 129 कोटींचा मालक आहे. त्याच्या करिअरसोबतच त्याच्या खासगी आयुष्याबद्दलही बऱ्याच गोष्टी चर्चेचा विषय ठरल्या होत्या. जसं की, बायकोच्याच मैत्रिणीसोबत अफेअर अन् लग्न. कोण आहे हा अभिनेता?

बॉलिवूडचा 'फ्लॉप' हिरो, बायकोच्याच बेस्टफ्रेंडसोबत केलं लग्न, 129 कोटींचा मालक असलेल्या अभिनेत्याला ओळखलं का?
Mayuri Sajerao
Mayuri Sajerao | Updated on: Mar 09, 2025 | 9:01 AM
Share

बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांच्या चित्रपटांपेक्षाही त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलची जास्त चर्चा झालेली आहे. तसेच असेही काही अभिनेते आहेत जे गायक आहेत ज्यांनी गायनासोबतच अभिनयातही आपलं नशीब आजमावलं आहे. असाच एक प्रसिद्ध गायक आहे ज्याची गाणी तर हीट ठरली पण चित्रपट मात्र फ्लॉप ठरला. पण असं असूनही तो कोट्यवधींचा मालक आहे. एवढंच नाही तर त्याचा आणि सलमान खानचा झालेला वादही बॉलिवूडमध्ये चर्चेचा विषय होता. तरीही हा गायक असलेला अभिनेता आज 129 कोटींचा मालक आहे. चला तर मग जाणून घेऊया या अभिनेत्याबद्दल.

जवळपास सगळेच चित्रपट फ्लॉप

हा अभिनेता आहे हिमेश रेशमिया आहे. जो मुख्यत: प्रसिद्ध गायक आहे.नुकताच त्याचा ‘बॅड अ‍ॅस रवी कुमार’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट 7 फेब्रुवारीला प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फक्त 4 दिवसांमध्ये 6.75 कोटींची कमाई केली. आणि या चित्रपटाचं बजेट होतं 20 कोटी. याचा अर्थ हा चित्रपट फ्लॉप ठरला आहे. अभिनेत्याने 2007 मध्ये ‘आपका सुरूर’ या चित्रपटातून अभिनय कारकि‍र्दीला सुरुवात केली होती. ज्यामध्ये हिमेश रेशमियासोबत हंसिका मोटवानी दिसली होती. त्यानंतर त्याने 1980 च्या दशकातील ‘कर्ज’चा रिमेक बनवला, तोही फ्लॉप ठरला. हा चित्रपट सर्वात मोठ्या फ्लॉपपैकी एक म्हणून देखील लक्षात ठेवला जातो.

फ्लॉप असूनही संपत्ती 129 कोटी रुपये

हिमेशने आतापर्यंत अनेक गाणी गायली आणि शक्यतो ती सर्व गाणी हिट ठरली. परंतु, 14 वर्षांमध्ये त्याने एकही हिट चित्रपट दिला नाही. आतापर्यंत त्याने 9 चित्रपटांमध्ये काम केलं आहे. जवळपास सर्वच फ्लॉप ठरली आहेत. तरी देखील हिमेश रेशमिया हा इंडस्ट्रीमधील एक लोकप्रिय अभिनेता आहे. मिडिया रिपोर्टनुसार, हिमेश रेशमियाची एकूण संपत्ती 129 कोटी रुपये आहे. एका गाण्यासाठी तो 15 लाख रुपये घेतो.

बायकोच्याच मैत्रिणीसोबत लग्न 

असं असलं तरी, हिमेश रेशमिया हे इंडस्ट्रीतील एक लोकप्रिय नाव आहे. हिमेशचं प्रोफेशनलसोबतच वैयक्तिक आयुष्यही चर्चेत होतं. त्याची दोन लग्न झाली असून पहिलं लग्न कोमलसोबत झालं होतं. पण लग्नाच्या 22 वर्षांनंतर त्यांचा 2016 मध्ये घटस्फोट झाला. या लग्नापासून त्याला एक मुलगाही आहे. त्यानंतर हिमेशने त्याच्या एक्स-पत्नीची मैत्रीण सोनियासोबत दुसरं लग्न केलं. हिमेशचे त्याच्या एक्स-पत्नीच्या मैत्रिणीसोबत अफेअर होतं आणि त्यामुळेच त्यांचा घटस्फोट झाला असं म्हटलं जातं.आताही हिमेशची नवनवीन गाणी तयार करण्याची प्रोसेस सुरुच आहे. तो नेहमी नवीन गायकांना संधी देत असतो. शिवाय तो अनेक गाण्यांच्या शोमध्ये जज म्हणूनही आपली भूमिका निभावतो.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?