‘स्वत:ला सुधार अन्यथा..’ उर्फी जावेदच्या ड्रेसिंग सेन्सवरून हिंदुस्तानी भाऊचा इशारा

स्वाती वेमूल, Tv9 मराठी

|

Updated on: Nov 13, 2022 | 8:01 PM

हिंदुस्तानी भाऊच्या धमकीवर उर्फी जावेदचं उत्तर; म्हणाली..

'स्वत:ला सुधार अन्यथा..' उर्फी जावेदच्या ड्रेसिंग सेन्सवरून हिंदुस्तानी भाऊचा इशारा
हिंदुस्तानी भाऊची उर्फी जावेदला धमकी
Image Credit source: Instagram

मुंबई- बिग बॉस ओटीटी फेम अभिनेत्री उर्फी जावेद ही तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे प्रचंड चर्चेत असते. अनेकदा तिला तिच्या कपड्यांमुळे ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. मात्र ट्रोलर्सनाही उर्फीने सडेतोड उत्तरं दिली आहेत. आता पुन्हा उर्फी तिच्या फॅशनमुळे चर्चेत आली आहे. बिग बॉस फेम हिंदुस्तानी भाऊ याने व्हिडीओ शेअर करत उर्फीला धमकी दिली आहे. त्यावर आता उर्फीनेही उत्तर दिलं आहे.

उर्फीच्या कपड्यांबाबत हिंदुस्तानी भाऊने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये तो म्हणतोय, “सुधर उर्फी.. जय हिंद! हा मेसेज उर्फी जावेदसाठी आहे, जी आताच्या घडीला स्वत:ला सर्वांत मोठी फॅशन डिझायनर समजतेय. फॅशनच्या नावाखाली ती जे कपडे परिधान करत फिरतेय, त्याचा समाजावर चुकीचा परिणाम होतोय. ही भारतीय संस्कृती नाही.”

उर्फीने जर असे कपडे परिधान करणं थांबवलं नाही तर त्याचा परिणाम तिला भोगावा लागेल, असा इशाराच हिंदुस्तानी भाऊने या व्हिडीओतून दिला आहे. आता या संपूर्ण व्हिडीओला उर्फीने इन्स्टाग्रामवर शेअर करत उत्तर दिलं आहे.

हे सुद्धा वाचा

मी कोणाला घाबरत नाही, असं थेट उर्फीने म्हटलंय. त्याचप्रमाणे तिने हिंदुस्तानी भाऊवर दुटप्पी असल्याची टीका केली आहे. हिंदुस्तानी भाऊच्या टीमने एकदा मला मदतीची ऑफर दिली होती, मात्र ती ऑफर नाकारल्यापासून हे लोक माझ्या मागे लागले आहेत, असं उर्फी पुढे म्हणते.

“सुरुवातीला त्यांनी मैत्रीचा हात पुढे केला. मात्र मी त्यांची मैत्री नाकारल्याने आता ते धमकी देत आहेत. तुम्ही ज्याप्रकारे शिव्या देता, ते आधी सुधारा. तुमच्या शिव्यांमुळे किती लोकं सुधारली आहेत”, असा प्रतिप्रश्न तिने हिंदुस्तानी भाऊला केला.

उर्फीने हेसुद्धा सांगितलं की काही काळापूर्वी हिंदुस्तानी भाऊला उर्फीकडून स्वत:चं प्रमोशन करायचं होतं. मात्र त्यास नकार दिल्याने त्यांनी धमकी देण्यास सुरुवात केली, असं ती म्हणाली.


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI