AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hindustani Bhau |‘हिंदुस्थानी भाऊ’ विकास पाठकला मातृशोक, चाहत्यांकडून भाऊचे सांत्वन!

‘बिग बॉस’च्या 13व्या सिझनचे स्पर्धक हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास पाठक यांच्या आईचे नुकतेच निधन झाले आहे. याबाबत त्याने सोशल मीडियावर माहिती शेअर केली.

Hindustani Bhau |‘हिंदुस्थानी भाऊ’ विकास पाठकला मातृशोक, चाहत्यांकडून भाऊचे सांत्वन!
| Updated on: Oct 28, 2020 | 6:18 PM
Share

मुंबई : ‘बिग बॉस’च्या 13व्या सिझनचे स्पर्धक हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास पाठक यांच्या आईचे नुकतेच निधन झाले आहे. याबाबत त्याने सोशल मीडियावर माहिती शेअर केली. त्यानंतर चाहत्यांनी शोक व्यक्त करत हिंदुस्थानी भाऊ आम्ही तुमच्या आणि कुटुबियांच्या दु:खात सहभागी आहोत, असे म्हणत सांत्वनपर प्रतिक्रिया दिल्या आहेत. विकास पाठक यांची आई काही दिवसांपासून आजारी होती. याबाबत स्वत: विकास पाठक यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून आईच्या तब्येतीची माहिती दिली होती. विकासन पाठकने आपल्या ट्विटर अकाउंटवर आईच्या कपाळाला चुंबन घेतानाचा फोटो शेअर केला होता. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले होते की, ‘कृपया माझ्या आईसाठी प्रार्थना करा, ती लवकर बरी होऊ दे’. (Hindustani Bhau’ Vikas Pathak mother’s death)

हिंदुस्थानी भाऊची एकता कपूर विरोधात तक्रार काही महिन्यांपूर्वी हिंदुस्थानी भाऊंनी एकता कपूरविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर ते प्रकरण कोर्टात गेले. त्यांनी असा आरोप केला आहे की, एकताने आपल्या अल्ट बालाजी वेब सीरिजमध्ये भारतीय सैन्याचा अपमान केला आहे, आणि त्यांचे चुकीचे वर्णन केले आहे. यामुळे सोशल मीडियावरही खळबळ उडाली आणि बऱ्याच लोकांनी एकता कपूर हिने भारतीय सैन्यदलाची माफी मागावी, अशी मागणी देखील केली होती. यानंतर एकतानेही दिलगिरी व्यक्त करत, तो भाग वेब सिरीजमधून काढून टाकला. कोण आहे ‘हिंदुस्थानी भाऊ’ ‘हिंदुस्थानी भाऊ’ म्हटल्यावर नक्कीच तुमच्या नजरेसमोर नक्कीच एका तरुणाचा चेहरा आणि त्याच्यावरचे मीम्स धडाधड आले असतील. ‘पहले फुर्सत में निकल’, असं म्हणत सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारा हा पठ्ठ्या ‘बिग बॉस 13’मध्ये (Youtube Sensation Hindustani Bhau) झळकला होता. ‘हिंदुस्तानी भाऊ’बाबत अनभिज्ञ असलेले मोजकेच नेटिझन्स असतील. विकास पाठक हा ‘हिंदुस्तानी भाऊ’ या नावाने टिकटॉक, यूट्युब आणि फेसबुकवर प्रसिद्ध आहे. देशाविरोधात भाष्य करणाऱ्यांची हिंदुस्तानी भाऊ आपल्या शैलीत फिरकी घेतो. भाऊचे यूट्युबवर तब्बल 10 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. ‘बिग बॉस’च्या तेराव्या पर्वात त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. विकासने वाईल्ड कार्ड एन्ट्री म्हणून 35 व्या दिवशी बिग बॉसच्या घरात प्रवेश केला होता. लहान वयातच विकासवर घरची जबाबदारी पडली होती. विकासचं शिक्षण सातवीपर्यंतच होऊ शकलं. वडिलांची नोकरी सुटल्यामुळे सुरुवातीच्या काळात खार जिमखान्यात 20 रुपये प्रतिदिन म्हणून बॉलबॉयची पहिली नोकरी त्याने धरली. त्यानंतर त्याने बारमध्ये वेटर म्हणून काम केलं. लोकलमध्ये आणि दारोदार जाऊन अगरबत्त्याही विकल्या. चायनीजच्या गाडीवरही भाऊने काम केलं आहे.

संबंधित बातम्या :

भारतीय सैन्याचा अवमान, निर्माती एकता कपूरविरोधात ‘हिंदुस्थानी भाऊ’ची पोलिसात तक्रार

पहले फुर्सत में निकल… कोण आहे मराठमोळा ‘हिंदुस्थानी भाऊ’?

(Hindustani Bhau’ Vikas Pathak mother’s death)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.