भारतीय सैन्याचा अवमान, निर्माती एकता कपूरविरोधात 'हिंदुस्थानी भाऊ'ची पोलिसात तक्रार

अल्ट बालाजीच्या 'XXX सीझन 2' वेब सीरिजमध्ये आक्षेपार्ह दृश्य असल्याची तक्रार विकास फाटकने केली आहे. (Hindustani Bhau Files a Police Complaint Against Ekta Kapoor)

भारतीय सैन्याचा अवमान, निर्माती एकता कपूरविरोधात 'हिंदुस्थानी भाऊ'ची पोलिसात तक्रार

मुंबई : प्रसिद्ध निर्मात्या एकता कपूर आणि शोभा कपूर या मायलेकींविरोधात मुंबईतील खार पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. वेब सीरीजच्या माध्यमातून भारतीय सैन्याचा अवमान केल्याप्रकरणी ‘बिग बॉस 13’चा स्पर्धक आणि सोशल मीडिया स्टार ‘हिंदुस्थानी भाऊ’ उर्फ विकास फाटक याने पोलिसात तक्रार दाखल केली. (Hindustani Bhau Files a Police Complaint Against Ekta Kapoor)

हिंदुस्थानी भाऊने पोलिस स्टेशनच्या बाहेरच व्हिडिओ शूट करत याविषयी माहिती दिली. “एकता कपूरविरोधात खार पोलिस ठाण्यात मी तक्रार दिली. देशद्रोही एकता कपूर आणि शोभा कपूर यांनी आपले भारतीय सैन्य, राष्ट्रीय प्रतीक, कर्नल टॅग आणि देशाचा अपमान केल्याबद्दल तक्रार नोंदवली.” असं त्याने लिहिलं आहे.

अल्ट बालाजीच्या ‘XXX सीझन 2’ वेब सीरिजमध्ये आक्षेपार्ह दृश्य असल्याची तक्रार विकास फाटकने केली आहे. “यांनी (एकता कपूर आणि शोभा कपूर) एका जवानावर वेब सीरिज काढली आहे. आपले जवान जेव्हा सीमेवर तैनात असतात, तेव्हा त्यांची पत्नी बॉयफ्रेंडसोबत गैरकृत्य करते. जवानांचा सैन्यातील गणवेश, जी आपली शान आहे, त्याचाही अवमान केला आहे. हे अत्यंत निंदनीय आहे. आपल्या जवानांची खिल्ली उडवण्यात आली आहे” असा आरोपही विकास फाटकने व्हिडिओतून केला आहे.

हेही वाचा : ट्विटरवर #युवराज_सिंह_माफी_मांगो का ट्रेंड होतंय?

(Hindustani Bhau Files a Police Complaint Against Ekta Kapoor)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *