Honey Singh याने सफाई कर्मचाऱ्यासोबत असं काय केलं? ज्यामुळे नेटकरी म्हणाले, ‘इंडस्ट्रीमधील…’
बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक आणि रॅपर हनी सिंग याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल; सर्वांसमोर हनीने सफाई कर्मचाऱ्यासोबत असं काय केलं? ज्यांमुळे चर्चेला उधाण..

Yo Yo Honey Singh Dance Video : बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक आणि रॅपर हनी सिंग (Yo Yo Honey Singh) याला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. नुकताच हनी सिंग याने अनेक वर्षांनंतर लेटेस्ट अल्बम हनी सिंह 3.0 च्या माध्यमातून दमदार कमबॅक केलं आहे. संगीत विश्वात पुन्हा धमाकेदार पदार्पण केल्यामुळे हनी सिंग तुफान चर्चेत आहे. याच दरम्यान हनी सिंग याचा एका व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये हनी सिंग स्टेजवर एका सफाई कर्मचाऱ्यासोबत डान्स करताना दिसत आहे. हनीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सध्या सर्वत्र रॅपर हनी सिंग याच्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओची चर्चा आहे. त्याच्या व्हिडीओवर चाहत्यांकडून कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे.
हनी सिंग कायम त्याच्या बिनधास्त अंदाजामुळे ओळखला जातो. फार ठराविक बॉलिवूड गायकांनी चाहत्यांच्या मनात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अशाच गायकांपैकी एक म्हणजे हनी सिंग. हनी सिंग कायम त्याच्या चाहत्यांसोबत दिसतो. आता देखील त्याच्या एक व्हिडीओने चाहत्यांच्या मनात घर केलं आहे.
हनी सिंगचा हा व्हिडीओ जयपूरमधील त्याच्या एका कार्यक्रमादरम्यानचा आहे. या व्हिडीओमध्ये हनी सिंग स्टेजची साफसफाई करत असलेल्या एका सफाई कार्मचाऱ्यासोबत डान्स करताना दिसत आहे. हनी सिंगने जबरदस्ती केल्यावर, मुलगा झाडू फेकतो आणि हनी सिंगसोबत भन्नाट डान्स करु लागतो. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्वजण हनी सिंगचे कौतुक करत आहेत.
प्रसिद्ध गायत असून देखील हनी सिंग याचा असा स्वभाव पाहून चाहते हनीचं कौतुक करताना दिसत आहेत. व्हिडीओवर एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘इंडस्ट्रीमधील किंग..’ तर अन्य एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘फार छान दृष्य आहे…’. हनीचा व्हिडीओ सध्यो इंटरनेटवर व्हायरल होत आहे.
हनी फक्त त्याच्या खासगी आयुष्यामुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील प्रचंड चर्चेत असतो. घटस्फोटानंतर हनी एका महिलेला डेट करत असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. हनी सिंग, सुपर मॉडेल टीना थडानी (Tina Thadani) हिला डेट करत असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. पण दोघांनी अद्याप त्यांच्या नात्याचा स्वीकार सर्वांसमोर केलेला नाही.
हनी सिंग आणि पहिली पत्नी शालिनी तलवार यांचं 2022 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. रिपोर्टनुसार, हनी सिंगने शालिनीला पोटगी म्हणून एक कोटी रुपये दिले. शालिनी आणि हनी सिंग यांचं लग्न 2011 मध्ये झालं होतं. शालिनीने हनी सिंगवर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप केला होता
