AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

४९ गाणी एकापाठोपाठ लिहिली, पण एकही पसंत पडेना, अखेर रात्री २ वाजता गाणं सुचलं..इतकं गाजलं की..

गाणं हे आतून आले पाहिजे, तुम्ही अजून वेळ घ्या, हवंतर समुद्री किनारी तरुणींना पाहून या, बघा काही सुचतं का असे व्ही. शांताराम आपल्याला म्हणाल्याचे गीतकार जगदीश खेबुडकर यांनी सांगितले.

४९ गाणी एकापाठोपाठ लिहिली, पण एकही पसंत पडेना, अखेर रात्री २ वाजता गाणं सुचलं..इतकं गाजलं की..
V. Shantaram and Jagdish Khebudkar
| Updated on: Oct 09, 2026 | 10:06 AM
Share

दिग्गज चित्रपट निर्माते व्ही. शांताराम यांचा एका महत्वाच्या चित्रपटाच्या गाण्याच्या निर्मितीचा एक किस्सा व्हायरल होत आहे. गीतकार जगदीश खेबुडकर यांनी अलिकडेच समाजमाध्यमावर या संबंधीचा अनुभव सांगितल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्ही.शांताराम यांना एका महत्वाकांक्षी चित्रपटासाठी गाणं हवं होतं. ते गाणे धड लावणी नको. लावणी डान्स त्यात नव्हता. असं गाणं सुचलं की सांग असा निरोप जगदीश खेबुडकरांना त्यांनी दिला होता.. खेबुडकर जे लिहायचे ते व्ही. शांताराम चांगले म्हणायचे, पण आतून आलेले नाही असे म्हणायचं..अशी खेबुडकरांनी ४९ गाणी एका दिवसात लिहिली. पण एकही व्ही. शांताराम यांना एकही पसंत पडेना…

व्ही. शांताराम त्यांच्या चित्रपटातील गाणे आणि संगिताबद्दल प्रचंड आग्रही असायचे. गीतकार जगदीश खेबुडकर यांना त्यांनी गाणं लिहिण्यास सांगतले. जे गाणं ते लिहियाचं ते शांताराम चांगले म्हणायचे पण मला आता हे नको असे ते म्हणायचं. अशी ४९ गाणी लिहून झाली तरी काही उपयोग झाला नाही, तेव्हा खेबुडकर त्यांना मी रात्रीपर्यंत लिहितो असे  म्हणाले. त्यावर व्ही. शांताराम म्हणाले आजचा दिवस जाऊ द्या.सायंकाळी चौपाटीवर फिरुन या. तेथे सुंदर तरुणींना पाहून एखादं गाणं सुचेल असा सल्ला त्यांनी दिला. नंतर त्यांनी मी तुम्हाला रात्री दोन वाजता फोन करतो असे सांगितले. या रुममध्ये त्यांच्यासोबत संगितकार राम कदम होते. ते रात्री जेवून मस्तपैकी सुरात घोरत झोपले होते. आणि खेबुडकर काय करु कोणते गाणं लिहू असा विचार करत राहिले होते.

अखेर रात्री ठरल्या प्रमाणे दोन वाजता व्ही.शांताराम यांचा जगदीश खेबुडकरांना फोन आला. आणि त्यावेळी नेमकं खेबुडकरांना गाणं सुचलं होते. त्यानंतर शांताराम यांनी मुखडा ऐकवण्याची विनंती केली. गाणं ऐकल्यावर, व्ही.शांताराम यांनी, व्वा हेच तर मला हवं होतं. ..तुम्ही गाण्याच्या खाली आता तुमची मस्तपैकी लांबलचक सही करा असा सल्ला त्यांनी दिल्याचे खेबुडकर यांनी सांगितले.  तेवढ्यात झोपलेले संगीतकार राम कदम उठले आणि म्हणाले माझी चाल तयार आहे. मी तुमचं गाणं ऐकले आहे. त्यावर जगदीश खेबुडकर यांनी झोपेत तुम्ही कशी काय चाल लावली, सुरपेटी घेऊन झोपला होतात की काय ? असा सवाल केला. हे बैठकीचं गाणं गाजलेल्या तमाशा पट ‘पिंजरा’ चित्रपटातील होतं.. ‘तुम्हावर केली मी मर्जी बहाल, नका सोडून जाऊ रंग महाल’..या गाण्याची कहाणी जगदीश खेबुडकर यांनी अशी सांगितली.

Follow Us
मुंबई जिल्हा बँकेत शिवसेना अतिरिक्त एका जागेसाठी आग्रही? अहिर म्हणाले?
Sachin Ahir : मुंबई जिल्हा बँकेत शिवसेना अतिरिक्त एका जागेसाठी आग्रही? सचिन अहिर काय म्हणाले?
मविआच्या कार्यकाळात पोलिसांच्या सुविधा मागे पडल्याचा देवेन भारतींचा...
Deven Bharati : डायल 112 पासून GPS ट्रॅकिंगपर्यंत…; मविआच्या कार्यकाळात पोलिसांच्या सुविधा मागे पडल्याचा देवेन भारतींचा दावा
चारा नसलेल्याने जनावरे डोंगरात सोडून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
Dharashiv Farmer : चारा नसलेल्याने जनावरे डोंगरात सोडून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
बाभळीच्या काट्यांच्या ढिगाऱ्यात भाविकांच्या उड्या; पुरंदरमधील गुळुंचे
Pune : बाभळीच्या काट्यांच्या ढिगाऱ्यात भाविकांच्या उड्या; पुरंदरमधील गुळुंचे गावची अनोखी काटेबारस यात्रा, व्हिडिओ बघाच
एकजूट नसल्यामुळेच यश...; EVM हटावच्या मागणीवर चंदनशिवे स्पष्टच बोलले
Nitin ChandanShive : एकजूट नसल्यामुळेच यश...; EVM हटावच्या मागणीवर नितीन चंदनशिवे स्पष्टच बोलले
माझ्याबाबत पवारांच्या मनात संशयाचं...; नरहरी झिरवाळांचं मोठं विधान
Narhari Zirwal on Sharad Pawar : माझ्याबाबत पवारांच्या मनात संशयाचं...; नरहरी झिरवाळांचं मोठं विधान
उसाला प्रतिटन 4200 रुपये भाव द्या; साडेतीन तासांचा रास्ता रोको अखेर...
Sugarcane Rate Protest : उसाला प्रतिटन 4200 रुपये भाव द्या; साडेतीन तासांचा रास्ता रोको अखेर स्थगित
गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; व्यावसायिक दराऐवजी....
CM Devendra Fadnavis : गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; व्यावसायिक दराऐवजी....
एका खासदाराचा भाव 150 कोटी; डिलिमिटेशनसाठी शाह खासदार विकत घेत आहेत...
Sanjay Raut : एका खासदाराचा भाव 150 कोटी; डिलिमिटेशनसाठी अमित शाह खासदार विकत घेत असल्याचा संजय राऊतांचा दावा
माळशेज घाटातील रिसॉर्टमध्ये भुजबळांसोबत काय चर्चा? अमोल कोल्हे...
Amol Kolhe : माळशेज घाटातील रिसॉर्टमध्ये भुजबळांसोबत काय चर्चा? अमोल कोल्हे स्पष्टच म्हणाले...